सर्व प्रशासकीय विभागांचे संकेतस्थळ करण्यासंदर्भात समिती करणेबाबत all division create website
प्रस्तावना –
दि.०९ डिसेंबर, २०२४ रोजी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासकीय विभागाच्या सचिवांसमवेत आयोजित बैठकीचे इतिवृतामधील दिलेल्या निर्देशाप्रमाणे विनाविलंब कार्यवाही करून सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांचा किमान १०० दिवसांचा फलनिष्पत्तीचा अहवाल सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
विभागाचे संकेतस्थळ अद्ययावतीकरण, माहितीच्या दृष्टीने विभागाची अधिकतम माहिती संकेतस्थळावर प्रसिध्दी, उत्कृष्ठ कार्य करणा-या संकेतस्थळाची माहिती मंत्रिमंडळासमोर गौरवार्थ ठेवणे, प्रशासकीय विभाग व माहिती व तंत्रज्ञान विभाग यांच्या समन्वयाने Dedication Mechanism तयार करणे या संदर्भात मा. मुख्यमंत्री महोदयांनी कार्यवाही करण्याचे निदेश दिले आहेत. त्यानुसार नियोजन विभागातील रोजगार हमी योजना प्रभागाचे संकेतस्थळ अद्ययावत करणे, माहितीच्या दृष्टीने विभागाची अधिकतम माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द करणे, उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या संकेतस्थळाची माहिती मंत्रिमंडळासमोर गौरवार्थ ठेवणे, प्रशासकीय विभाग व माहिती व तंत्रज्ञान विभाग यांच्या समन्वयाने Dedication Mechanism तयार करणे अशा विविध बाबींवर कार्यवाही करण्याकरिता शासनस्तरावर पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्याचे विचारधीन आहे.
शासन निर्णय :-
नियोजन विभागांतर्गत रोजगार हमी योजना प्रभागाचे संकेतस्थळ अद्ययावत करणे, माहितीच्या दृष्टीने विभागाची अधिकतम माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द करणे, उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या संकेतस्थळाची माहिती मंत्रिमंडळासमोर गौरवार्थ ठेवणे, प्रशासकीय विभाग व माहिती व तंत्रज्ञान विभाग यांच्या समन्वयाने Dedication Mechanism तयार करणे अशा विविध बाबींवर कार्यवाही करण्याकरिता शासनस्तरावर पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.
१. कार्यासन अधिकारी (समन्वय)
२. सहायक संशोधन अधिकारी
३. श्री. राजेश ढुमे
समन्वय अधिकारी, (रोहयो-१२)
सदस्य
IT Consultant, KPMG कृ.मा.प
शासन निर्णय क्रमांकः बैठक-२०२४/प्र.क्र. ३२/रोहयो-१२
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०२०५१५२५२०७४१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.