राज्यातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करण्याची कार्यवाही करणेबाबत students aadhar nondni updation karyavahi 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करण्याची कार्यवाही करणेबाबत students aadhar nondni updation karyavahi 

– १. शासन पत्र (शालेय शिक्षण विभाग) क. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.२५५-अ/एस.डी.१, दि. १५/१२/२०२२. यांचेसोबत करण्यात आलेला करारनामा दि. २१/०७/२०२२.

संदर्भ :

२. मे. आयटीआय लिमिटेड प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडील निर्देश पत्र क्र. २४२६ दि. २२/१२/२०२२.

३. ४. प्राथमिक शिक्षण संचबालनालयाकडील निर्देश पत्र क्र. २४७६ दि. ३०/१२/२०२२.

५. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य यांचे निर्देश दि. २६/०७/२०२४.

राज्यातील १ ली ते १२ मधील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणाचे काम करण्यासाठी गटसाधन केंद्र (CRC) ०२ प्रमाणे एकूण ८१६ आधार नोदणी संघ (Aadhar Enrollment Kit) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत (MPSP) गटसाधन केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येऊन सदरचे कामकाज सुरु करण्यात आले होते. शासनाने गटस्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या आधार नोंदणी संच (Aadhar Enrolment Kit) द्वारे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरण कामकाज करण्यासाठी ८१६ आधार ऑपरेटरची सेवा उपलब्ध करून घेण्यात आलेली असून, आयटीआय लिमिटेड, मुंबई व बेसिल लिमिटेड या दोन संस्थांना आधार संच हाताळणीकरीता मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

राज्यामध्ये अद्यापही अनेक विद्यार्थी आधार नोंदणीकृत नसल्याचे निदर्शनास येत आहे तसेच सरल प्रणालीमध्ये आधार नोदीमध्ये त्रुटी असल्यामुळे मिसमॅच होत आहेत. राज्यातील प्रत्येक गटस्तरावर प्रत्येकी दोन आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kit) उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. उक्त आधार नोंदणी संघ (Aadhar Enrollment Kit) यांचा उचित उपयोग

करणेकरीता खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

५. शाळानिहाय आधारबाबतची संख्यात्मक माहिती प्राप्त करुन घेणेत यावीत उदा. आधार नोदंणी न झालेली विद्यार्थी संख्या, आधार मध्ये दुरुस्ती करावयाची विद्यार्थी संख्या इत्यादी प्रकारची माहिती प्राप्त झाल्यानंतर कामाच्या व्याप्तीनुसार आधार नोदणी व अद्ययावतीकरणाचे केंद्र निश्चित करण्यात यावे,

२. सदर केंद्र निवडतेवेळी पुढील बाबी विचारात घेण्यात याव्यात, भौतीक सुविधा, सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना येण्याकरीता पक्का

रस्ता, शाळेच्या परिसरामध्ये इंटरनेटचे नेटवर्क असणे इत्यादी बाबी विचारात घेऊन शाळेची निवड करण्यात यावी

3. तसेब सदर केंद्रावर नजीकच्या कोण कोणत्या शाळेमधील विद्यार्थी आधार नोदणी व अद्ययावतीकरणाच्या कामक

येणार आहेत अशा शाज्जा निश्चित करणे आवश्यक आहे.

४. शासनाच्या विद्यार्थी लाभाच्या योजनांचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे, आधार बाबतची कार्यवाही प्रलंबित राहिल्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षण विभागाकडील योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याकरीता उक्त मुद्दा क्रमांक १ ते ३ मध्ये नमूद केलेनुसार उचित कार्यवाही करुन त्वरीत आधार विषयक सर्व प्रलंबित आणि दुरुस्तीविषयक कामकाज पूर्ण करुन घेण्यात यावे.

५. सोबत तालुकानिहाय आधार ऑपरेटर यांची यादी व संपर्क क्रमांकाची माहिती उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यानुसार सद्यस्थितीमध्ये कार्यरत आधार ऑपरेटर यांना आधार प्रलंबित आणि दुरुस्तीचे काम असणाऱ्या शाळांचे पुढील १५ दिवसांचे अचूक नियोजन करुन देण्यात यावे तसेच याबाबत संबंधित शाळा आणि पालकांना देखील अवगत करणेबाबत सर्व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात यावेत.

६. दि. ३१ ऑगस्ट, २०२४ पूर्वी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आधार विषयक नोंदी अद्यावत करुन सर्व विद्यार्थी सरल प्रणालीमध्ये नोंदणीकृत असल्याची खात्री मुख्याध्यापकांची करणे आवश्यक आहे. याबाबत सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा प्रमुखांना लेखी निर्देश निर्गमित करण्यात यावेत.

७. विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्यावतीकरणाबाबत संचालनालय स्तरावरुन वेळोवेळी मार्गदर्शक सुचना व आदेश निर्गमित केले जातील. त्याप्रमाणे कार्यवाही करणे सर्व क्षेत्रीय अधिका-यांवर बंधनकारक आहे

Join Now

Leave a Comment