आरटीई प्रवेश प्रक्रीया २०२४-२५ बाबत अर्जासंबंधी पालकांना नाविन सूचना right to education act
संदर्भः- संचालनलयाचे पत्र क्र. प्राशिसं/प्र.प्र.सु.सू/आरटीई-८०१/२०२४/३५७९, दिनांक-१७/५/२०२४
सन २०२४-२५ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पदधतीने दिनांक १७.०५.२०२४ पासून सुरु करण्यात आलेली आहे.
हे ही पहा 👉वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण संदर्भात पत्र pdf download
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेच्या कामकाजासाटी गठित केलेल्या पडताळणी समितीने प्रवेश पात्र बालकाचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असलयाने पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३१.०५.२०२४ असून पालकांनी मुदतीत अर्ज भरणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेश प्रक्रीया जूनमध्ये सुरु होत असल्याने आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेस दिनांक ३१.०५.२०२४ नंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही.
तरी पालकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, ऑनलाईन प्रवेश अर्ज मुदतीपूर्वी भरण्याची कृपया काळजी घ्यावी, तसेच स्थानिक स्तरावर व्यापक प्रमाणात याबाबत प्रसिध्दी देण्यात यावी.
वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 2024