८० वर्षे व त्यावरील निवृत्तिवेतनधारक वयाचा पुरावा म्हणून  कागदपत्रांमधून आधार कार्डचा वापर वगळण्याबाबत adhar evidence for retirement 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

८० वर्षे व त्यावरील निवृत्तिवेतनधारक वयाचा पुरावा म्हणून  कागदपत्रांमधून आधार कार्डचा वापर वगळण्याबाबत adhar evidence for retirement 

८० वर्षे व त्यावरील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांकडे वयाचा पुरावा म्हणून सादर करावयाच्या कागदपत्रांमधून आधार कार्डचा वापर वगळण्याबाबत

प्रस्तावना :UIDAI यांचेकडील दि.२२.१२.२०२३ च्या परिपत्रकामध्ये तसेच कर्मचारी भविष्य निधी संघटन, भारत सरकार यांचा दि.१६.०१.२०२४ च्या पत्रामध्ये जन्म तारखेचा पुरावा म्हणून सादर करावयाच्या कागदपत्राच्या यादीमधून आधार कार्डचा वापर वगळण्याचे नमूद केले आहे. वित्त विभागाच्या दि.२३.०३.२०१५ च्या शासन परिपत्रकानुसार ८० वर्षे व त्यावरील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांच्या निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनात दि.०१.०४.२०१४ पासून १०% वाढ करण्याच्या अनुषंगाने निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकाकडे वयाचा पुरावा उपलब्ध नसेल तर अवलंबिण्याच्या कार्यपध्दतीबाबत सूचना निर्गमित करण्यात आले आहे. सदर परिपत्रकामध्ये केंद्र शासनाच्या उपरोक्त परिपत्रकातील सुधारणांनुसार सुधारणा करण्याची बाब प्रस्तुत नस्तीवर विचाराधीन आहे. त्यानुसार पुढीलप्रमाणे शासन शुध्दीपत्रक काढण्यात येत

आहे.

शासन शुध्दीपत्रक :

संदर्भाधीन क्र.१ येथील शासन परिपत्रकामधील परिच्छेद क्र.२ मधील खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे-

(१) मुद्दा क्र.१ मध्ये “आधार कार्ड किंवा पॅन कार्ड” शब्दाऐवजी “जन्मदाखला, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, बैंक खाते असलेल्या बैंक शाखा प्रमुखाचे प्रमाणपत्र, शासकीय / निमशासकीय आस्थापनांचे प्रमाणपत्र / सेवापुस्तकातील नोंद / ओळखपत्र, सेवानिवृत्त झालेल्या कार्यालय प्रमुखांचे प्रमाणपत्र, वाहन परवाना, भारतीय जीवन विमा कंपनी अथवा अन्य विमा कंपनी यांचेकडील पॉलिसी, इ. (यांपैकी कोणतेही एक)” याचा अंतर्भाव करण्यात यावा.

(२) मुद्दा क्र.२ वगळण्यात यावा.

(३) मुद्दा क्र.३ पहिल्या ओळीतील “आधार कार्ड किंवा पॅन कार्ड” या शब्दाऐवजी “पॅनकार्डसह उपरोक्त यादीमधील अन्य कोणतेही दस्तऐवज” याचा अंतर्भाव करण्यात यावा.

२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२४१०१०१३११००४८०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Join Now