राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ५०० शब्दात मराठी निबंध bharatratna Do.Babasaheb Ambedkar Jayanti
*आज १४ एप्रिल २०२५,स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार, महामानव ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३४ व्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम विनम्र अभिवादन*
*दरवर्षीच आपण पाहत आलेलो आहोत की,१४ एप्रिल ला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही एखाद्या उत्सवाप्रमाणे आपल्या देशातच नाही,तर संपूर्ण जगात साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला वंदन करण्यासाठी मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.मिरवणुका काढल्या जातात,प्रभात फेरी,बाईक रॅली काढून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, कार्याला अभिवादन, वंदन केले जाते.*
*सर्वच क्षेत्रातील सर्वच कार्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते,डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून,प्रतिमेला हारार्पण करून,डॉ. बाबासाहेबांचे विचार,कार्य, हे इतरांपर्यंत पोहोचविले जाते. महान व्यक्तींच्या जयंती साजरी करण्यामागचा उद्देशच असा असतो की,या महान व्यक्तीने समाजासाठी जे कार्य केले, जी मेहनत घेतली, जो त्याग केले, जे चांगले विचार समाजाला दिले या सर्व गोष्टींना उजाळा देणे व त्यांच्या कार्यप्रती कृतज्ञता व्यक्त करणे.*
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देखील विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते हे आपण नेहमीच बघतो,जसे की,कुठे कुठे रक्तदान शिबीर आयोजित केले जातात,मोफत आरोग्य तपासणी चे आयोजन केले जाते, मोफत डोळे तपासणी चे आयोजन केले जाते,मोफत भोजन व्यवस्था, संगीताचे कार्यक्रम, मोफत पुस्तक वाटत अशा उपक्रमाचे आयोजन केले जाते. सर्वच शाळांमध्ये सुध्दा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन,हारार्पण, विद्यार्थी-शिक्षक यांची भाषणे,रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा उपक्रमाचे आयोजन केले जाते.असे उपक्रम राबविण्यामागचा उद्देश हाच की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, यांचे विचार हे नवीन पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे,त्यांच्या विचारांचा, त्यांच्या कार्याचा आदर्श हा विद्यार्थ्यांनी घ्यावा व त्या आधारे स्वतःचा व आपल्या देशाचा विकास घडवून आणावा.वरील प्रमाणे असे विविध प्रकारचे उपक्रम राबवून डॉ.बाबासाहेबांनी केलेल्या कार्याला, त्यांच्या विचारांना सर्वच स्तरातून या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.*
*आपण भारतीय खूपच नाशिबवाब आहोत की,इतक्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचे, इतके हुशार व्यक्तिमत्त्व आपल्या भारत देशाला लाभले हे आपले व आपल्या भारत देशाचे सौभाग्यच आहे. आज आपला भारत देश स्वतंत्र होवून जवळपास ७८ वर्षे होत आहेत, या ७८ वर्षातील प्रत्येक दिवस, प्रत्येक भारतीयांनी जो जगला तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या चांगल्या विचारानुसारच,मग क्षेत्र कोणतेही असो,राजकीय असो,सामाजिक असो वा आर्थिक असो प्रत्येक क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे अतिशय मोलाचे व सर्वांना प्रेरणादायी असेच आहे.*
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल,१८९१ ला मध्य प्रदेश मधिल महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव हे डॉ.भीमराव रामजी आंबेडकर आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्था मधून अर्थशास्त्र या विषयात पी. एच. डि. पदव्या मिळविल्या. तसेच त्यांनी कायदा,अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले.त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते.त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चामध्ये सामील झाले, वृत्तपत्र प्रकाशित केली,दलितांसाठी राजकीय हक्काचा आणि सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.*
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ‘भारतीय घटनेचे शिल्पकार’ असे म्हटले जाते. आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र झाला.भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वतंत्र चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता.मग या विचारातुनच भारताचे स्वतंत्र संविधान तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्याकरिता एक समिती स्थापन केली,ती समिती”संविधान सभा”म्हणून ओळखली जाते.*
*संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.त्यांना विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता,त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमवार चर्चा झाली.अनेक दुरुस्त्या सुचविण्यात आल्या. संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे ,तसेच संविधान सभेच्या सूचनेनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळेच त्यांना ‘भारतीय घटनेचे शिल्पकार’ म्हणतात.*
*इ.स.१९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले.इ. स.१९९० मध्ये त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी ‘आंबेडकर जयंती’ म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.इ. स.१९१२ मध्ये “द ग्रेटेस्ट इंडियन” नावाच्या सर्वेक्षणात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’म्हणून निवड करण्यात आली आहे.*
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय हुशार, कुशाग्र बुद्धिमत्ता लागलेले व्यक्तिमत्त्व होते.त्यांच्या बुद्धिमत्तेसमोर आपला देशच नाही तर,संपूर्ण जग नतमस्तक होतोय.अशा या असामान्य व्यक्तित्वास, महामानवास त्यांच्या१३४व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करूया.त्याचप्रमाणे त्यांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला, त्यांनी समाजाप्रती दिलेल्या योगदानाला,त्यागाला नतमस्तक होवूया… “डॉ.बाबासाहेब आंबेडकर की जय.”…धन्यवाद.*
