भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तडफदार भाषण bhimjayanti marathi speech 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तडफदार भाषण bhimjayanti marathi speech

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण दरवर्षीप्रमाणे 14 एप्रिल रोजी साजरी करत असतो याही वर्षी अतिशय जल्लोषात जयंती साजरी होत आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वाभिमानी अभ्यासू जिज्ञासू व्यक्तिमत्व अन्यायाचा निर्भय शत्रू बहुजनांचे भाग्यविधाते स्त्रियांचे कैवारी धुरंदर राजकारणी आणि मानवतेचे पुजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा मानाचा त्रिवार अभिवादन करून मी माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करतो

शेकडो वर्षांपूर्वीच्या गुलामगिरीतून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी 14 एप्रिल 891 रोजी भीमराव नावाच्या क्रांति सूर्याचा जन्म झाला.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे ठणकवून सांगणारे म्हणजेच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात शैक्षणिक महत्त्व सांगणारे बाबासाहेबांनी अतिशय खडतर परिस्थितीत आपले दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले परदेशातील उच्च शिक्षणासाठी त्यांना बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व प्रकारे मदत केली.

डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी वेगवेगळे वृत्तपत्र चालवले त्यामध्ये मूकनायक बहिष्कृत भारत व समता या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाजातील चालीरीती रूढी परंपरा वर आघात केला. या वृत्तपत्रातून त्यांनी पांढरपेशी लोकांना ठणकावून सांगितले दिन दलितांना गोरगरिबांना छळू नका त्यांच्यावर अन्याय अत्याचार करू नका या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करून अन्यायकारक मानवी रूढी परंपरा वर जोरदार प्रहार केला मजूर व कामगारांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची देखील स्थापना केली होती.

त्यांनी संपूर्ण आयुष्यभर स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर जनतेच्या हितासाठी गोरगरिबांच्या हक्कासाठी दलितोदरासाठी कार्य केले स्पष्टता नष्ट करण्यासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले दलित वजराचे कार्य करणाऱ्या या महामानवाचे महापरिनिर्वाण ६ डिसेंबर 1956 रोजी झाले.

Leave a Comment