अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांचे तालुकास्तरीय समायोजनाबाबत atirikt shikshak samayojan
संदर्भ :-
०१. शासन निर्णय क. जिपब/५११/प्र.क्र.५४/आ-१४, दिनांक १८/०५/२०११
०२. शासन निर्णय क. जिपब/५११/प्र.क्र.५४/आ-१४, दिनांक २७/०४/२०१२
०३. शासन निर्णय क. जिपब/३१/प्र.क्र.६८/आ-१४, दिनांक २८/०८/२०१२
०४. संच मान्यता सन २०२३-२४
०५. या कार्यालयाचे पत्र क्र/बुजिप/शिप्रा/प्रास्था/४६६/२०५, दिनांक २२/०१/२०२५
०६. गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती (सर्व) यांचे दिनांक २७/०१/२०२५ रोजीचे पत्र.
०७. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांचे दिनांक २७/०१/२०२५ रोजीचे निवेदन.
०८. मा.मु.का.अ.जि.प.बुलडाणा यांचे दिनांक २७.०१.२०२५ रोजीचे टिपणीवरील तसेच चर्चेनुसार निर्देश.
उपरोक्त विषयास अनुसरुन संदर्भ क्र. ०१ च्या शासन निणयन्वये दर वर्षी सप्टेंबर अखेर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीची पटसंख्या निश्चित केल्यानंतर शाळेतील विदयार्थ्यांच्या पटसंख्या अभावी अतिरिक्त ठरत असलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आलेले आहे.
तरी सन २०२३-२४ ची संच मान्यतेनुसार या कार्यालयाचे संदर्भ क्र.०५ चे पत्रान्वये समायोजन प्रक्रिया पार पाडण्याबाचत आपणास अवगत करण्यात आले आहे.
परंतु शिक्षक व जिल्हा परिषद कर्मचारी विदयार्थी क्रिडा स्पर्धाची तयारी, दहावी/बारावी परिक्षेच्या नियोजनामध्ये सर्व गटशिक्षणाधिकारी यांचा सहभाग, शिक्षक संघटनांनी समायोजन प्रक्रिया तुर्त पुढे ढकलावी अशी केलेली विनंती तसेच तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे संदर्भ क्रमांक ०८ नुसार झालेल्या चर्चेअंती दिलेले निर्देश या सर्व बाबी लक्षात घेता संदर्भ क्र.०५ अन्वये समायोजन प्रक्रिया पार पाडण्याबाबतचे पत्रास तुर्तास स्थगिती देण्यात येत असुन समायोजन प्रक्रिया पार पाडण्याबाबत आपण यथावकाश कळविण्यात येईल यांची नोंद घेण्यात यावी.
(