Indian election commission new Delhi महोदय / महोदया,उपरोक्त विषयाबाबत भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी आपल्या अधिकृत वेबसाईटवर संदर्भाकीत क्र.१ ते ८ च्या पत्रांव्दारे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने लागू होणाऱ्या आदर्श आचारसहिंतेच्या कालावधीत अवलंबावयाच्या कार्यपध्दतीबाबत विविध विषयासंबंधित मार्गदर्शन सूचना प्रसिध्द केलेल्या आहेत.
२. भारत निवडणूक आयोग, दिल्ली loksabha 2024यांच्या उपरोक्त संदर्भाधीन पत्रातील मार्गदर्शन सूचना लक्षात घेऊन, सर्व प्रशासकीय विभागांनी आपल्या अधिनस्त सर्व क्षेत्रिय कार्यालयांना सदरच्या सूचना
शासन परिपत्रक क्रमांकः एमसीएम-२०२४/प्र.क्र.२२६/निवडणूक/कार्या-३३
निदर्शनास आणण्यात याव्यात. त्याचप्रमाणे सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी आपल्या प्रशासकीय विभागाच्या व आपल्या अधिनस्त कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर (संकेतस्थळावर) कोणत्याही प्रकारच्या राजकीय नेत्यांची छायाचित्रे असल्यास, सदरची छायाचित्रे विनाविलंब काढून टाकण्याची तातडीने कार्यवाही करावी.
३. त्याचप्रमाणे उप जिल्हा निवडणूक अधिकारी (सर्व) यांनी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या आचार संहितेच्या काळात व तद्नंतर निवडणूकीची प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत क्षेत्रियस्तरावर उपस्थित होणाऱ्या सर्वसाधारण तक्रारी व दाखल तक्रारीतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित निवडणूक अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या सूचनांनुसार प्रकरण तपासून आपल्यास्तरावर प्रकरणपरत्वे निर्णय घेण्यात यावा. तसेच आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करण्यात आली असल्याची खातरजमा संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी करावी.
त्याचप्रमाणे एखाद्या विशिष्ट धोरणात्मक प्रकरणी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन / मान्यतेची आवश्यकता असल्यास, फक्त अशीच प्रकरणे मा. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत भारत निवडणूक आयोगास सादर करण्याकरीता संदर्भाधीन संदर्भ क्र. (९) येथील दि.२८/०२/२०२४ च्या शासन परिपत्रकान्वये गठीत करण्यात आलेल्या छाननी समितीपुढे प्रस्ताव सादर करावा. सदरचा प्रस्ताव सादर करतांना सदर शासन परिपत्रकातील तरतूदी व विहीत कार्यपध्दती विचारात घेवून त्या-त्या संबंधित प्रशासकीय विभागामार्फतच प्रस्ताव सादर करावा.
४. उपरोक्त संदर्भाधीन सर्व सूचनांचे कटाक्षाने पालन करण्याबाबत सर्व संबंधितांना तातडीने सूचना देण्याची कार्यवाही करण्याबाबत मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुखांनी दक्षता घेण्यात यावी, ही विनंती.
५. सदर शासनपत्र निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०३०६१२२८१५४६०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.