स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये SGSP अकाउंट असण्याचे फायदे State government Salary package
state government salary package account in state bank of India असण्याचे अनेक फायदे आहेत त्यातील काही फायदे खूप महत्वाचे असतात ते खाली पाहु या नोकरदार लोकांना सॅलरी अकाउंटबद्दल चांगलेच माहित असते. त्यांना माहित असते की जर त्यांच्याकडे सॅलरी अकाउंट नसेल तर त्यांचा दर महिन्याचा पगार जमा होणार नाही. अर्थात कोणत्या बँकेत सॅलरी अकाउंट (Salary Account) असावे हे तो कर्मचारी ज्या कंपनीत काम करत असतो त्या कंपनीवर अवलंबून असते. मात्र ज्यांचे सॅलरी अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये आहे, त्यांना झिरो बॅलन्स व्यतिरिक्त इतर काही असे फायदे आहेत ज्याचे महत्त्व मोठे आहे.
Table of Contents
1.स्टेट बँकेचे सॅलरी अकाउंट
2.स्टेट बँकेच्या सॅलरी अकाउंटमध्ये मिळतात हे ५ मोठे लाभ-
3.इतर सुविधा
4.पगार खाते कोण उघडू शकते खाते?
5.स्टेट बँकेचे सॅलरी अकाउंट
1.स्टेट बँकेचे salary account
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, स्टेट बँकेच्या सॅलरी अकाउंट असणाऱ्यांना पर्सनल लोन, होम लोन, कार लोन, शैक्षणिक कर्ज इत्यादीमध्ये सूट मिळते. याशिवाय इतर काही फायदे असेही आहेत ज्यांची माहिती स्टेट बँकेच्या सॅलरी अकाउंट धारकाला असली पाहिजे आणि ज्यांनी स्टेट बँकेत सॅलरी अकाउंट उघडायचे आहे.
2.स्टेट बँकेच्या सॅलरी अकाउंटमध्ये मिळतात हे ५ मोठे लाभ-
अक्सिडेंट डेथ कव्हर– स्टेट बँकेत सॅलरी अकाउंट असणाऱ्यांना २० लाख रुपयांपर्यतचे अक्सिडेंटल डेथ कव्हर मिळते. या सुविधेअंतर्गत जर एखाद्या अपघातात खातेधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला २० लाख रुपयांची रक्कम मिळेल.
एअर अक्सिडेंटल डेथ कव्हर – स्टेट बँकेच्या वेबसाईटनुसार हवाई दुर्घटनेत मृत्यू झाल्यास स्टेट बँकेच्या सॅलरी खातेधारकाच्या नॉमिनीला एअर अक्सिडेंटल इन्श्युरन्स अंतर्गत ३० लाख रुपयांची रक्कम मिळते.
लोन प्रोसेसिंग फीमध्ये ५० टक्के सूट– एसबीआय सॅलरी अकाउंटधारकास पर्सनल लोन, होम लोन, कार लोन इत्यादींमध्ये प्रोसेसिंग फी मध्ये ५० टक्के सूट मिळते.
ओव्हरड्राफ्ट सुविधा – एसबीआय आपल्या सॅलरी अकाउंट धारकांना ओव्हरड्राफ्टची सुविधा देते. या सुविधेअंतर्गत देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया सॅलरी अकाउंट धारकांना दोन महिन्यांची सॅलरी देते.
लॉकर चार्जमध्ये सूट – स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या सॅलरी अकाउंट होल्डरला लॉकर चार्जवर २५ टक्के सूट देते
3.इतर सुविधा
याव्यतिरिक्त स्टेट बँक सॅलरी अकाउंट धारकांना मल्टी सिटी चेक, एसएमएस अलर्ट, फ्री ऑनलाईन एनईएफटी, आरटीजीएस (NEFT/RTGS), कोणत्याही बँकेच्या एटीएममधूल अनलिमिटेड ट्रान्झेंक्शनची सुविधा देते.
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक असून बँकेचा व्यवसाय आणि विस्तार मोठ्या प्रमाणात आहे. एसबीआय विविध कर्जेदेखील तुलनात्मकरित्या स्वस्त व्याजदरांवर उपलब्ध करून देत असते.
SGSP योजनेंतर्गत चार प्रकारची खाती उघडली जातात. ती
खालीलप्रमाणे
SILVER: 10,000/- च्या दरम्यान आणि 25,000/- पर्यंत
GOLD : 25,000 च्या वर आणि 50,000/- पर्यंत
DIMOND : 50,000 च्या वर आणि 1,00,000/- पर्यंत
PLATINUM: 1,00,000 च्या वर.
STATE GOVERNMENT SALARY PACKAGE चे थोडक्यात फायदे.
1.तुम्हाला ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. बॅलन्स नसतानाही तुम्ही 2 महिन्यांच्या पगाराइतके पैसे काढू शकता.
2.सॅलरी अकाऊंटसह डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड देखील देते. याशिवाय चेक ते डिजिटल बँकिंगचे सर्व फायदेही उपलब्ध आहेत.
3.तुमचे सॅलरी अकाऊंट असल्यास, तुम्हाला लॉकर सुविधेवर 25% सूट मिळेल.
4.सॅलरी अकाऊंटसह तुम्हाला डिमॅट खात्याची सुविधा देखील देते, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करू शकता.
5.सॅलरी अकाऊंट असलेल्या ग्राहकांना कर्ज सहज आणि कमी व्याजावर मिळते. बँक लोन प्रोसेसिंग शुल्कावर ५० % सूट देखील देते.
6.बँक त्यांच्या सॅलरी अकाऊंट असलेल्या ग्राहकांसह विम्याचा लाभ देखील देते. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
7.तुमच्या पगारानुसार कव्हरेज ३० लाख रुपयांपर्यंत असू शकते.
8.आपले सॅलरी अकाऊंट असल्यास, तुम्ही तुमच्या बँकेच्या ATM मधून कितीही वेळा मोफत पैसे काढू शकता.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सॅलरी अकाउंट झिरो बॅलन्सवर देखील उघडता येते. शिल्लक शून्य झाल्यास तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागत नसते.
जर आपले मासिक वेतन २५ हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी SBI मध्ये खातेही उघडू शकता. अशा सॅलरी अकाऊंट ग्राहकांसाठी एसबीआय रिश्ते योजना खूप उपयुक्त आहे.
5.पगार खाते कोण उघडू शकते ?
सरकारी व खाजगी नोकरी करणारा कोणताही भारतीय नागरिक, पगारातून दरमहा किमान १० हजार रुपये कमवत आहे, तो सॅलरी अकाऊंट उघडू शकतो.
तुम्ही SBI सॅलरी अकाऊंट ऑनलाइन देखील उघडू शकता. यासाठी तुम्हाला एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. पण एकदा तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी बँक शाखेत जावे लागते.
कर्मचाऱ्यांचे पगार खाते कोणत्या बँकेत असावे? यासंदर्भात शासनाचा कोणताही शासन निर्णय नाही किंवा महाराष्ट्र शासनाने काढलेला नाही. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांना कोणत्याही बँकेमध्ये सॅलरी अकाऊंट उघडता येऊ शकते.