कला प्रकारात सहभागी होणा-या इ.१० वी मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत arts vishesh pravinya vadhiv gun 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कला प्रकारात सहभागी होणा-या इ.१० वी मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत arts vishesh pravinya vadhiv gun 

शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणा-या इ.१० वी मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत…

संदर्भ :- १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१६/प्र. क्र.२०२/एसडी २

दिनांक २४/११/२०१७ २) संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र. सां.का.सं/४९८३, दिनांक

०४/१२/२०१९ ३) शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग क्र. संकीर्ण-८२१९/ प्र. क्र.२८६/सां. का.-४ दिनांक १०/१२/२०१९

४) राज्यमंडळ कार्यालयाचे पत्र जा क्र.रा.मं/परीक्षा-७/६२४६, दिनांक १८/१२/२०१९ ५) परिपत्रक क्र. मुविमं/माध्यमिक परीक्षा/उच्च माध्यमिक परीक्षा ३३३३/दि. १/१२/२०२२

६) राज्यमंडळ कार्यालयाचे क्र.रा.मं./ परीक्षा ७/२७२७ दि.०९/०७/२०२४ रोजीचे पत्र

उपरोक्त संदर्भिय विषयास अनुसरून सर्व मान्यताप्राप्त शाळाप्रमुखांना कळविण्यात येते की, शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणा-या इ.१० वी मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ठ

विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत आपल्या स्तरावर खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

१) सर्व माध्यमिक शाळांनी संदर्भ १ मध्ये नमूद शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांमार्फत प्रस्ताव दि.२५ डिसेंबर २०२४ पर्यंत स्विकारावेत व दिनांक १५ जानेवारी २०२५ पर्यंत विभागीय मंडळाकडे विहित शुल्कासह कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

२) चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच दिनांक ०९/०७/२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील संस्थांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

३) शास्त्रीय कला यामध्ये दोन वेगवेगळया संस्थामधून विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केल्या असल्यास दोन्ही संस्था शासन निर्णयामध्ये नमूद असलेल्या यादीमध्ये असणे आवश्यक आहे. दोन संस्थांमधून परीक्षा दिल्या असल्यास ३ री/५ वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या संस्थेने आधीच्या अन्य संस्थांकडील (शासन निर्णयात नमूद असलेल्या) प्रमाणपत्र प्रमाणित करणे आवश्यक आहे.

अ) शासन निर्णयानुसार ३ री व ५ वी परीक्षा ही विद्यार्थ्याने ७ वी ते १० वी या इयत्तांमध्ये शिकत असताना उत्तीर्ण केलेली असावी.

ब) शासन निर्णयानुसार गुणपत्रक १ ते ३/१ ते ५ अशा सर्व परीक्षांचे प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक आहे. तसेच प्रमाणपत्र किमान ३या/५ व्या परीक्षेचे आवश्यक राहील.

क) कला सवलत गुणांसंदर्भात शाळांनी शासन निर्णयातील तरतूदीनुसार परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी पालक/विद्यार्थी/संस्थांना सहकार्य करावे. विद्यार्थी / पालक/संस्था यांनी थेट विभागीय मंडळांशी संपर्क न साधता शाळेकडे प्रस्ताव सादर करावा व शाळेने विहीत मुदतीत विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करावा.

ड) सोबतचे परिशिष्ट ‘अ’ प्रपत्रावर संबंधित संस्थांनी संस्थेचा शिक्का व स्वाक्षरी करावी. तसेच प्रस्ताव परिपूर्ण असल्याबाबत सोबतचे हमीपत्र भरून दयावे,

४) कोणताही पात्र विद्यार्थी कला सवलतीच्या अतिरिक्त गुणांपासून वंचित राहणार नाही, तसेच याबाबत पालक/विद्यार्थी/ संस्था यांना कोणतीही अडचण येणार नाही अथवा तक्रारी प्राप्त होणार नाहीत, याबाबत दक्षता घेण्यात यावी.

५) विद्यार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्तावच सादर करावेत, प्रस्ताव अपूर्ण असल्यास, गुणदान न मिळाल्यास शाळाप्रमुख म्हणून आपली जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी.

६) एखादा विद्यार्थी क्रिडा, शास्त्रीय कला (गायन, वादन, नृत्य), चित्रकला व लोककलेतील सहभाग यापैकी एका पेक्षा जास्त क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करीत असला तरी कोणत्याही एकाच क्षेत्रासाठी सवलतीचे गुण जे उच्चतम आहेत तेच घेण्यासाठी विद्यार्थ्यास शाळेमार्फत प्रथम प्राधान्याने कळविण्यात यावे. व कोणत्याही एकाच कला प्रकारासाठी एकच प्रस्ताव सादर केला जाईल याची शाळा प्रमुखांनी दक्षता घ्यावी,

७) तथापि एखाद्या विद्यार्थ्यांचे एकापेक्षा जास्त कला, क्रीडा चे प्रस्ताव सादर केल्याचे निदर्शनास आल्यास ज्या प्रकारासाठी

सवलतीचे गुण जे उच्चतम आहेत ते गुण प्राह्य धरण्यात येतील याची नोंद घ्यावी.

८) तसेच संदर्भात नमूद क्रमांक ५ वरील परिपत्रकानुसार कला, क्रिडा प्रस्ताव मंडळाकडे सादर करताना छाननी शुल्क म्हणून रु.२५/- प्रति विद्यार्थी चलनाद्वारे किंवा रोख भरणा प्रस्तावा सोबत करणे आवश्यक आहे.

९) अपूर्ण प्रस्ताव सादर केल्याचे आढळल्यास ते रद्द करण्यात येतील व त्याप्रित्यर्थ जमा केलेले छाननी शुल्क परत केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

१०) परिपूर्ण प्रस्ताव सादर करताना पत्रात प्रस्तावांची एकूण संख्या कला, क्रीडा प्रकारानिहाय नमूद करुन एकूण रक्कम लिहिणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी. खालील उदाहरणाप्रमाणे प्रस्तावासोबतच्या पत्रात नोंद करणे.

शासन परिपत्रक येथे पहा Click here