“आपले सरकार” संकेतस्थळावर नव्याने अर्ज सादर करुन डिजिटल स्वाक्षरी असलेले अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र मिळविणेबाबत aaple sarkar website link 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“आपले सरकार” संकेतस्थळावर नव्याने अर्ज सादर करुन डिजिटल स्वाक्षरी असलेले अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र मिळविणेबाबत aaple sarkar website link 

माहे जुलै, २०१७ पूर्वी अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांनी “आपले सरकार (https://aaplesarkar.mahaonline.gov.in) या संकेतस्थळावर नव्याने अर्ज सादर करुन डिजिटल स्वाक्षरी असलेले अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र मिळविणेबाबत.

वाचा :- शासन निर्णय, अल्पसंख्याक विकास विभाग, क्र. अशैसं-२०१२/प्र.क्र.२१/का-५.

दिनांक: २७/०५/२०१३.

प्रस्तावना:-

भारतीय संविधानातील अनुच्छेद ३० (१) अनुसार राज्यातील अल्पसंख्याक संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना धार्मिक/भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही या विभागामार्फत करण्यात येते. राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा प्रदान करण्यासाठी संदर्भाधीन दि.२७.०५.२०१३ च्या शासन निर्णयाद्वारे यापूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करुन ऑनलाईन अर्जाबाबतची कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे. अल्पसंख्याक दर्जा प्रदान करणेबाबतची सदर सेवा ही महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित करण्यात आली आहे. त्यामुळे सदर सेवा जुलै, २०१७ पासून आपले सरकार या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

२. अल्पसंख्याक विकास विभागाच्या दि. २७.०५.२०१३ च्या शासन निर्णयातील भाग-अ मधील परिच्छेद (९) मध्ये “ज्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना यापुर्वी शासनाच्या इतर विभागाच्या सक्षम प्राधिकारी यांनी तसेच राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोग अधिनियम २००४ अन्वये कायमस्वरुपी दर्जा प्रमाणपत्र मान्यता प्रदान केली असल्यास पुन्हा अल्पसंख्याक विकास विभागाकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही अशी तरतूद असल्याने माहे जुलै, २०१७ पूर्वी अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांनी नव्याने सुरू केलेल्या अथवा विहीत मार्गाने हस्तांतरणाद्वारे घेतलेल्या शाळा, महाविद्यालये इत्यादींना अल्पसंख्याक दर्जा प्राप्त होतो व सदर दर्जाच्या आधारे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्था शासनाचे विशेष लाभ घेतात. तसेच सदर तरतुदींचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. तथापि अशा ऑफलाईन अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा, महाविद्यालये इत्यादींचा तपशिल या विभागाकडे उपलब्ध होत नाही. ही बाब विचारात घेता अशा गैरवापरास प्रतिबंध घालणे आवश्यक झाले आहे. सर्व शैक्षणिक संस्थांच्या दर्जा प्रमाणपत्राचे नुतनीकरण करुन संस्थांचा अभिलेख अध्यावत करणे आणि अल्पसंख्याक दर्जा मिळविण्याच्या कार्यपद्धतीमध्ये अधिकची पारदर्शकता आणून नागरिकांना अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांची माहिती सुलभरित्या उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेता जुलै २०१७ पूर्वी ज्या अल्पसंख्या शैक्षणिक संस्थांनी ऑफलाईन दर्जा प्रमाणपत्र प्राप्त करुन घेतले आहे अशा सर्व शैक्षणिक संस्थांना डिजीटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय क्रमांका अशैसं २०२५/प्र.क्र.५२/कार्या-५

शासन निर्णयः-

माहे जुलै, २०१७ पूर्वी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत तसेच अल्पसंख्याक विकास विभाग अस्तित्वात येण्यापूर्वी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग इत्यादी विभागांमार्फत ज्या शैक्षणिक संस्थांनी धार्मिक/भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त करुन घेतला आहे, अशा सर्व शैक्षणिक संस्थांना कळविण्यात येते की, त्यांनी “आपले सरकार” https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन डिजिटल स्वाक्षरी असलेले अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ६ महिन्यात प्राप्त करून घ्यावे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२५०२२०१५३९२६१०१४ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने

साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,