जिल्हा परिषद निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन वेळेत प्रदान होण्याकरिता नविन निवृत्तीवेतन संगणक प्रणालीबाबत retirement payment new computer system 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषद निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन वेळेत प्रदान होण्याकरिता नविन निवृत्तीवेतन संगणक प्रणालीबाबत retirement payment new computer system

(शिक्षक / शिक्षकेतर निवृत्तीवेतन धारक वगळून) निवृत्तीवेतन वेळेत प्रदान होण्याकरिता मे. महाआयटी मार्फत विकसित करण्यात येणाऱ्या नविन निवृत्तीवेतन संगणक प्रणालीबाबत

संदर्भ :- १. ग्राम विकास विभाग परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र. ८६/ वित्त-४ दिनांक. २३.११.२०२३

२. मे. महाआयटी लि. यांना दिलेले कार्यादेश क्र. Pranali-५६२४/८.२.१२/IT CELL दि. १५.३.२०२४

३. ग्रामविकास विभाग पत्र क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र. ८६/वित्त-४ दिनांक. ८.१२.२०२३

retirement payment new computer system 
retirement payment new computer system

महोदय / महोदया,

ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त जिल्हा परिषदांमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे (शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी वगळून) सेवा निवृत्ती वेतन विनाविलंब व वेळेत होण्याकरिता संगणक प्रणाली विकसित करण्या करिता मे. महाआयटी लि. यांना संदर्भ क्र. २ अन्वये कार्यादेश देण्यात आले आहेत. संदर्भ क्र. १ अन्वये जिल्हा परिषद ठाणे व सातारा व संदर्भ क्र. ३ अन्वये जिल्हा परिषद पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांना या संगणक प्रणाली च्या विकसनाचे काम सुरू होण्यापूर्वी वर नमूद जिल्हा परिषद निवृत्तीवेतन धारकांची (शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी वगळून) सेवा पुस्तकातील सर्व माहिती मे. महाआयटी यांनी उपलब्ध करून दिलेल्या Excel Format मध्ये भरून तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

मे. महाआयटी हे लवकरच नवीन निवृत्तीवेतन प्रणाली विकसित करणार असून याकरिता ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त सर्व जिल्हा परिषदांकडील निवृत्तीवेतन धारकांची (शिक्षक/

शिक्षकेतर वगळून) त्यांच्या सेवा पुस्तकातील सर्व आवश्यक माहिती मे. महाआयटी यांनी उपलब्ध करून दिलेल्या / देणार असलेल्या Excel Format मध्ये भरून दि. २६.४.२०२४ पर्यंत तयार ठेवावी. याबाबत काही अडचण असल्यास संबंधितांना मुख्य लेखा वित्त अधिकारी, ठाणे व सातारा यांचेशी संपर्क साधण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच सदर काम नियोजन बद्ध पद्धतीने होणे आवश्यक असल्याने जिल्हा परिषद ठाणे व सातारा यांचे धर्तीवर या कामासाठी समन्वय समिती गठीत करावी. (संदर्भ क्र. १ मध्ये समन्वय समिती गठीत केल्याची नोंद आहे.) अशी समन्वय समिती गठीत करून या विभागास त्याची एक प्रत माहितीस्तव पाठवावी.

तसेच आपल्याला ज्ञात असेलच कि, सध्या तालुका स्तरावर जिल्हा परिषदेच्या निवृतिवेतन धारकांचे निवृत्तीवेतन त्या त्या गट विकास अधिका-याकडून आहरित करण्यात येते. भविष्यात सर्व जिल्हा परिषद कर्मचा-यांचे (शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी वगळून) निवृत्तीवेतन जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातून अदा करण्याचे नियोजित आहे, सबब तेथे मुख्य वित्त व लेखा अधिकारी, आहण व संवितरण अधिकारी म्हणून काम पहातील. तसेच निवृत्तीवेतन प्रणाली कार्यान्वीत झाल्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषदेच्या सर्व निवृत्ती वेतन धारकांचे (शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी वगळून) या नवीन निवृत्ती वेतन प्रणाली मधून एकच देयक तयार करून मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांचे मार्फत कोषागारास सादर करतील. यानुसार भविष्यातील कामाचे नियोजन करावे. तसेच भविष्यात जेथे आवश्यक तेथे या विभागाकडून सूचना देण्यात येतील.

सर्व जिल्हा परिषदांना नवीन निवृत्ती वेतन प्रणाली व तदनुषंगाने इतर कामांबाबत माहिती अवगत करून देण्याकरीता दि. १८.४.२०२४ (गुरुवार) रोजी दुपारी ३.०० वाजता या विभागाकडून VC आयोजित करण्यात आली असून मे. महाआयटी चे तंत्रज्ञ वर नमूद आपल्या जिल्हयाच्या समन्वय समिती तील सदस्यांना या VC मध्ये सविस्तर माहिती देतील. तदनंतर त्यांचेकडून प्रत्येक जिल्हा परिषदेसोबत स्वतंत्ररित्या VC च्या माध्यमातून बैठका घेऊन मार्गदर्शन व येणाऱ्या अडचणींचे निराकरण करतील.

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्हयांकरीता उपरोक्त निवृत्तीवेतन प्रणाली विकसन व तदनंतर त्याचे त्यांच्या जिल्ह्यात कार्यान्वयन होणे करिता वर नमूद प्रमाणे तात्काळ आपल्या जिल्हा परिषदेकरीता समन्वय समिती गठीत करून विभागास अवगत करावे.

retirement payment new computer system 
retirement payment new computer system

CUsers\pradeep prathu Desktop-new te४२०२३ २०२३\० ८६-२०२३ निरdocx २४

Leave a Comment