वर्ग ५ वी ८ वी वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर annual exam time table 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
annual exam time table 
annual exam time table

वर्ग ५ वी ८ वी वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर annual exam time table 

विषय : STARS प्रकल्प – नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन २ व इयत्ता ५ वी व ८वी वार्षिक परीक्षा आयोजनाबाबत….

संदर्भ : १. राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching-Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत प्रकल्प मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ११ फेब्रुवारी 2029

२. राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching – Learning And Results for States) केंद्र पुरस्कृत प्रकल्प राज्य अनुदान वितरण वित्तीय नियमावली मार्गदर्शक तत्वे.

३. STAR प्रकल्प अतर्गत मंजूर PAB मिटिंगचे इतिवृत्त, दि. ३ मे २०२३

४. शासन निर्णय ०७ डिसेंबर २०२४

वरील विषयान्वये संदर्भ क्र. २ नुसार STARS प्रकल्प मधील SIG २ (Improved Learning Assessment systems) २.२ अंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यास अनुसरून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन – २ अशा तीन नियतकालिक चाचण्या एकूण दहा माध्यमात घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या तीन विषयांची इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन २ म्हणून सदर चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.

यास अनुसरून राज्यातील इयत्ता तिसरी ते आठवीच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (विद्यानिकेतन/सराव पाठशाळा, समाजकल्याण विभाग (शासकीय), आदिवासी विकास (शासकीय), जिल्हा परिषद, मनपा, नपा, नप, शासकीय सैनिकी शाळा, कटक मंडळ, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल) या शाळांमधील विद्यार्थ्याच्या व खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संकलित मूल्यमापनचे आयोजन

०२ ते ०४ एप्रिल २०२४ या कालावधीत घेण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक चाचण्यांचा / प्रश्नपत्रिकांचा पुरवठा राज्यस्तरावरून करण्यात येणार आहे.

तथापि सदर नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी दिनांक १७.०८.२०२३ ते १९.०८.२०२३ या कालावधीत घेण्यात आलेली आहे. तर संकलित मूल्यमापन चाचणी सत्र १ ही दिनांक ३०, ३१ ऑक्टोबर व १ डिसेंबर २०२३ या कालावधीत घेणेत आलेली आहे. संकलित मूल्यमापन – २ चे खालील प्रमाणे आयोजन करण्यात येणार आहे.

* संकलित मूल्यमापन – २ उद्देश :-

१) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे.

२) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूकता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करणे.

३) अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल.

४) विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची सद्यस्थिती समजण्यास मदत होईल.

वर्ग पाचवी व वर्ग आठवी वार्षिक परीक्षा वेळापत्रक येथे पहा👉👉pdf download 

Leave a Comment