भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुंदर मराठी भाषण bhimjayanti marathi speech
शिक्षणाची अखंड पेटी मशाल हाती
शिका संघटित व्हा संघर्ष करा मुखी नारा
राज्यघटनेचा खरा शिल्पकार महामानव
भारतरत्न बाबासाहेब यांना
माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा
सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या सर्व बालमित्रांनो.
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भारतीय संविधानाचे जनक दिन दलितांचे जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या साखळदंड तोडणारा महायोद्धा दिन दलितांचा कैवारी उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्यार्थ्यांचा वापर समाज हितासाठी करणारे पहिले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या आईचे नाव भिमाबाई व वडिलांचे नाव रामजी आंबेडकर असे होते त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते. ते लहानपणीपासूनच खूप बुद्धिमान व महत्त्वकांशी विचार श्रेणीचे होते त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी करावी लागली पण ते मुळीच खचले नाहीत डगमगले नाहीत त्यांनी अस्पृश्यता दिन दलितांच्या उद्धारासाठी हे जीवनाचे अंतिम ध्येय मानले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व लंडनमधील विद्यापीठातून घेतले नंतर ते मायदेशी परतले त्यांनी आपल्या बांधवांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जबरदस्त संदेश दिला गोरगरीब तीन दलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने सत्याग्रह केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक भेदभाव व उच्च नीच भेदभावाचे समर्थन करणारे मनुस्मृती या ग्रंथाची जाहीर रित्या होळी केली नाशिक काळाराम मंदिरामध्ये दीनदलितना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला महाडच्या चवदार तळ्यावर दीन दलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला समाजाने ठिकारलेल्या समाजासाठी ते असेच किरण बनले मूकनायक हे पाक्षिक आणि बहिष्कृत भारत हे साप्ताहिक तर समता हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले त्यांनी समाजप्रबोधनाची बहुमूल्य कार्य केले स्त्री शिक्षणाचा त्यांनी सदैव पुरस्कार केला
असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या महामानवास ज्ञान संवादी तपस्वी अमोघ वक्तृत्वाचा व कुशल नेतृत्वाचा धनी योग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्याआड गेले.
आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार लाखो लोकांना स्फूर्ती चैतन्य देत आहेत
अशा या महान व्यक्तिमतला माझे विनम्र अभिवादन