अदानी फाऊंडेशनला शाळा हस्तांतरण… शिक्षणमंत्र्यांचे म्हणणे काय? Adani foundation school 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अदानी फाऊंडेशनला शाळा हस्तांतरण… शिक्षणमंत्र्यांचे म्हणणे काय? Adani foundation school 

अदानी समूहाने आता राज्यातील शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला आहे. चंद्रपूर येथील माउंट कार्मेल कॉन्हेंट उच्च माध्यमिक शाळा अदानी समूहाला हस्तांतरित करण्यास शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली असून, पुढील १५ दिवसांत शाळेचे व्यवस्थापन बदलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, शाळा हस्तांतरण ही नियमित प्रक्रिया असून, मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी एखादा उद्योग समूह काही करत असल्यास त्यात चुकीचे काही नाही, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यात स्पष्ट केले.

कार्मेल एज्युकेशन सोसायटी, घुग्घुस जि. चंद्रपूर संचालित माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा, घुग्घुस जि. चंद्रपूर या शाळेचे अदानी फॉउंडेशन, अहमदाबाद या संस्थेस व्यवस्थापन हस्तांतराबाबत.

👉👉शाळेचे आदानी फाउंडेशनला हस्तांतरणाबाबत शासन निर्णय येथे पहा

शासन निर्णय :

सदर शाळेचे व्यवस्थापन अदानी फॉउंडेशन, अहमदाबाद या संस्थेकडे हस्तांतरीत करण्यास खाली नमूद अटी व शर्तीवर मान्यता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे :-

(१) व्यवस्थापन बदल झालेल्या शाळेची किमान पटसंख्येची अट कोणत्याही कारणास्तव शिथिल केली जाणार नाही.

(२) व्यवस्थापन बदल झालेल्या शाळेच्या बाबतीत शासन परवानगीच्या/मान्यतेच्या कोणत्याही अटी व शर्तीमध्ये बदल होणार नाहीत याची खबरदारी घेण्यात यावी.

(३) सदर शाळा इंग्रजी माध्यमाची स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील असल्याने कार्यरत शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा- यांचे संपूर्ण दायित्व व्यवस्थापन हस्तांतर स्वीकारणाऱ्या संस्थेवर राहील. (

४) शासनाकडून शाळा, शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी, वेत्तन/वेतनेत्तर अनुदान, विद्यार्थी इ. बाबत वेळोवेळी विहित्त करण्यात येणारे अधिनियम, नियम, आदेश इ. चे पालन करणे नवीन संस्थेस बंधनकारक राहील, ५) सदर व्यवस्थापन बदल, शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, क्रमांकः माशाह २०११/(२१०/११) (

माशि-३. दिनांक १७ फेब्रुवारी, २०१२ मध्ये विहित केलेल्या नियमानुसार व कार्यपद्धतीनुसार अंमलात येईल. (६) सदर व्यवस्थापन बदलासंदर्भात शासनाकडे अथवा शिक्षण विभागाच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे नव्याने तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा व्यवस्थापन बदला संदर्भातील अटी व शर्तीचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास किंवा

व्यवस्थापन बदलापूर्वीच्या संस्थेतील कार्यरत शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीचा नवीन संस्थेद्वारा भंग झाल्यास, हस्तांतर रद्द करण्याचे अधिकार शासनास राहतील.

२. विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग, नागपूर यांनी सर्व बाबी तपासून व वरील अटी शर्ती व्यतिरिक्त आवश्यक अटींचा समावेश करून, शाळेचे व्यवस्थापन बदलाबाबत पुढील कार्यवाही १५ दिवसांत करावी व त्याबाबत शासनास अवगत करावे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०९२७१५१२२९४३२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने

साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Join Now