विद्यार्थ्यांसाठी कला-उत्सव सन २०२४-२५ आयोजित स्पर्धा पुढे ढकलण्याबाबत कला उत्सव मार्गदर्शक सूचना arts utsav guidelines 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्यार्थ्यांसाठी कला-उत्सव सन २०२४-२५ आयोजित स्पर्धा पुढे ढकलण्याबाबत कला उत्सव मार्गदर्शक सूचना arts utsav guidelines 

माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला- उत्सव सन २०२४-२५

आयोजित स्पर्धा पुढे ढकलण्याबाबत…. संदर्भ: १. एन सी ई आर टी, नवी दिल्ली यांच्याकडील कला उत्सव मार्गदर्शक सूचना.

२. या कार्यालयाचे पत्र जा. क्र. मराशैसंप्रप/कला क्रीडा/ कला उत्सव/२०२४- २५/०४२८४ दि.११ सप्टेंबर २०२४.

३. मा. संचालक, प्रस्तुत कार्यालय यांच्या मान्य टिपणी दि. ०३/१०/२०२४ नुसार.

४. या कार्यालयाचे पत्र जा. क्र. मराशैसंप्रप/कला क्रीडा/ कला उत्सव/२०२४-

२५/०४७१५ दि. २४/०९/२०२४ उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रानुसार, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत सन २०१५-१६ पासून कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे.

तसेच उपरोक्त संदर्भ क्र. २ या परिषदेकडील पत्रानुसार प्रथम प्राचार्य, सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि मुंबईसाठी प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई यांनी त्यांच्या जिल्ह्यात जिल्हास्तर स्पर्धेचे प्रत्यक्ष स्वरूपात आयोजन करावयाचे आहे, असे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये कला उत्सव स्पर्धांचे आयोजन केलेले होते. तसेच राज्यस्तरावर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची नामांकनेही सर्व जिल्ह्यातून प्राप्त झाली आहेत.

उपरोक्त संदर्भ क्र.४. नुसार राज्यस्तर कला उत्सव स्पर्धा सन २०२४-२५ दि.१६/१०/२००२४ ते दि.१८/१०/२०२४ या कालावधीत आयोजित करणे बाबत आपणास कळविण्यात आलेले होते.

परंतु काही अपरिहार्य कारणास्तव दि. १६ ते १८ ऑक्टोबर २०२४ ऐवजी राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धा दि. १२ नोव्हेंबर २०२४ ते दि. १४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत.

सदर स्पर्धाचे सुधारित वेळापत्रक व मार्गदर्शक सूचना आपणास स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येतील.

उपरोक्त नुसार राज्यस्तर कला उत्सव स्पर्धा सन २०२४-२५ च्या आयोजनाच्या सुधारित तारखांबाबत आपल्यास्तरावरून जिल्ह्यातील सहभागी शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांना कळविण्यात यावे.