इयत्ता पहिली मधील शाळा प्रवेशाचे किमान वय निश्चित करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक age for school addmission
पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिली मधील शाळा प्रवेशाचे किमान वय निश्चित करणेबाबत age for school addmission
संदर्भ :
– १) माहिती अधिकार नागरी समूह यांचा दि. ०३-०२-२०२५ चा अर्ज.
२) शासन निर्णय दि. १८-०९-२०२००
उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की, शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय शासन निर्णय दि. १८ सप्टेंबर, २०२० नुसार प्ले ग्रुप, नर्सरी, इ. १ली पूर्वीचा तिसरा वर्ग किमान वय ३+ व याबाबत मानीव दिनांक डिसेंबर व इयत्ता पहिलीसाठी ६+ वयाबाबत मानीव दिनांक ३१ डिसेंबर हा निश्चित करण्याचे निर्देश आहेत परंतु माहिती अधिकार नागरी समूह या संस्थेने दिनांक ०३-०२-२०२५ नुसार उपरोक्त शासन निर्णयाचे पुणे जिल्हयातील शाळा पालन करत नसल्याचे तक्रार दाखल केल्या आहेत.
तरी सदर तक्रारीच्या अनुषंगाने व शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय याची अंमलबजावणी करणे बाबत शाळांना सक्त ताकीद देण्यात यावी शाळा शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नसतील तर शाळांवर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, २००९ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी.
सोबत :- माहिती अधिकार नागरिक समूह यांचा तक्रार अर्ज