जुनी पेंशन योजना विकल्प old penshan scheme vikalp
विषयः 01.11.2005 पूर्वी पदभरती जाहिरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनाक
01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकिय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धरतीवर जुने निवृत्ती योजना लागू करणेबाबत.
संदर्भ: 1. महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2023/प्र. क्र. 46/ सेवा-4/ दिनांक 02.02.2024
उपरोक्त संदभीय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, संदर्भ क्रमांक । च्या शासन निर्णयानुसार दिनांक 01.11.2005 पूर्वी पदभरती जाहिरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01.11.2005 रोजी किया त्यानंतर रुजु झालेल्या शासकिय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धरतीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यावावत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे.
जिल्हा परिषद बुलडाणा प्राथमिक शिक्षण सेवक जाहिरात- दैनिक तरुण भारत दिनांक 18.08.2005, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सेवक जाहिरात दैनिक लोकमत 18.08.2005 रोजी वर्तमान पत्रात प्रकाशित झालेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने शिक्षण सेवक पदी जिल्हा परिषद, बुलडाणा अंतर्गत दिनांक 01.11.2005 रोजी नंतर रुजु झालेल्या सर्व प्राथमिक / माध्यमिक/ उच्च माध्यमिक शिक्षकांना तसेच अंतर जिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना सुद्धा सोबत जोडलेल्या प्रपत्र क व ड प्रमाणे माहिती संकलित करून संदर्भीय शासन निर्णयातील नियमानुसार केंद्र शासनाच्या धरतीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागु होण्यासाठी पात्र शिक्षकाकडून विहित वेळेत विहित पध्दतीने योग्य नमुन्यात विकल्प भरुन घेण्याची त्वरीत कार्यवाही व्हावी अशी निवेदनाव्दारे विनंती केली आहे. त्याअनुषंगाने आपणास संदर्भाकित शासन निर्णयामधील मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच निवेदनातील नमुद बाबींविषयी आपल्या अधिनस्त सर्व पात्र कर्मचारी शिक्षक यांची तालुका निहाय माहिती संकलीत करुन उपलब्ध करुन दिलेल्या माहितीची पाहाणी पडताळणी व खात्री करुन पात्र कर्मचारी यांचे विकल्प घेवुन स्वयं स्पष्ट अभिप्रायासह मंजूरीसाठी या कार्यालयास सादर करणेबाबत उचित कार्यवाही अनुसरावी. या कामी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.
जिल्हा परिषद चे पत्र येथे पहा pdf download