एकल पालकांच्या मुलांना महिन्याला २,२५० रुपये बालसंगोपन योजनेतून करा अर्ज; प्रतिवर्षी नूतनीकरण आवश्यक balsangopan yojna
सोलापूर, ता. १९: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना आता २ हजार २५० रुपये मिळतात. या योजनेत पूर्वी १ हजार १०० रुपये मिळत होते. त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. विधवा, घटस्फोटित महिला तसेच अनाथ बालकांना ही योजना मिळवण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात (पंचायत समिती) कुटुंब संरक्षण अधिकारी र यांच्याकडून अर्ज पूर्ण भरून तालुका ह स्तरावर तपासून घ्यावा व जिल्ह्याच्या ठिकाणी बालकल्याण समितीसमोर 5 मुलांना समक्ष नेऊन फॉर्म जमा करणे आवश्यक आहे. कोरोनानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून सध्या जिल्ह्यात ५,८०० लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.
1 दरम्यान, या योजनेत सुरवातीला अर्जदारांची गृहचौकशी करण्यात येते. पालकाचे उत्पन्न एक लाख रुपयेपर्यंत असणे आवश्यक आहे. खरोखर गरजू असणाऱ्यास लाभ दिला जातो. सध्या ५८०० लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रमेश काटकर यांनी दिली.
नियम व अटी
■ एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले आहेत, अशा एक पालक असलेल्या मुलांना, कॅन्सर किंवा एचआयव्ही बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना, तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या मुलांना ही योजना मिळते.
■ अशा पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येकी २ हजार २५० रुपये मिळतात.
त्यामुळे दोन्ही अपत्यांचे स्वतंत्र फॉर्म भरावेत.
■ घटस्फोटित व परित्यक्ता महिलांच्या मुलांनाही हा लाभ मिळतो.
फक्त घटस्फोटित महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदपत्रांसह अर्ज करावा तर ज्या महिला पतीपासून विभक्त राहत आहेत, त्यांनी तसे पुरावे व सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र सादर करावे.
आवश्यक कागदपत्रे (याचा छापील अर्ज कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून घ्यावा)
१) योजनेसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज
२) पालकाचे व बालकाचे आधारकार्ड झेरॉक्स
३) मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट
४) तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला
५) पालकांचे मृत्यू असल्यास मृत्यूचा दाखला
६) पालकांचा रहिवासी दाखला. (ग्रामपंचायत / नगरपालिका यांचा)
७) मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स व ते नसल्यास पालकांचे
पासबुक
८) मृत्यूचा अहवाल (कोविडने जर मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा अहवाल)
९) रेशनकार्ड झेरॉक्स.
१०) घरासमोर पालकांसोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड आकाराचा रंगीत फोटो (दोन मुले असल्यास दोन्ही मुलांसोबत पालकांचा स्वतंत्र फोटो)
१०) मुलांचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो
sureshsuse8@gmail.com
sureshsuse8@gamail.com
Last date for form submission