अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे व इतर विषयांबाबतचा मंत्रीमंडळाचा प्रस्ताव anudanacha vadhiv tappa 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे व इतर विषयांबाबतचा मंत्रीमंडळाचा प्रस्ताव anudanacha vadhiv tappa

संदर्भ :- समक्रमांकाचे शासन पत्र, दिनांक ११ जुलै, २०२४

उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन पत्र कृपया पहावे.

२. यापूर्वी अनुदानाच्या विविध टप्प्यावर वेतन अनुदान घेत असलेल्या राज्यातील खाजगी अंशतः अनुदानित शाळा/ तुकड्यांवरील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर करणे व अन्य विषयांबाबतच्या मंत्रीमंडळ टिप्पणीस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास अभिप्रायार्थ सादर करण्यात आला असता, वित्त विभागाने काही मुद्ये उपस्थित केले असून याबाबतची माहिती घेऊन प्रस्ताव फेरसादर करण्याबाबत सूचित केले आहे.

३. वित्त विभागाने उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या कार्यालयातील संबंधित अधिकारी यांच्यासह आपण गुरुवार, दिनांक २५.०७.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता उप सचिव (श्री. सावंत) यांच्या दालनात उपस्थित राहावे, ही विनंती.

Leave a Comment