bhimjayanti speech भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठी भाषण
सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान झालेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझ्या गुरुजन वर्ग व जमलेले माझे बाल मित्रांनो आज 14 एप्रिल म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होय आजच्या दिवशी पूर्ण देशांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते प्रत्येक कार्यालयामध्ये प्रत्येक शाळेमध्ये जयंती उत्सव साजरा केला जातो. गावागावांमध्ये भीम विचारांचा जागर केला जातो.
आज आपल्या शाळेत देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करत आहोत बाबासाहेबांच्या विचारांची जयंती आपण साजरी करू या यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर असे होते व आईचे नाव भीमाबाई असे होते त्यांचे वडील फौजेमध्ये नोकरीला होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपणीचे जीवन खूप संघर्ष मुळे गेले.
लहानपणी शाळेमध्ये असताना त्यांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले दलित असल्यामुळे त्यांना वर्गामध्ये बसू दिले जात नसायचे त्यावेळी दलितांवर अस्पृश्यतांवर अन्याय अत्याचार व्हायचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या डोळ्याने तो अन्याय अत्याचार सहन केला तो पाहिला त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन झाले त्यांनी लहानपणीपासून ठरवले या चालीरीती रूढी परंपरा दलितांवर होणारे अतचार अन्याय दूर करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करायचे लढायचे संघर्ष करायचा आणि या चालीरीती रूढी परंपरा मोडीत काढायच्या.
पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षणासाठी त्यांना परदेशी जावे लागले प्रदेशातील खर्च भागवण्यासाठी कोल्हापूरचे राजे शाहू महाराज तसेच सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना आर्थिक मदत देखील केली परदेशामध्ये गेल्यानंतर त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला अनेक पदव्या मिळवल्या डॉक्टर हिट असेल डिलीट असेल पीएचडी असेल अशा अनेक पदव्या त्यांनी संपादित केल्या आणि पुन्हा भारतामध्ये येऊन वकिली या क्षेत्रामध्ये त्यांनी व्यवसाय सुरू केला परंतु हा व्यवसाय करत असताना त्यांना पुन्हा अस्पृश्यता दलितांवर होणारे अन्याय सहन झाली नाही त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय सोडून दिला आणि दलितांवर होणारे अत्याचार अन्याय मोडीत काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला.
त्यातील म्हणजे महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह होईल महाड येथील चवदार तळ्यावर गरिबांना दलितांना शोषितांना पिढीताना पाणी घेऊ दिले जात नसायचे त्या ठिकाणी त्यांना येण्याची परवानगी नव्हती त्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन केले सत्याग्रह केला आणि महाडचे चवदार तळे सर्वांसाठी खुले करून दिले. या सत्याग्रहातून लोकांना त्यांनी जागृत केले आपल्या हक्काविषयी त्यांना जाणीव करून दिली त्यामुळे समाज जागृत झाला आणि लोकांना स्वतःची जाणीव झाली त्यामुळे लोक लढू शकतात लढवून आपले हक्क आपण मिळू शकतो ही प्रेरणा त्यांनी त्यांच्यामध्ये निर्माण केली.
पुढे काळा राम मंदिर प्रवेश नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये दलितांना शोषितांना पिढी त्यांना प्रवेश दिला जात नसायचा यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश करून सर्व दलितांना प्रवेश सुरू करून दिला त्या ठिकाणी देखील सत्याग्रहाचे आंदोलन त्यांनी केले आणि गोरगरिबांना शोषितांना पिढी त्यांना मंदिरामध्ये पूजा करण्याचा प्रार्थना करण्याचा हक्क मिळवून दिला.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वैचारिक दृष्ट्या खूप महान होते त्यांनी अनेक मोठमोठे ग्रंथ वाचले त्यांचे घर म्हणजे एक वाचनालय होते घरामध्ये अनेक ग्रंथ होते त्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला त्यामध्ये सर्व धर्मांचे ग्रंथ होते धार्मिक ग्रंथाचे देखील त्यांनी वाचन केले सर्व धर्म समजून घेतले तसेच ते विद्वान होते तत्त्वज्ञ होते समाजसुधारक होते राजकारणी देखील होते भारत स्वतंत्र्य झाला त्यावेळेस भारताचे ते पहिले कायदामंत्री होते त्यांचा अभ्यास चांगला असल्यामुळे आणि तत्त्वज्ञ असल्यामुळे त्यांच्यावर तत्कालीन भारत सरकारने भारताचे संविधान बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती त्यामध्ये संविधान समितीचे मसुदा समितीमध्ये ते अध्यक्ष होते प्रत्यक्षात मसुदा तयार करण्याचे काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले त्यांना तळागाळातील लोकांची जाणीव होती शोषितांची पिढीतांची कामगारांची त्यांनी चांगला अभ्यास केला होता त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काम केले.
भारताचे सर्वात मोठे संविधान जगामधील सर्वात मोठा ग्रंथ होय आणि तो लिहिण्याचं कार्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले ते लिहिण्यासाठी त्यांना अनेक देशांमध्ये जावे लागले त्या देशांच्या राज्यघटनांचा संविधानाचा अभ्यास करावा लागला आणि भारताचे संविधान बनवताना त्यांना दोन वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला आणि भारताचे संविधान पूर्ण झाले आणि भारत सरकारला बहाल केले आणि खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक झाला.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये समतेला न्याय बंधुता या मूल्यांना त्यांनी रुजवले वाढवले आणि त्याचप्रमाणे जनतेला देखील समतेने आणि न्यायबंदतेने वागवले सर्वांना हक्क अधिकार मिळवून दिले त्यामुळे आज आपला देश एक संघ राहिला आजही आपला देश त्यांच्या संविधानावर चालतो
अशा या महान व्यक्तिमतला माझे त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय भीम जय भारत.