समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणा-या सर्व शिष्यवृत्ती योजनांचे प्रस्ताव all samaj kalyan scholarship
उपरोक्त विषयान्वये आपणांस कळविणेत येते की, समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणा-या पुढील नमूद शिष्यवृत्ती योजनांचे प्रस्ताव प्रचलित पध्दतीने व विहीत प्रपत्र/नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह दि. ३०.०९.२०२२ अखेर आपले कार्यालयामार्फत संकलित स्वरूपात व पेनड्राईव्हमधील विहित नमुन्यातील माहितीसह या कार्यालयास सादर करणेत यावेत, विहीत मुदतीनंतर कोणत्याही प्रकारचे शिष्यवृत्ती प्रस्ताव या कार्यालयामार्फत स्वीकारण्यात येणार नाहीत याची नोंद घेणेत यावी व याबाबत आपले अधिनस्त सर्व शाळांना कळविण्यात यावे.
मा. कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय यांचेकडील पत्र क्र. दिव्यांग २०२२/प्र.क्र.७१/दि.क. २. दि.०६.०७.२०२२ मध्ये देणेत आलेल्या सूचनांनुसार सर्व शिष्यवृत्ती योजना आधारशी संलग्निकृत करून दि. ०१ जानेवारी २०२३ पासून DBT मार्फत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करणेबाबतचे निर्देश देणेत आलेले आहेत. त्याअनुषंगाने सन २०२२-२३ मधील शिष्यवृत्ती प्रस्ताव सादर करताना योजनेच्या अटीशर्तीनुसार पात्र विद्यार्थ्यांचे बँक खाते हे संबंधित विद्यार्थ्यांच्या आधारशी संलग्न केले असल्याची खातरजमा करण्याची दक्षता घेणेत यावी.
प्रत माहितीस्तव सविनय सादर –
१.
मा. सभापती, समाज कल्याण समिती, जिल्हा परिषद, रत्नागिरी.
२ . मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी
जिल्हा रस्सी फैल्याण अधिकारी जिल्हा परिषद, रत्नागिरी
३. मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.
प्रत माहिती तथा उचित कार्यवाहीस्तव –
शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा परिषद , रत्नागिरी-
२/– सर्व गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांना उपरोक्त नमूद सर्व शिष्यवृत्ती प्रस्ताव विहीत मुदतीत, विहीत नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह, दिनांक ३०.०९.२०२२ अखेर सादर करणेबाबत तसेच संबंधित विद्यार्थ्यांचे बैंक खाते त्यांच्या आधारशी संलग्न असल्याची खात्री करूनच प्रस्ताव सादर करणेबाबत आपले स्तरावरून आपले अधिनस्त शाळांना सूचना देणेत याव्यात. तसेच विहीत मुदतीनंतर शिष्यवृत्ती प्रस्ताव स्वीकारण्यात येणार नाहीत याबाबतदेखील सर्व शाळांना सूचना देणेबाबत कळविण्यात यावे.