जिल्हा परिषद शाळेतील पदोन्नती प्राप्त मुख्याध्यापकांना रजेचे रोखीकरण बाबत arjit leave 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषद शाळेतील पदोन्नती प्राप्त मुख्याध्यापकांना रजेचे रोखीकरण बाबत arjit leave 

विषयः- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल अर्जित रजा अनुज्ञेय करणे व अशा संचित अर्जित रजेचे रोखीकरण करण्याबाबत

संदर्भ:-१. शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०२०/प्र.क्र.७६/आस्था-१४, दि.०६.१२.२०२२

२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांचे जा.क्र.जिपबी/शिविप्रा/ प्रावि १ब/कावि/०१२२/२०२३ दि.२०.०४.२०२३ चे पत्र

उपरोक्त शासन निर्णयाचे कृपया अवलोकन व्हावे.

२. संदर्भ क्र.२ येथील पत्रान्वये बीड जिल्हा परिषदेकडून शासन निर्णय दि.०६.१२.२०२२ नुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांना दिर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल अर्जित रजा केव्हापासून अनुज्ञेय करावे, तसेच अनेक जिल्हा परिषद शिक्षकांकडून सदर शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वीच्या अर्जित रजांच्या रोखीकरणाची मागणी करण्यात येत आहे, याकरिता शासनाने मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे.

३. या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषदांना असे कळविण्यात येते की, बीड जिल्हा परिषदेने उपस्थित केलेल्या मुद्याच्या अनुषंगाने उपरोक्त नमूद दि.०६.१२.२०२२ रोजीच्या शासन निर्णयात अधिक स्पष्टता येणे आवश्यक आहे. यास्तव, सदर शासन निर्णयात सुधारणा करण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन आहे. यास्तव शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत शासन निर्णय दि.०६.१२.२०२२ ची अंमलबजावणी करण्यात येवू नये.

शासन निर्णय pdf येथे पहा

👉👉pdf download 

3 thoughts on “जिल्हा परिषद शाळेतील पदोन्नती प्राप्त मुख्याध्यापकांना रजेचे रोखीकरण बाबत arjit leave ”

Leave a Comment