आश्रमशाळा चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक वेतन अनुदान व वेतनेतर अनुदान ashram Shala vetan anudan grant
मागणी क्रमांक झेडजी-३, प्रधान शीर्ष २२२५, विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्यासाठी आश्रमशाळा व मुलोद्योगोतर आश्रमशाळा चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान (कार्यक्रम) २२२५ई८६६, ३६-सहाय्यक अनुदाने (वेतन)
शासन ज्ञापनः-
सन २०२४-२५ या वित्तीय वर्षातील खर्च भागविण्यासाठी माहे जुलै, २०२४ च्या अर्थसंकल्पात
“मागणी क्रमांक झेडजी-३, प्रधान शीर्ष २२२५, विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्यासाठी आश्रमशाळा व मुलोद्योगोतर आश्रमशाळा चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान (कार्यक्रम) २२२५ ई ८६६, ३६-सहाय्यक अनुदान (वेतन)” या लेखाशिर्षाखाली माहे जून, २०२४ च्या सुधारित अर्थसंकल्पात उपरोक्त लेखाशिर्षाखाली रु.८७५.७० कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली असून रु.४९५.६४०७ कोटी तरतूद माहे जुलै, २०२४ पर्यंतच्या वेतनासाठी संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना वितरीत करण्यात आलेली आहे.
२. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संदर्भ क्र.०८ च्या पत्रान्वये माहे जुलै, २०२४ पर्यंतचे प्रलंबित वेतनाकरीता रु.१९.०३२५ कोटी, वैद्यकीय देयक, ७ वा वेतन आयोग हप्ता व महागाई भत्ता वेतनाकरीता रु.१९०३२५ कोटी, वैद्यकीय देयक, ७ या वेतन
रु.१०१.४६२८ कोटी असे एकूण रु.१४२.१४१८ कोटी इतका निधी वितरीत करण्याबाबत विनंती केलेली आहे.
उक्त विनंतीनुसार विजाभज प्रवर्गाच्या आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे जुलै, २०२४ पर्यंतचे प्रलंबित वेतन, वैद्यकीय देयक, ७ वा वेतन आयोग हप्ता व महागाई भत्ता व माहे ऑगस्ट, २०२४ चे वेतन याकरीता एकूण रु.१४२.१४१८ कोटी (अक्षरी रुपये एकशे बेचाळीस कोटी चौदा लक्ष अठरा हजार फक्त) इतका निधी संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना या ज्ञापनान्वये वितरीत करण्यात येत आहे.
३. अपर मुख्य सचिव (वित्त) यांचेकडे दि.६/०५/२०२४ रोजी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होण्याच्या अनुषंगाने आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी वापरलेल्या कार्यपध्दतीप्रमाणे विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी निधी वितरणाचे टप्पे कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी उक्तप्रमाणे वितरीत निधी वितरणाचे जिल्हानिहाय नियोजन करुन सदरची तरतुद सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांच्या मागणीप्रमाणे तात्काळ वितरित करावी. तसेच आश्रमशाळा कर्मचारी वेतनापासून वंचित राहू नये याकरीता उक्त अनुदानातून आश्रमशाळेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनाचीच देयके प्राथम्यक्रमाने अदा करावीत. वेतन अनुदानातून अन्य देयके अदा करुन वेतनासाठी अनुदान कमी पडल्याची बाब/सबब शासनस्तरावर विचारात घेतली जाणार नाही. याबाबत सर्व सहाय्यक संचालक यांना तशा स्वयंस्पष्ट सूचना द्याव्यात.
४. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना याद्वारे असेही निर्देशित करण्यात येते की, दरमहा वेतनाकरीता निधी उपलब्ध करुन देण्याबाबत नस्ती दि.१५ तारखेपूर्वी वित्त विभागास सादर करावयाची असते. तत्पूर्वी, दरमहा वेतनासाठी उपलब्ध करुन दिलेला निधी खर्च होणे आवश्यक आहे. सबब, या ज्ञापनाद्वारे वितरीत केलेल्या निधीतून दि.१०/०९/२०२४ पुर्वी विजाभज प्रवर्गाच्या आश्रमशाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन देयके पारित करण्याबाबत संबंधित सर्व सहायक संचालक यांना स्पष्ट निर्देश देण्यात यावे. ज्या सहायक संचालक यांचेकडून विहीत वेळेत निधी खर्च होणार नाही, त्यांना पुढील महिन्याच्या वेतनाकरीता निधी उपलब्ध करण्यात येऊ नये. तसेच त्यांचेकडून विलंबाबात स्वयंस्पष्ट व समर्पक खुलासा मागवून शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करण्यात यावी.
५. सदरहू ज्ञापन वित्त विभाग, अनौपचारिक संदर्भ क्र.८५३/व्यय-१४, दि.२/०९/२०२४ अन्वये प्राप्त मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने