अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय/परिपत्रक यांचे एकत्रिकरण anukamp all shasan nirnay
शासकीय सेवेत असताना कर्मचारी/अधिकारी दिवंगत झाल्यास किंवा गंभीर आजार, अपघात
यामुळे शासकीय सेवा करण्यास वैद्यकीय दृष्ट्या कायमचा असमर्थ ठरल्यामुळे रुग्णता सेवा निवृत्त झाल्यास
त्याच्या कुटुंबावर ओढावण्या-या आर्थिक आपत्तीत कुटुंबियांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने सन
१९७६ साली प्रथमतः अनुकंपा नियुक्तीची योजना लागू केली. या योजनेमध्ये शासन निर्णय, दि.
२६.१०.१९९४ अन्वये अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबतची सुधारित नियमावली विहीत करण्यात आली व
त्यामध्ये वेळोवेळी संदर्भाधीन शासन निर्णय/परिपत्रकांन्वये दुरुस्त्या करण्यात आल्या व नवीन तरतुदी
समाविष्ट करण्यात आल्या. सदर तरतुदी एकत्रित स्वरुपात नसल्यामुळे अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबतची
कार्यवाही करताना नियुक्ती प्राधिकारी यांना अडचणी निर्माण होतात तसेच प्रकरणपरत्वे निर्णय घेताना
विसंगती निर्माण होण्याची शक्यता असते. सदर बाब विचारात घेता संदर्भाधीन शासन निर्णय व शासन
परिपत्रकांमधील सर्व महत्वाच्या तरतूदी एकत्रित करुन त्या एकाच आदेशात नमूद केल्या तर कार्यवाही
करताना सुलभ जाईल. त्यामुळे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने सर्व शासन निर्णय/शासन परिपत्रकामधील
एकत्रित तरतुदी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्यांचे संकलन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
यानुसार अनुकंपा नियुक्ती योजनेसंबंधी शासन निर्णय, सा.प्र.वि., दि. २६.१०.१९९४ व त्यानंतर वेळोवेळी
निर्गमित करण्यात आलेल्या संदर्भाधीन सर्व शासन निर्णय/शासन परिपत्रकांचे एकत्रीकरण करुन
सर्वसमावेशक आदेश पुढीलप्रमाणे देण्यात येत आहेत:-
पृष्ठ २८ पैकी ३
शासन निर्णय क्रमांकः अकंपा १२१७/प्र.क्र.१०२/आठ
शासन निर्णय :
१. राज्य शासकीय कर्मचा-यांच्या पात्र वारसदारांना लागू असलेल्या अनुकंपा नियुक्ती योजनेसंबंधी निर्गमित करण्यात आलेल्या सर्व आदेशांचे अधिक्रमण करुन सुधारित आदेश दि. २६.१०.१९९४ रोजी निर्गमित केले आहेत. अनुकंपा नियुक्ती योजनेसंबंधी शासन निर्णय, सा.प्र.वि., दि. २६.१०.१९९४ व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या संदर्भाधीन सर्व निर्गमित झालेले शासन निर्णय/परिपत्रके यामधील महत्वाच्या एकत्रित तरतुदी सोबतच्या परिशिष्ट ‘अ’ नुसार असतील. संदर्भाधिन शासन निर्णय व परिपत्रकांमधील आदेशांचे एकत्रिकरण करतांना मूळ तरतूदी जश्याच्या तश्या घेण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अनुकंपा नियुक्ती देतांना काही अडचणी उदभवल्यास उपरोक्त संदर्भाधीन मूळ शासन निर्णय व परिपत्रकांचे अवलोकन करावे.
२. दिवंगत शासकीय कर्मचा-याच्या कुटुंबियाने करावयाचा अर्ज व तत्संबंधीची माहिती सोबतच्या परिशिष्ट ‘ब’ नुसार असेल.
३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दि. २०.१२.१९९६ मध्ये नमूद केलेली अनुकंपा नियुक्तीसाठी गट-क मधील कार्यकारी पदांची यादी सोबतच्या परिशिष्ट ‘क’ नुसार असेल.
४. अनुकंपा नियुक्तीसाठी नियुक्ती प्राधिकारी यांनी ठेवावयाच्या प्रतीक्षासूचीचे प्रारुप परिशिष्ट ‘ङ’ नुसार असेल.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०९२११५०८४८५२०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(शासन निर्णय क्रमांक: अकंपा १२१७/प्र.क्र.१०२/आठ, दिनांक २१ सप्टेंबर, २०१७.)
(शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दि. २६.१०.१९९४ व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय/शासन परिपत्रकान्वये विहीत केलेली अनुकंपा कारणास्तव शासकीय सेवेत नोकरी देण्याबाबतची एकत्रित नियमावली)
१. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व कार्यालयात अनुकंपा कारणास्तव करावयाच्या नेमणूकांना हे नियम लागू राहतील.
२. अनुकंपा नियुक्ती योजनेसंदर्भातील तरतुदी ह्या केवळ शासकीय कर्मचा-यांपुरत्याच सीमीत आहेत. सदर तरतुदी ह्या जिल्हा परिषदा / नगरपालिका / महानगरपालिका / महामंडळे / प्राधिकरणे / व्यापारी उपक्रम व इतर तत्सम आस्थापनावरील कर्मचा-यांना थेट लागू होणार नाहीत. त्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागाने स्वतंत्रपणे निर्णय घेणे आवश्यक राहील.
३. अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबतच्या तरतूदी खालीलप्रमाणे आहेत:-
(१) अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ खालील शासकीय कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियांना अनुज्ञेय राहील:-
(अ) शासकीय कर्मचाऱ्यांना (रुपांतरीत स्थायी व अस्थायी आस्थापनेवरील शासकीय कर्मचारी धरून) (शासन, निर्णय, दि. २६.१०.१९९४)
(आ) सेवा नियमित केलेल्या परंतु अधिसंख्य पदावर कार्यरत असलेले कर्मचारी.
(शासन निर्णय, दि. १०.७.२००९)
(२) शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या पात्र नातेवाईकांना खालील नमूद परिस्थितीत अनुकंपा तत्वावर नियुक्ती लागू राहील:-
(अ) शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट-क व गट ड संवर्गातील कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियांनाच अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुज्ञेय राहील. (शासन निर्णय, दि. २२.०८.२००५)
(आ) गट अ/ब/क/ड मधील शासकीय अधिकारी अथवा कर्मचा-यास नक्षलवादी आतंकवादी/ दरोडेखोर/समाज विघातक यांच्या हल्यात/कारवाईत मृत्यू आल्यास अथवा शासन सेवेत कार्यरत असतांना स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रत्यक्ष कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडल्यास अशा अधिका-यांच्या व कर्मचा-यांच्या कुटुंबियातील पात्र व्यक्तीस, अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना, त्यांचे नाव अनुकंपाधारकांच्या सामान्य प्रतीक्षासूचीमध्ये न घेता, त्यांची वेगळी यादी करुन पद उपलब्ध असल्यास, रिक्त पदांच्या ५ टक्के मर्यादेची (१० टक्के शासन निर्णय दि. १ मार्च, २०१४) अट शिथील करुन त्यांना सर्व प्राथम्याने अनुकंपा नियुक्ती देण्यात यावी. (शासन शुध्दीपत्रक दि. १७.०९.२०१२)
(इ) गट अ/ब/क/ड मधील जे शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी नक्षलवादी / आतंकवादी/ दरोडेखोर/समाजविघातक यांच्या हल्यात/कारवाईमध्ये कायमस्वरुपी जायबंदी झाले आहेत व त्यांनी स्वतःहून शासकीय सेवा सोडून देण्याची लेखी अनुमती दिली आहे अशा अधिकारी/कर्मचा-
पृष्ठ २८ पैकी ६
शासन निर्णय क्रमांकः अकंपा १२१७/प्र.क्र.१०२/आठ
यांच्या पात्र कुटुंबियातील एका व्यक्तीस अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या ५ टक्के (१० टक्के- शासन निर्णय दि. १ मार्च, २०१४) मर्यादेमध्ये प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी. (शासन निर्णय, दिनांक १७.७.२००७)
(३) खालील दर्जाच्या पदावर अनुकंपा नियुक्ती देय राहील :-
(अ) राज्य शासनांतर्गत कोणत्याही गट-क आणि गट-ड मधील सरळ सेवेच्या पदांवर त्या पदाच्या सेवाप्रवेश नियमातील विहीत शैक्षणीक अर्हता असल्यास अशी नियुक्ती देता यईल.
(शासन निर्णय, दि. २६.१०.१९९४ व दि. २८.०३.२००१)
(आ) ह्या नियमानुसार नियुक्ती मिळण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेस बसण्याची आवश्यकता नाही तसेच सदर पदावर अनुकंपा नियुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सल्ला घेण्याची आवश्यकता असणार नाही. मात्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, मोटार वाहन उप निरीक्षक, रेंज वन अधिकारी, कनिष्ठ अभियंता, सहायक वैद्यकीय अधिकारी, इ. गट-क मधील कार्यकारी (एक्झिक्युटीव) पदावर तसेच मंत्रालयातील सहायक पदावर नियुक्ती देता येणार नाही. तसेच निवडमंडळाचा सल्ला घेणे आवश्यक नाही. (शासन निर्णय, दि. २६.१०.१९९४ व दि. २१.११.१९९७)
(इ) लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदाखेरीज अन्य गट-क’ मधील कार्यकारी पदांवर नियुक्ती देण्यात यावी मात्र अशी नियुक्ती ही त्या पदांसाठी सेवा प्रवेश नियमानुसार सरळ सेवा भरतीची तरतुद आहे अशाच पदांवर देण्यात यावी. (उदाहरणादाखल काही कार्यकारी पदांची यादी- परिशिष्ट क) (शासन निर्णय, दि. २०.१२.१९९६)
(४) अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र कुटुंबिय:-
(अ) अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी खालील नमूद केलेले नातेवाईक पात्र राहतील व त्यापैकी
एका पात्र नातेवाईकास नियुक्ती अनुज्ञेय राहील.
(१) पती/पत्नी,
(२) मलगा/मलगी (अविवाहीत / विवाहीत मत्यपर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला
(२) मुलगा/मुलगी (अविवाहीत/विवाहीत), मृत्यूपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला मुलगा/मुलगी (अविवाहीत/विवाहीत)
(३) दिवंगत शासकीय कर्मचा-याचा मुलगा हयात नसेल किंवा तो नियुक्तीसाठी पात्र नसेल तर त्याची सून
(४) घटस्फोटित मुलगी किंवा बहीण, परित्यक्ता मुलगी किंवा बहीण, विधवा मुलगी किंवा बहीण,
(५) केवळ दिवंगत अविवाहीत शासकीय कर्मचा-यांच्या बाबतीत त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असणारा भाऊ किंवा बहीण (शासन निर्णय, दि. २६.१०.१९९४ व दि. १७.११.२०१६)
(आ) मृत अधिकारी/कर्मचा-यांच्या पति/पत्नी ने कोणाची अनुकंपा तत्वावर नियुक्ती करावी याबाबत नामांकन देणे आवश्यक राहील. मृत अधिकारी/कर्मचा-यांचे पती/पत्नी हयात नसल्यास त्याच्या/तिच्या सर्व पात्र कुटुंबियांनी एकत्रित येऊन कोणाची नियुक्ती करावी याबाबत नामांकन करावे. (शासन निर्णय, दि. १७.०७.२००७)
पृष्ठ २८ पैकी ७
शासन निर्णय क्रमांकः अकंपा १२१७/प्र.क्र.१०२/आठ
(५) कुटुंबाची हलाखीची परिस्थिती
(अ) अनुकंपा तत्वावर नियुक्तीकरिता मासिक उत्पन्नाची तसेच ठोक रकमेची मर्यादा यापुढे राहणार नाही. (शासन निर्णय, दि. २६.१०.१९९४)
(आ) अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना असे प्रस्ताव शासन सेवेतील रोजगारावर असलेली मर्यादा, या योजनेच्या मागील भूमिका लक्षात घेऊन जो कर्मचारी मृत झाला आहे त्याच्या कुटुंबियांना तात्काळ उदभवणा-या आर्थिक पेचप्रसंगावर मात करण्याच्या उद्देशाने विचारात घ्यावेत. (शासन निर्णय, दि. २६.१०.१९९४)
(इ) दिवंगत शासकीय कर्मचा-याचा नातेवाईक पूर्वीच सेवेत असेल तथापि तो त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना आधार देत नसेल तर अशा प्रकरणात त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे किंवा कसे हे ठरविताना नियुक्ती प्राधिका-यांनी अत्याधिक दक्षता घ्यावी, जेणेकरुन सेवेत असलेला सदस्य कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत नाही या नांवाखाली अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा दुरुपयोग केला जाणार नाही.
यासंदर्भात नियुक्ती प्राधिका-याने मिळणा-या निवृतीवेतनाची रक्कम, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, त्याची मालमत्ता/दायित्व, गंभीर आजारामुळे अथवा अपघातामुळे मृत झाला असल्यास त्यासाठी करण्यात आलेला वैद्यकीय खर्च, कुटुंबातील मिळवत्या व्यक्ती इत्यादी बाबी विचारात घेणे अपेक्षित आहे. (शासन निर्णय, दि. २६.१०.१९९४)
(६) लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र :-
दिनांक ३१ डिसेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबियास अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र समजले जाणार नाही. (शासन निर्णय, दि. २८/३/२००१)
(७) योजनेची माहिती देण्याची जबाबदारी :-
(अ) आस्थापना अधिका-याने अनुकंपा तत्वावर नियुक्तीच्या योजनेची माहिती (योजनेचा उद्देश, पात्र नातेवाईक, अर्ज करण्याची मुदत, शैक्षणिक अर्हता, टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत, अर्ज विहीत नमून्यात भरणे इ. माहिती) शासकीय कर्मचा-याच्या मृत्यूनंतर १५ दिवसानंतर किंवा कुटुंबनिवृत्तीवेतनाची कागदपत्रे पाठविताना शासकीय कर्मचा-यांच्या कुटुंबियांना त्वरीत उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तसेच सदर माहिती मिळाल्याबाबत कुटुंबाकडून पोच घेणे आवश्यक आहे. (शासन निर्णय, दि. २३.०८.१९९६ व शासन परिपत्रक दि.५.२.२०१०)
(ब) दिवंगत शासकीय कर्मचा-याचा पात्र वारसदार सज्ञान नसेल तर तो सज्ञान झाल्यानंतर एक वर्षाच्या आत अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी अर्ज करु शकेल मात्र तो सज्ञान झाल्यावर त्याने असा अर्ज करणे अपेक्षित आहे हे देखील कुटुंबनिवृत्तीवेतन धारकाला कुटुंब निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रांची पूर्तता करतेवेळी लेखी कळविणे संबंधित आस्थापना अधिका-यावर बंधनकारक राहील. (शासन निर्णय, दि. २०.०५.२०१५)