भौतिक शास्त्रावरील सामान्य ज्ञान प्रश्न स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त general knowledge questions 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
General knowledge questions
General knowledge questions

भौतिक शास्त्रावरील सामान्य ज्ञान प्रश्न स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त general knowledge questions 

१. एखाद्या द्रवात क्षितिज समांतर प्रतलात असणाऱ्या सर्व बिंदूवरील दाब……. असतो.

१) सारखाच

२) भिन्न भिन्न

३) कमीअधिक

४) यापैकी नाही

२.द्रवातील बिंदूवरील दाबाविषयी खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?

१) द्रवातील कोणत्याही बिंदूवरील दाब त्या बिंदूच्या द्रवातील खोलीवर अवलंबून असतो.

२) द्रवातील कोणत्याही बिंदूवरील दाब सर्व दिशांना सारखाच असतो.

३) द्रवातील एखाद्या बिंदूवरील दाब हा त्या द्रवाच्या घनतेवर अवलंबून असतो.

४) वरील सर्व विधाने अचक आहेत

३. पास्कलच्या नियमाप्रमाणे ‘बंदिस्त द्रवावर दिलेला दाब द्रवाच्या प्रत्येक भागावर सारखाच पारेषित होतो’ हे विधान…

१) पूर्णतः बरोबर आहे.

२) अंशत: बरोबर आहे.

३) संदिग्ध आहे.

४) खात्रीशीर नाही.

४.पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंचावर जावे तसे वातावरणाचा दाब…..

१) हळूहळू वाढत जातो.

२) जोरात वाढतो

३) हळूहळू कमी होत जातो

४) यापैकी नाही

५. एक वातावरण दाब म्हणजे 0°C तापमानाला पाऱ्याच्या.. उंचीच्या स्तंभाने दिलेला दाब होय.

१) ७६ सें.मी.

२) ७६० सें.मी.

३) १ सें.मी.

४) १०० सें.मी.

६. फॉटिनच्या हवादाबमापीमुळे.. च्या दाबाचे अचूक मापन करता येते.

१) पाऱ्याच्या

२) पाण्याच्या

३) हवेच्या

४) यापैकी नाही

७. कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे. कमी होते.

१) वस्तुमान

२) आकारमान

३) वजन

४) यापैकी नाही

८. आर्किमिडीजच्या तत्वांचा संदर्भ घेऊन खाली दिलेल्यापैकी अयोग्य विधान ओळखा.

१) कोणताही पदार्थ द्रवात पूर्णपणे बुडविला असता त्याचे वजन कमी होते.

२) कोणताही पदार्थ द्रवात अंशतः बुडविल्यास त्याचे वजन कमी होत नाही.

३) पदार्थ द्रवात पूर्णपणे बुडविला असता त्याचे कमी झालेले वजन हे त्याने उत्सारीत केलेल्या द्रवाच्या वजनाएवढे असते.

४) पदार्थ द्रवात अंशतः बुडविला असता कमी झालेले वजन हे पदार्थाच्या द्रवव्याप्त भागाने उत्सारित केलेल्या द्रवाच्या वजनाएवढे असते.

९. द्रवात बुडविलेल्या वृत्तचित्तीवर क्रिया करणारे प्लावक बल (उत्प्रणोद) कोणत्या दिशेने क्रिया करत असते ?

१) ऊर्ध्वगामी

२) अधोगामी

३) समांतर

४) सर्व दिशांनी

१०. तरंगणाऱ्या वस्तूचे वजन तिच्या द्रवव्याप्त भागाने विस्थापित केलेल्या द्रवाच्या वजनाएवढे असते, हा कोणता नियम आहे?

१) पास्कलचा नियम,

२) फॉर्टिनचा नियम

३) तरणाचा नियम

४) यापैकी नाही.

नियम

११. पदार्थाचा द्रवणांक हा त्याच्या.. एवढाच असतो.

१) उत्कलनांक

२) गोठणांक

३) गोठणांकापेक्षा कमी असतो

४) यापेक्षा वेगळे उत्तर

१२. पदाथचि स्थायू अवस्थेतून द्रव अवस्थेत न जाता एकदम वायूस्थितीत रूपांतर होण्याची क्रिया म्हणजे.

१) संप्लवन

२) बाष्पीभवन

३) उत्कलन

४) सांद्रण

१३. कापूर, आयोडिन या पदार्थांमध्ये उष्णतेमुळे. हे अवस्थांतर आढळते.

१) सप्लवन

२) बाष्पीभवन

३) गोठण

४) यापैकी नाही.

१४. शुद्ध पाण्याचा उत्कलनाक. °C असतो.

१) 0°C

2 100°C

३) 1000°C

४) 111°C

Leave a Comment