विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करणेबाबत student aadhar approval 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करणेबाबत student aadhar approval 

संदर्भ : अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र. क्र. अविवि-२०२४/९४/प्र.क्र.४९/का ६, दिनांक २३.०४.२०२४

उपरोक्त विषयाबाबत अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे संदर्भाधीन पत्र व त्यासोबतचे पत्र सोबत जोडण्यात आलेले आहे.

प्रकरणी शालेय शिक्षण विभागाने राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत मान्यता मिळालेल्या खाजगी शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांची संख्या वाढवून आवश्यकतेपेक्षा अधिक शिक्षक शिक्षकेतर पदे मंजूर करून घेतली असल्याचे निदर्शनास आले असल्याचे नमुद करून विद्यार्थ्यांची नोंद करतांना त्यांच्या “आधार” ची नोंद करणे आवश्यक असल्याचे तसेच विभागामार्फत विविध गटांसाठी शिष्यवृत्तीच्या योजना राबविल्या जातात, विद्यार्थी नोंदणी तसेच शिष्यवृत्तीच्या विविध योजना पारदर्शी पद्धतीने राबविण्यासाठी “आधार” ची नोंद करणे आवश्यक आहे असे निर्देशित करण्यात आलेले आहे.

संदर्भाधीन पत्रातील निर्देशानुसार आपणांस याद्वारे कळविण्यात येते की, उच्च व्यावसायिक व इयत्ता १२ वी नंतर सर्व अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालनालय मुंबई, संचालक तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई व संचालक, उच्च शिक्षण संचालनालयास्तरावर करण्यात येते, त्याचप्रमाणे आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व शाळा / कनिष्ठ महाविदयालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजनेच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी, तसेच बँकेच्या खात्याला आधारशी लिंक करण्याची कार्यवाही तातडीने करण्याबाबत आपल्या स्तरावरून आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व शाळा / कनिष्ठ महाविदयालय यांना अवगत करावे. तसेच व्ही.सी. आयोजित करून सूचना द्याव्यात. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा.

student aadhar approval 
student aadhar approval

Leave a Comment