भीमानं माय सोन्यानं भरली ओटी भिमगित bhimgeet lyrics
काखेत पोरगं हातात झाडनं डोईवर शेणाची पाटी
कपडा न लत्ता अरे, खरकटं भत्ता
फजिती होती माय मोठी,
माया भीमानं, माया बापान
भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
मुडक्या झोपडीले होती माय मुडकी ताटी
फाटक्या लुगड्याले होत्या माय सतरा गाठी
अरे, पोरगं झालं सायब अन सुना झाल्या सायबीनी
सांगतात ज्ञानाच्या गोष्टी
पोरगं झालं सायब अन सुना झाल्या सायबीनी
सांगतात ज्ञानाच्या गोष्टी
माया भीमानं, माया बापान
भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
कामगार काही चालस पायी पायी
पुढ़ लागती तालुक्याची नवलाई
माया बपान माय पायली व सायकल
पोराले आली फटफटी
वया भीमानं, माया भीमानं
भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
सांगू सांगू मी केले, केले माय भलते कष्ट
नव्हतं मिळत वं खरकटं आणि उष्टं
असाच घास, दिला भीमानं
झकास वाटी वाटी
वया भीमानं, माया भीमानं
भीमानं ग, सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
मवा उत्तम माय खेळता मेळता होता
संदू सारंगचा मुळीच पत्ता नव्हता
अग पूर्वीच्या काळात असच होत
बात माय नायि वो खोटी
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
काखेत पोरगं हातात झाडनं डोईवर शेणाची पाटी कपडा न लत्ता अरे, खरकटं भत्ता फजिती होती माय मोठी, माया भीमानं, माया बापान भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी