जि.प.शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/निवृत्तीवेतन व आयोगाचा ५ वा हप्ता,महागाई भत्ता आस्थापना अनुदाने anudan granted dearness allowance
संदर्भः
– १) वित्त विभाग शासन परिपत्रक क्रं. अर्थसं २०२४/प्र.क्र.३४/अर्थ-३ दि.१.४.२०२४
२) शालेय शिक्षण व क्रिडा विभाग अनुवि ४९२४/ (३५/२४)/अर्थसंकल्प दि.३.४.२०२४
३) मा. आयुक्त, यांचेकडील क्र. अंदाज-१८४/२४-२५/अनुवित/२४२८ दि.३.४.२०२४
४) या कार्यालयाचे ज्ञापन क्रमांक १ दिनांक ४.४.२०२४
५) या कार्यालयाचे ज्ञापन क्रमांक २ दिनांक ८.४.२०२४ ६) या कार्यालयाचे ज्ञापन क्रमांक ३ दिनांक २६.४.२०२४
७) या कार्यालयाचे ज्ञापन क्रमांक ४ दिनांक २९.४.२०२४
८) या कार्यालयाचे ज्ञापन क्रमांक ५ दिनांक २०.५.२०२४
९) या कार्यालयाचे ज्ञापन क्रमांक ६ दिनांक ३०.५.२०२४
१०) या कार्यालयाचे ज्ञापन क्रमांक ७ दिनांक २०.६.२०२४
११) या कार्यालयाचे ज्ञापन क्रमांक ८ दिनांक २१.६.२०२४
सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील माहे जुलै, २०२४ या महिन्याचा वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन, सातव्या वेतन
आयोगाचा ५ वा हप्ता, महागाई भत्ता याबाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या
तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत
जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे.
उपरोक्त निधी खालील अटोच्या अधीन राहून खर्च करणेबाबत संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात
येल आहे.
अ) ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे. त्याव्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही.
आ) सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिका-यांन लेखाशिर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा १० तारखेपर्यंत सादर करावा. तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा
इ) वेतन अनुदानाची चकचाकी अदा करताना अनुक्रमांक ४ नियम ३९ (ब) टिप-४ अनुक्रमाक ५नियम ३९
(ब) टिप-५तसेच अनुक्रमांक ६ नियम ४ प्रमाणे सक्षम प्राधिका-यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे.
वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीमधून आपल्यास्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये. वरीलप्रमाणे टिप :- वितरीत केलेले अनुदान केवळ वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन, सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता भविष्य निर्वाह निधी क्रमांक असणा-या कर्मचा-यांना त्यांच्या भनिनि खात्यात जमा व ज्या कर्मचा-यांचे डीसीपीएस/एनपीएस खाते आहे अशांना रोखीने अदा करणे, जानेवारी २०२४ ते जून २०२४ अखेरचा महागाई भत्ता फरक तसेच नियमित वेतनासाठी
मंजूर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेोल्या आहेत. तसेच सदरचे ज्ञापन (Scancopy) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व यांच्या शालेय पोषण आहार योजना व सर्व शिक्षा अभियान यांच्या ई-मेलवर देण्यात आलेली आहे.
असून यामधून अन्य कोणतेही देयक अदा करण्यात येऊ नये.