क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालिका दिन भाषण balika din
महाराष्ट्रात राज्यामध्ये दरवर्षी ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘बालिका दिन’ म्हणून साजरी केली जाते.
सावित्रीबाई फुले ह्या महान शिक्षिका, समाजसुधारिका व कवयित्री होत्या.
त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्हयातील नायगाव या गावी झाला.
त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या.
सावित्रीबाईंनी भारतातील महिलांचे शिक्षण व त्यांच्या मुलभूत अधिकारासाठी आपले अमूल्य योगदान दिले.
त्यांनी भारतातील लिंग भेद्भाव दूर करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
सावित्रीबाई व ज्योतिराव फुले या दांमध्छ पती-
पत्नींनी इ.स. १८४८ मध्ये पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा काढली.
समाजात मुलींच्या हक्काविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी, लैगिंक असमानता दूर करण्यासाठी व समाजा- तील मुलींचा दर्जा उंचावण्यासाठी हा बालिका दिन’ साजरा केला जातो.
मुलींना जर चांगले शिक्षण, आरोग्य व इतर अधिकार मिळाले तर नक्कीच त्यांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.
महिला व बालविकास मंत्रालयाने मुलींचा दर्जा सुधारण्यासाठी राज्यस्तरा- वर व राष्ट्रीय स्तरावर विविध पावले उचलली आहेत.
जसे, लसीकरण, जन्मनोंदणी, स्त्री भ्रूणहत्या रोखणे, मुलींचे शिक्षण, महिला बचतगट इ. यातून चांगला बदल दिसून येत आहे.
बालिका दिनादिवशी महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात.
सोशल मिडीया च्या विविध माध्यमाद्वारे मुलगी वाचवा हा संदेश दिला जातो.
अनेक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यात सहभागी होतात. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ सप्ताहाचे आयोजन महाराष्ट्रभर केले जाते.
असा हा बालिकादिन मुलींच्या हक्कांबद्दल जनजागृती वाढवणारा, मुलींचा दर्जा उंचावण्यास मदत करणारा व सावित्रीबाईंच्या कार्याची दखल घेणारा महत्त्वाचा दिवस आहे.