जुने निवृत्तिवेतन केवळ राज्य कर्मचाऱ्यांनाच लागू: वित्त विभागाच्या उपसचिवांचे हायकोर्टात खळबळजनक प्रतिज्ञापत्र! Old penshan scheme 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Old penshan scheme
Old penshan scheme

जुने निवृत्तिवेतन केवळ राज्य कर्मचाऱ्यांनाच लागू: वित्त विभागाच्या उपसचिवांचे हायकोर्टात खळबळजनक प्रतिज्ञापत्र! Old penshan scheme 

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी जुन्या निवृत्तिवेतनाचा निर्णय केवळ राज्य सरकारच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच लागू आहे. जिल्हा परिषद व इतर प्राधिकरणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार नाही, अशी खळबळजनक माहिती वित्त विभागाच्या उपसचिव मनीषा कामटे यांनी दिली आहे. त्यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सुरू झालेल्या पदभरती प्रक्रियेमधून निवडण्यात आलेल्या; पण १ नोव्हेंबर २००५ किंवा त्यानंतर नियुक्तीपत्र मिळालेल्या सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय वित्त विभागाने २ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी केला आहे. यापैकी इच्छुक अधिकारी- कर्मचाऱ्यांनी त्यांना ही योजना लागू करण्यासाठी सहा महिन्यांमध्ये पर्याय सादर करायचा आहे. हा पर्याय न देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना नवीन निवृत्तिवेतन योजना लागू ठेवली जाणार आहे; परंतु हा कल्याणकारी निर्णय जिल्हा परिषद व इतर प्राधिकरणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागू नाही, असे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी १ नोव्हेंबर २००५ किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सरसकट नवीन निवृत्तिवेतन योजना लागू करण्यात आली होती. वित्त विभागाने यासंदर्भात ३१ ऑक्टोबर २००५ रोजी निर्णय जारी केला होता. त्यात नवीन निर्णयामुळे सुधारणा झाली आहे.

जुने निवृत्तिवेतन केवळ राज्य कर्मचाऱ्यांनाच लागू: वित्त विभागाच्या उपसचिवांचे हायकोर्टात खळबळजनक प्रतिज्ञापत्र! Old penshan scheme

इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी सुरू झालेल्या पदभरती प्रक्रियेमधून निवडण्यात आलेल्या; पण १ नोव्हेंबर २००५ किंवा त्यानंतर नियुक्तीपत्र मिळालेल्या दोनशेवर जिल्हा परिषद व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्तीवेतनाचा लाभ मिळण्याकरिता उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.

Old penshan scheme
Old penshan scheme

• दरम्यान, वित्त विभागाद्वारे संबंधित निर्णय जारी करण्यात आल्यामुळे गेल्या ५ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने हा निर्णय याचिकाकर्त्यांना लागू होतो का, अशी विचारणा केली होती.

• परिणामी, वित्त विभागाने हे प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यातील खळबळजनक खुलाशामुळे इतर अधिकारी-कर्मचायांमध्ये असंतोष पसरला आहे. या प्रकरणावर न्यायालयात येत्या मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे.

• त्याकडे पीडित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ अॅड. प्रदीप क्षीरसागर बाजू मांडणार आहेत.

जुने निवृत्तिवेतन केवळ राज्य कर्मचाऱ्यांनाच लागू: वित्त विभागाच्या उपसचिवांचे हायकोर्टात खळबळजनक प्रतिज्ञापत्र! Old penshan scheme

Leave a Comment