Bharatratna do.babasaheb ambedkar भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bharatratna do.babasaheb ambedkar भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुंदर भाषण शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असे भाषण मुद्देसूद भाषण आंबेडकर यांचा पूर्ण जीवन परिपथ या ठिकाणी मुद्देसूद मांडणी केलेली आहे.

शालेय जीवनामध्ये अनेक वेळा आपल्याला भाषण करण्याची संधी मिळते त्या संधीचे सोनं करण्यासाठी आपण वारंवार प्रयत्न करत असतो त्यासाठीच सदर भाषण बनवलेले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपणास शालेय स्तरावर असेल कार्यक्रमांमध्ये सुंदर आणि सुटसुटीत अशी भाषण करता यावे यासाठी व्यवस्थित मांडणी केलेले भाषण आपण या ठिकाणी पाहू शकता.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावांमध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव सुभेदार रामजी आंबेडकर आणि त्यांच्या आईचे नाव भिमाबाई रामजी आंबेडकर असे होते त्यांचे नाव भीमराव असे ठेवण्यात आले त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते भीमराव च्या वेळेस शाळेत जात होते त्यावेळेस त्यांच्यापासून विद्यार्थी अंतरावर बसायचे त्यामुळे त्यांच्या मनात प्रश्न पडायचा असे का होत आहे तर त्यांना अभ्यासांती कळले की अस्पृश्यना शूद्र समजले जात होते त्यांच्या अंगाला चुकून हात लागला तरी ते आंघोळ करायचे पण बाबासाहेब यांनी ते शांतपणे सहन करत राहिले त्यांना शिक्षक सुद्धा शाळेमध्ये बसून देत नसत त्यांनी शाळेच्या खिडकीजवळ बसून आपल्या वर्गाच्या बाहेर बसून शिक्षक काय शिकवत आहेत याचा अभ्यास केला लक्षपूर्वक ऐकले घरी येऊन त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारले आपल्या घरी रामायण महाभारत असे ग्रंथ आहेत आपण त्या ग्रंथाची पूजा करतो वाचन करतो मग रामाला आणि कृष्णाला हे मान्य होऊ शकते का? आपल्याला लोक शूद्र का म्हणतात सूत्रांचा अपमान का केला जातो असे अनेक प्रकारचे प्रश्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनामध्ये आले.

गणपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाचे खूप आवड होती जिद्द होती अनेक हाल अपेष्टा सहन करून अपमान सहन करून त्यांनी आपले शिक्षण सुरूच ठेवले त्यांनी कधीही परिस्थिती समोर हार मानली नाही कधीही ते परिस्थितीच्या समोर झुकले नाहीत त्यांनी त्या संघर्षमय जीवनाचा सामना केला.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील म्हणजे रामजी आंबेडकर हे सैन्यामध्ये सुभेदार या पदावर कार्यरत होते त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली कष्ट करून आपल्या मुलांना शिकवण्याचे त्यांनी प्रयत्न केला मॅट्रिक झाल्यानंतर त्यांच्या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले केळुस्कर गुरुजी यांनी त्यांना गौतम बुद्धाचे चरित्र भेट म्हणून दिले मॅट्रिक नंतरही त्यांनी आपले पुढील शिक्षण सुरूच ठेवले परदेशात जाऊन शिक्षणासाठी शिक्षण घेण्यासाठी त्यांना कोल्हापूरचे संस्थांचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी व बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती पुरवली.

प्रदेशातून शिक्षण पूर्ण करून भारतामध्ये आल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्या राज्यांमध्ये नोकरी करण्याचे ठरवले नोकरीसाठी जेव्हा ते बडोद्याला गेले तेव्हा तेथे वेगळाच अनुभव त्यांना आला तेथे गेल्यानंतर प्रथम त्यांना राहण्यासाठी खोली उपलब्ध नव्हती त्यानंतर बडोद्याच्या संस्थानांमध्ये एका मोठ्या पदावर असूनही तेथे कर्मचारी त्यांनाही त्याची वागणूक देत असत त्यातच त्यांच्या वडील रामजी आंबेडकर यांचा मृत्यू झाला आपण इतके शिक्षण घेऊनही आपल्याला जर अशी वाईट वागणूक मिळत असेल तर समाजातील आपल्यासारख्या इतर लोकांची परिस्थिती कशी असेल याची कल्पना त्यांच्या मनामध्ये आली म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेथून पुढे आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या समाजासाठी करायचा शोषितांसाठी अस्पृश्यांसाठी रंजल्या गांजल्यांसाठी लढायचे असमानता नष्ट करायची गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायचा हा त्यांनी ठाम निश्चय केला.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाचे खूप आवड होती त्यांनी अनेक पुस्तके वाचली एकदा एक वेळेस एक पुस्तक वाचल्यानंतर ते पुन्हा ते पुस्तक कधीही वाचत आसत त्यांची स्मरणशक्ती खूप मोठी होती त्यांना वाचलेले खूप काळ लक्षात राहत होते. त्यांना पुस्तकांची खूप आवड असल्यामुळे त्यांनी आपल्या घरामध्ये देखील सुरू केले घरातील अनेक ग्रंथ त्यांच्याकडे होते त्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला त्यांनी अनेक विषयावर निबंध लेले संशोधन पर लेखन देखील केलेले आहे प्रबंध सादर केले पुस्तकाच्या वाचनाबरोबरच त्यांना लेखनाची सुद्धा आवड होती त्यांचे लेख अनेक वृत्त पत्रांमध्ये प्रसिद्ध होत असत.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला रमाबाई ह्या अतिशय गरीब कुटुंबातील होत्या त्यांनी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्या शिक्षणात मदत केली रमाबाईंनी सोन्या-चांदीची कधीही आशा केली नाही कपाळाचे कुंकू हेच त्यांचं खरा सोना होतं आपल्या भारत देशात सर्वात जास्त शिक्षणाच्या पदव्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतल्या होत्या.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर बनवून त्यांनी दलितांना हक्क मिळवून दिला समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतंत्र चळवळीत भाग घेतला महाडच्या तळ्यावर पाण्याचा हक्क मिळवून दिला तसेच काळाराम मंदिर प्रवेश असेल चित्रांना त्या ठिकाणी प्रवेश मिळवन देण्यासाठी त्यांनी सत्याग्रह आंदोलन केले

आपला भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले भारत स्वतंत्र्य झाल्यानंतर देखील खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला नव्हता कारण भारताला स्वतःची अशी राज्यघटना नव्हती ती राज्यघटना लिहिण्याच्या कार्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं राज्यघटना लिहीत असताना मसुदा समितीचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला त्यांनी मसुदा तयार करत असताना समाजातील प्रत्येक घटकाला डोळ्यासमोर ठेवून राज्यघटना लिहिण्याचे कार्य केले म्हणून सर्व घटकांना समान न्याय मिळत आहे त्यांच्या राज्यघटनेवर आज आपला संपूर्ण देश चालत आहे अशी ही राज्यघटना लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वर्ष 11 महिने 18 दिवस लागले.

जगातील सर्वात मोठी राज्यघटना लिहिण्याचे कार्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांना कायदामंत्री म्हणून पद देण्यात आले स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदामंत्री बनण्याचा मान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मिळाला त्यांनी संसदेमध्ये हिंदू कोड बिल मांडले यामध्ये त्यांनी स्त्रियांच्या हक्कांविषयी समानतेविषयी भूमिका मांडली मात्र तत्कालीन सर्व नेत्यांनी या बिलाचा कडाडून विरोध केला बिल मंजूर संसदेत मंजूर न झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला काही दिवसात त्यांची प्रकृती बिघडली व दिल्लीमध्ये ६ डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले त्यांच्या या बातमीमुळे सारे जग कळले त्यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईच्या दादर चौपाटीवर आणण्यात आले तेव्हापासून त्या भूमीला चैत्यभूमी असे नाव देण्यात आले.

Join Now

Leave a Comment