प्राथ.शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य anukamp teacher tet compalsary 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथ.शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य anukamp teacher tet compalsary 

प्रस्तावना –केंद्र शासनाने दिनांक ३१.०३.२०१० च्या अधिसूचनेव्दारे शिक्षक पदांवर नियुक्तीसाठी पात्रता व सेवाशर्ती ठरविण्याकरीता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने दिनांक २३ ऑगस्ट, २०१० च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरीता (इ.१ ली ते इ.८ वी) किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय दिनांक १३.०२.२०१३ व शुद्धिपत्रक दिनांक ०६.०३.२०१३ द्वारे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांकरीता (इ.१ ली ते इ.८ वी) शिक्षकांची किमान व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासनाद्वारे घेण्यात येत असलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली आहे. शासन निर्णय दिनांक २०.०१.२०१६ अन्वये अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत घेण्यात आलेला निर्णय राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केलेल्या अर्हतेशी विसंगत आहे. यास्तव अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याबाबतची तरतूद करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय –

अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे तरतूदी करण्यात येत आहेतः-

१. शासन निर्णय दि.२०.०१.२०१६ मधील परिच्छेद क्र. ३ मधील “मात्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) व केंद्रिय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्यांस सवलत राहील” हा मजकूर वगळण्यात येत आहे.

शिक्षणसेवक या पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना ग्राह्य धरावयाच्या शैक्षणिक अर्हतेविषयी.

महोदय,

अनुकंपा तत्वाने शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देतांना संबंधित उमेदवारास शिक्षक पात्रता परीक्षा (TET) व केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्यांस सवलत राहील किंवा कसे याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे अभिप्राय घेण्यात आले होते.

२. त्यानुसार शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने (शालेय शिक्षण) पुढील प्रमाणे अभिप्राय दिले आहेत. “प्राथमिक शिक्षक पदासाठी TET उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. दि. २०.१.२०१६ च्या शासन निर्णयाने उद्भवलेली त्रुटी दूर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षकांची अर्हता NCET ने निश्चित केली असून तिचे पालन करणे बंधनकारक आहे. सबब इतर बाबींसोबत अनुकंपा नियुक्ती देतांना उमेदवार TET उत्तीर्ण असण्याची दक्षता घेण्यात यावी.”

३. तरी अनुकंपा तत्वाअंतर्गत शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देतांना शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे वरील अभिप्राय विचारात घेवून पुढील कार्यवाही करावी.