शालेय विद्यार्थ्यांसाठी बँड कॉम्पिटिशन आयोजित करणेबाबत band competition pathak
माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शालेय विद्यार्थ्यांसाठी बँड कॉम्पिटिशन आयोजित करणेबाबत…
संदर्भः भारत सरकार शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र D. O. No. F. 1-2/2022-
Sch.3 दि १२ जुलै २०२४
उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रानुसार, महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांतील इयत्ता ९ वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील बँड कॉम्पिटिशन आयोजित करण्यात येत
आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे, बँडच्या माध्यमातून कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे अशा उद्देशाने या राष्ट्रीय स्तरावरील बैंड कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात येत आहे.
सदर स्पर्धा राज्यस्तर, झोनल स्तर (राष्ट्रीय उपांत्य), राष्ट्रीयस्तर या ३ स्तरांवर आयोजित करण्यात येणार आहे. सदर स्पर्धा सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना खुली आहे.
ज्यामध्ये CBSE, ICSE, KVS, NVS, PM-SHRI, व सैनिकी शाळा सुद्धा समविष्ट होणे अपेक्षित आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई आणि प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) यांनी आपल्या जिल्ह्यात शिक्षणाधिकारी (माध्य.) व शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई यांचे सहकार्याने उपरोक्त नमूद सर्व प्रकारच्या सर्व शाळांना याबाबतचे परिपत्रक काढून परिषदेकडील पत्रात दिलेल्या लिंकवर नोंदणी करणे आणि बँडचे व्हिडीओ अपलोड करणे याबाबत सूचित करावयाचे आहे. दि.१ सप्टेंबर २०२४ ही जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्याची अंतिम तारीख आहे. आपल्या जिल्ह्यांतील शाळांच्या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार https://forms gle/QSMIEJH94898YC4T9 या लिंकमध्ये माहिती भरून व मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार पाईप बँडचा विद्यार्थी ग्रुप/विद्यार्थिनी ग्रुप आणि ब्रास बँडचा विद्यार्थी ग्रुप/विद्यार्थिनी ग्रुप अशा ४ प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारच्या एक किंवा प्रत्येक प्रकारातील एक अशा संघाची नोंदणी करून व्हिडीओची लिंक पेस्ट करणे हे
दि.१ सप्टेंबर २०२४ या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत करणे अपेक्षित आहे. (व्हिडीओची लिंक पेस्ट करताना त्याला access देणे महत्वाचे आहे.)
यासाठी आपल्या अधिनस्त सर्व कार्यालये व शाळांना याबाबत सविस्तर माहिती कळवून जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होतील असे पाहावे. यासाठीची मुदत कोणत्याही कारणासाठी वाढविण्यात येणार नाही याबाबत सर्व शाळांना सूचित करण्यात यावे.
बैंड स्पर्धाच्या पुढील स्तरांवरील स्पर्धाच्या सूचना आपणास स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येतील.
बँड स्पर्धेच्या आयोजनासंबंधित मार्गदर्शक सूचना सोबत जोडल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी.
सोबत – १. मार्गदर्शक सूचना
२. संदर्भिय पत्र