जिल्हा परिषद समोर अन्नत्याग आंदोलनास सुरुवात annatyag andolan
🌷सदरील आंदोलन हे दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:00 वा पासून सुरू होईल
🌷महात्मा गांधी ,लालबहादूर शास्त्री व इतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून या आंदोलनाची सुरुवात होईल
🛑 सदरील आंदोलन हे बेमुदत असल्यामुळे जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तथा यावर ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे
अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित असलेली निवड वेतन श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी ची जवळपास सर्व प्रकरणी निकाली काढली आहेत
याबद्दल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी , माननीय शिक्षणाधिकारी , उपशिक्षणाधिकारी ,तसेच कार्यालयीन अधीक्षक व हे काम पूर्ण करण्यासाठी अविरतपणे काम करणारे श्री पंजाबराव खिल्लारे या सर्वांचे विशेष अभिनंदन
🌷🌷🌷🌷🌷
अन्नत्याग आंदोलनाची नोटीस दिली नसती तर सदरची संचिका अनेक कारणामुळे प्रलंबित राहणार होती आणि नंतर आचारसंहितेच्या लाल फीतीमध्ये अडकणार होती
परंतु प्रशासनाने दखल घेतल्याबद्दल हार्दिक आभार
🙏🏼🙏🏼🙏🏼
परंतु सदरील निवड वेतनश्रेणी यादीचे अवलोकन केले असता असे दिसून येत आहे की या यादीमध्ये मागील अनेक दिवसांपासूनचे प्रलंबित प्रस्ताव या यादीमध्ये निकाली काढलेले आहेत यामधील अनेक शिक्षक बांधव केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक , शिक्षक , हे आज रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना त्याच वर्षीच्या कोट्यामधून निवड वेतनश्रेणी मिळणे अपेक्षित होते
परंतु त्यामुळे नियमित यादी मधील आमचे अनेक शिक्षक बांधव हे 20% च्या नावाखाली प्रतीक्षा यादी मध्ये थांबलेले आहेत त्यामुळे या शिक्षकांवर अन्याय होत आहे
सबब सेवानिवृत्त शिक्षकांचा 20% च्या कोट्यामध्ये समावेश न करता या प्रतीक्षा यादी मध्ये असलेल्या उर्वरीत सर्व पात्र शिक्षकांना निवड वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे
*माध्यमिक शिक्षकांना निवड वेतन श्रेणी*
माध्यमिक शिक्षकांचे निवड वेतनश्रेणीचे प्रस्ताव मागील 4 वर्षापासून प्रलंबित आहेत ,यामध्ये एक वरिष्ठ अधिकारी देखील या निवड वेतनश्रेणी पासून वंचित आहेत
माध्यमिक शिक्षकांचे प्रस्ताव देखील मंजूर मंजूर करून या माध्यमिक शिक्षकांना न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यांत आली आहे
*पदोन्नती प्रक्रिया*
मुख्याध्यापक ,केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी इत्यादी संवर्गाची पदोन्नती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी
कारण जिल्ह्यामध्ये शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची 29 पैकी 14 पदे रिक्त आहेत
तालुका निहाय जर विचार केला तर रिक्त पदे खालील
तालूका मंजुर रिक्त
घनसावंगी 3 3
मंठा 2 1
परतूर 3 2
बदनापूर 3 1
भोकरदन 4 3
जालना 5 1
जाफ्राबाद 2 1
जालना जिप 4 1
अंबड 3 1
एकुण 29 14
इतपर जालना जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी पदांची एकूण आठ पदांपैकी सात 7 पदे ही रिक्त आहेत त्यामुळे सात शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे 07 गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार सोपवलेला आहे त्यामुळे ही सात पदे सुद्धा रिक्त असल्यासारखेच आहेत
तसेच केंद्रप्रमुखाची एकूण 106 पदे मंजूर आहेत , पैकी फक्त 35 केंद्रप्रमुख ग्रेडचे ग्रेड पात्र केंद्रप्रमुख आहेत बाकी पदभार हा त्या केंद्रातील पदवीधर किंवा मुख्याध्यापक यांच्याकडे सोपवलेला आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील पर्यवेक्षीय यंत्रणा ,व्यवस्थापकीय यंत्रणा व अध्यापनातील यंत्रणा यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे
पदभरामुळे शिक्षण विभागात काम करण्यास खूप मोठ्या अडचण निर्माण होत आहेत
पर्यायाने जालना जिल्ह्यामध्ये पर्यवेक्षकीय यंत्रणाच नसल्याने येथे अध्यापन व व्यवस्थापन करणाऱ्या शिक्षकांकडे व व्यवस्थापन करणाऱ्या मुख्याध्यापकाकडे पदभार देण्यात आल्यामुळे याचा थेट व्यवस्थापन आणि गुणवत्तेवर परिणाम होत आहे
ही बाब शिक्षण विभागासाठी अतिशय घातक आहे
यामुळे ही पदोन्नती प्रक्रिया तात्काळ पार पाडण्यात यावी अशी विनंती या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे
*जिल्हा अंतर्गत बदली*
महाराष्ट्र शासनाच्या 6 मार्च 2024 रोजी च्या शासन परिपत्रकाप्रमाणे व 15 मार्च 2024 रोजी च्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्रान्वये जिल्हा अंतर्गत बदल्या करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले असल्याने इच्छुक बदलीपात्र शिक्षक व विस्थापित शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात याव्यात
*आदर्श शिक्षक पुरस्कार*
मागील दोन वर्षापासून जिल्ह्यातील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत परंतु या आदर्श शिक्षकांना अजूनही पुरस्कार प्रदान करण्यात आलेले नाहीत त्यामुळे या शिक्षकांनमध्ये अपमानाची भावना निर्माण झालेली आहे त्यामुळे या शिक्षकांना आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात यावेत .
*DCPC मधून NPS मध्ये हिशोबवर्ग करणे*
जिल्हा बदलून आलेल्या शिक्षकांचा हिशोब हा डीसीपीएस मधून एनपीएस मध्ये वर्ग करण्यात यावा
या मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे
अरुण जाधव
राज्याध्यक्ष
महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समिती