आयुष कोर्सेस नंतर काय? BAMS/BHMS/BUMS या आयुष कोर्सेस नंतर पुढे काय? Ayush courses important
नीट ची परीक्षा दिल्यानंतर MBBS ला प्रवेश घेण्याची खूप जणांची इच्छा असते किंबहुना प्राधान्यक्रमात तो कोर्स सर्वात वर असतो.
MBBS ला प्रवेश मिळाला नाही तर मग BAMS/BHMS/BUMS या आयुष कोर्सेसना प्रवेश घेतला जातो. मात्र एमबीबीएस ला प्रवेश न अनेकांना सतत वाटत राहते. बाल्याची खंत
पण एक लक्षात घ्या प्रॅक्टिस चालणे किंवा न चालणे, पैसा आणि प्रसिद्धी मिळणे हे तुमच्या डिग्रीवर अवलंबून नाही. BAMS/BHMS/BUMS कोर्स करून देखील तुम्ही आयुष्यात खूप काही करू शकता. डिग्री हा केवळ तुम्हाला व्यवसाय करण्याचा मिळालेला परवाना आहे. खरी परीक्षा ही डिग्री मिळाल्यानंतर, जेव्हा तुम्ही वैद्यकीय व्यवसायात प्रवेश करता तेव्हा चालू होते. यामध्ये अल्पसंतुष्ट राहणारे खूप काही प्रगती करू शकणार नाही मात्र जर या क्षेत्रात तुम्ही नवीन काहीतरी केले तर पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही तुम्ही उत्तम प्रकारे कमवू शकता. यासाठी वेगवेगळे पर्याय खालील प्रमाणे आहेत.
१) शुद्ध आयुर्वेदिक किंवा शुद्ध होमिओपॅथिक किंवा शुद्ध युनानी प्रॅक्टिस करून अगदी एम.डी., एम.एस डॉक्टरांच्या तोडीची प्रॅक्टिस करणारे अनेक डॉक्टर आहेत. अनेकांच्याकडे तर अपॉइंटमेंट साठी दोन दोन महिन्याचे वेटिंग असते. शेवटी तुमचे वैद्यकीय ज्ञान आणि पेशंट बरोबर तुमचे वागणे बोलणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. पेशंट बरे झाले तर तुमची पॅथी कोणती NAIK योग्य निदान आणि योग्य उपचार यामुळे जर आहे याला महत्त्व राहत नाही.
२) आयुष कोर्सेस केल्यानंतर MPSC/UPSC ची परीक्षा देऊन तुम्ही सरकारी नोकरी करू शकता. BAMS झालेले माझे दोन मित्र आज जिल्हाधिकारी आहेत.
तहसीलदार आणि इतर अनेक पदावर आयुष कोर्सेस केलेले अनेक अधिकारी कार्यरत आहेत.
3) वैद्यकीय अधिकारी म्हणून तुम्ही गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये देखील नोकरी करू शकता.
४) जनरल प्रॅक्टिशनर म्हणून वैद्यकीय व्यवसाय तर र तुम्ही करू शकताच पण इच्छा असेल तर अगदी वेगवेगळे स्पेशालिस्ट डॉक्टरांना व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून अपॉइंट करून तुम्ही अगदी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देखील सुरू करू शकता.
५) केवळ आयुष डिग्री घेऊन न थांबता यामध्ये तुम्हाला Post Graduation देखील करता येईल. BAMS विद्यार्थ्यांना आयुर्वेद संहिता, शरीर रचना, क्रियाशारीर, द्रव्य गुण विज्ञान, रसशास्त्र, स्वस्थ वृत्त, अगद तंत्र रोगनिदान, काय चिकित्सा, शल्यतंत्र, शालाक्यतंत्र, प्रसूती आणि स्त्रीरोग, पंचकर्म अशा विविध विषयांमध्ये MD/MS/DIPLOMA कोर्स करता येतो. होमिओपॅथीक विद्यार्थ्यांना Materia Medica, Organon, Repertory, Pediatrics, psychiatry, pharmacy या विषयांमध्ये MD करता येईल. BUMS विद्यार्थ्यांना त्यांच्या शास्त्रातील community medicine, general medicine, Obst and gynec या विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट करता येईल. ते करूनही अजून शिकायची इच्छा असेल तर एखाद्या विषयामध्ये PhD देखील करता येईल. यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर तर पडेलच पण मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून देखील तुम्हाला चांगला जॉब मिळू शकेल. प्रॅक्टिस मध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होईल.
शिवाय M.Sc Medical Biotechnology, M.Sc. St Regenerative Medicine, M.Sc. Medical Biochemistry, M.Sc. Anatomy या कोर्सेस ला देखील प्रवेश घेऊ शकता. या क्षेत्रात देखील नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
७) Emergency Medical Service (EMS) सारखा कोर्स करून जर तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये ICU चा चांगला अनुभव घेतल्यास अगदी उत्तम पगाराची नोकरी तुम्हाला खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील मिळू शकेल. विविध कंपन्या मार्फत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चा ट्रेंड वाढत आहे. अशा वेळेस ICU मध्ये काम करण्यासाठी आयुष कोर्सेस च्या विद्यार्थ्यांना मोठी संधी भविष्यात उपलब्ध अ
7666181492
८) याशिवाय आयुर्वेद / होमियोपॅथी / युनानी या कोर्सेसची पदवी आणि निसर्गोपचार, nutrition and dietetics सारखे कोर्स करून तुम्ही एक घेतल्यानंतर परिपूर्ण डॉक्टर होऊ शकता ज्याचा तुम्हाला प्रक्टिस मध्ये लखन शकतो.
देखील खूप उपयोग होऊ UNSE
९) MBA in Hospital Management सारखा कोर्स करून तुम्ही एखाद्या खाजगी हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल चालवण्यासाठी मॅनेजरची पोस्ट देखील मिळू शकता.
आहेSSION
१०) ज्यांच्याकडे भरपूर शेती आपल्या आयर्वेदिक ज्ञानाचा वापर करून आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात किंवा एक जोडधंदा म्हणून देखील तुम्ही त्याच्याकडे पाहू शकता. तुम्ही स्वतः संशोधन करून स्वतःचे आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक किंवा युनानी औषधे
निर्माण करून एखादी औषधी कंपनी देखील सुरू करू शकता.
११) एखाद्या हिल स्टेशनला तुम्ही आपले आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा युनानीसेंटर आणि जोडीला योगा आणि आहार यांचे ज्ञान मिळवून रिसॉर्ट देखील करू शकता. उपचारांसाठी अशा ठिकाणी आठ आठ दिवस राहून है उपचार घेऊन वैद्यकीय पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.
3/4
नमुना म्हणून ही फक्त काही उदाहरणे दिलेली आहेत. आयुष डिग्री नंतर आयुष्यात यशस्वी होण्याकरिता खूप सारी क्षेत्रे तुमच्यापुढे उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही कसा वापर करून घेता किंवा कोणत्या क्षेत्रात नाव कमवू शकता याचा अभ्यास करून
त्या दृष्टीने मार्गक्रमण केल्यास मोठे नाव आणि पैसा दोन्ही तुम्ही मिळवू शकता हे निश्चित ! त्यामुळे आयुष कोर्सेस ना प्रवेश ही देखील आयुष्यातील एक मोठी संधी समजा,