सर्व विदयार्थ्यांचे आधार क्रमांक वैधता तपासणी 100 टक्के पुर्ण करणेबाबत aadhar number validation
संदर्भ :
१. मा. आयुक्त (शिक्षण) म.रा.पुणे यांचे पत्र क्र. आशिका /100 दिबस कृती आराखडा/2025/आस्था-क/माध्य/589 दि.4.02.2025
२. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दि.28.02.2025 रोजीचे व्ही.सी. मधील सुचना.
३. या कार्यालयाचे पत्र क्र. जा.क्र.शिउसं/छ.सं./गुणवत्ता कक्ष-2025/1622 दि. 03. 03. 2025.
४. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दि.20.03.2025 रोजीचे व्ही.सी. मधील सुचना/निर्देश.
उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये आपणास कळविण्यात येते की, संदर्भ क्र. 1 ते 09 अन्वये सर्व विदयार्थ्यांच्या आधार तपासणी करुन 100 टक्के पूर्ण करणेबाबत आपल्या जिल्हयातील जि.प/खाजगी अनुदानति/स्वंय अर्थसाहाय्यित शाळामधील विदयार्थ्यांचे प्रवित आधार कार्ड अपडेशन संख्या निहाय यादी तयार करुन आधार कार्ड अपडेशन पूर्ण करण्यासाठी केंद्रस्तरावर 2 ते 3 शाळांकरीता प्रत्येकी एक नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन व उपलब्ध मशिनाचा वापर करून आधार तपासणीचे कामकाज 100 टक्के पूर्ण करणेवावत वेळोवेळी पत्राव्दारे व व्ही. सी. व्दारे निर्देश देण्यात आलेले होते. तरीही आपल्या जिल्हयाचे कामकाज प्रभावीपणे पूर्ण झाल्याचं दिसुन येत नाही.
सदर कामकाज विहित मुदतीत अधिनस्त यंत्रणेचा सुयोग्य वापर करुन विनाविलंब पूर्ण करावे, मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रभावी संनियंत्रण करणेबाबत पत्र निर्गमित केले आहे. सदर पत्रात सर्व विदयाथ्यांच्या आधार क्रमांक वैधता तपासणी करणे हा मुददा प्राधान्यक्रमाचा आहे. यास्तव प्राधान्याने आधार तपासणीचे कामकाज तात्काळ 100 टक्के पूर्ण करणेबाबत पूर्वी सूचित केल्यानुसार प्रलंबित शाळाची यादी तयार करून अंदाजे 2 ते 3 शाळाकरीता एक संपर्क अधिकारी नेमावा व त्यांचे मार्फत आढावा घेउन पाठपुरावा करावा, या अनुषगान आजच नियोजन करुन
त्यांची प्रत कार्यालयास सादर करावी. सदर कामकाज विहित वेळेत पूर्ण न झाल्यास होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी.