Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar jayanti bhashan भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जबरदस्त भाषण

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar jayanti bhashan भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जबरदस्त भाषण

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण 14 एप्रिल रोजी साजरी करत आहोत शाळेमध्ये तसेच देशातील प्रत्येक कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

आपल्या देशामध्ये अनेक समाजसुधारक होऊन गेले अनेक क्रांतिकारक होऊन गेले अनेक राष्ट्रीय नेते होऊन गेले अनेक जणांनी या देशासाठी बलिदान दिले देश स्वतंत्र्य करण्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली त्याचप्रमाणे जगू दरासाठी देशाच्या हितासाठी गोरगरिबांच्या हक्कासाठी सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी एक व्यक्तिमत्व लढले त्यांनी संघर्ष केला ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय

अशा या महान व्यक्तिमत्त्वाचा जन्म 14 एप्रिल 891 रोजी मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर असे होते तर आईचे नाव भीमाबाई आंबेडकर असे होते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सदैव आपल्या स्मरणात राहतील तसेच त्यांचे कार्य हे आपल्या विचारांमध्ये आले पाहिजे जयंती साजरी करत असताना वैचारिक जयंती साजरी केली गेली पाहिजे ढोल ताशे डीजे लावणे म्हणजे जयंती साजरी करणे होत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अशी जयंती अभिप्रेत  नसेलही.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान विचार वैचारिक राजकीय तत्त्वज्ञ महान व्यक्तिम होते त्यांचे जीवन अतिशय संघर्षमय होते त्यांना समाजातील चालीरीती रूढी परंपरा अन्याय अत्याचार सहन न झाल्यामुळे त्यांनी गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी दलितांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला देह समर्पित केला.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अनेक कलागुणांचे व्यवसायाचे व्यक्तिमत्व ते राजकारणातील असेल न्याय शास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ समाज सुधारक याशिवाय आंबेडकर हे दलित बौद्ध चळवळीचे प्रेरक होते माणसाला तत्कालीन भारतीय समाजात प्रचलित असलेल्या विविध अन्यायाविरुद्ध लढण्याची तळमळ त्यांची होती

अन्यायावरुद्ध लढत असताना त्यांनी अनेक सत्याग्रह देखील केले जसे की महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह असेल तसेच नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश असेल अशा अनेक चालीरीती रूढी परंपरा मोडीत काढण्यासाठी त्यांनी सत्याग्रहासारखे आंदोलने केली उपोषणे केली.

भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारताकडे स्वातंत्र्य अशी राज्यघटना नव्हती त्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतका विद्वान भारतामध्ये नव्हता त्यामुळे भारत सरकारने भारतासाठी राज्यघटना बनवण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती सोपवले त्यांनी खूप अभ्यास केला अनेक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला त्यावरून आपल्या देशाची राज्यघटना बनवण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि त्या राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष त्यांना बनवले गेले सर्वात महत्त्वाचे काम त्यांना देण्यात आले ते म्हणजे मसुदा बनवण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्षे 11 महिने 18 दिवस अहोरात्र प्रयत्न करून जगातील सर्वात मोठा ग्रंथ म्हणजे भारताचे संविधान लिहिण्याचं काम त्यांनी केलं.

भारतातील जातिवाद नष्ट करण्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले स्वतंत्र्योत्तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अस्पृश्यतेचे स्तोम मारले होते अशा परिस्थितीमध्ये दलितांना गोरगरिबांना कमी लेखले जायचे त्यांना शिक्षण मिळत नसायचे जातीयवाद पेटला होता घरे साफ करणे स्वच्छतागृह साफ करणे झाडांना पाणी घ**** अशी शुल्क कामे दलितांकडून शोषितांकडून गरिबांकडून करून घेतली जायचे अशा परिस्थितीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी दलितांवर होणाऱ्या अत्याचार अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी संघर्ष उभा केला स्वतः त्यासाठी लढले व दलितांना शोषितांना कामगारांना व उपेक्षितांना त्यांचा न्याय मिळवून दिला राज्यघटनेमध्ये अनेक कलमे त्यांनी अंतर्भूत केली या कलमांमुळे सर्वांना हक्क मिळाले कर्तव्य आणि हक्काची जाणीव त्यांनी करून दिली त्यामुळेच आपला भारत देश आजही एक संघ आहे आज त्यांनी बनवलेल्या राज्यघटनेवर आपला देश चालतो सर्वांना समानतेने या ठिकाणी समतेने वागवले जाते सर्वांना समान हक्क आहेत सर्वांना समान अधिकार आहेत ते फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच.

कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातीमध्ये अन्याय आणि भेदभावाबाबत जनजागृती करण्यात त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती असश्यता हे जातीवादी रूप आहे येथील जातीवादी परंपरा नष्ट करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोलाचे प्रयत्न केले अस्पृश्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार केला अस्पृश्य समाजाचे उठाण करणे हा या प्रथेचा उद्देश होता.

Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar jayanti bhashan
Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar jayanti bhashan

1 thought on “Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar jayanti bhashan भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जबरदस्त भाषण”

Leave a Comment