राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष state level ideal teacher award 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष state level ideal teacher award 

राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर योजना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविणेबाबत.

शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज व राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते.

२.

राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे प्रस्ताव पात्र शिक्षकांकडून शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च

माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून ऑनलाईन मागविण्यात येतात. अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक

सूचना / निकषांनुसार जिल्हा स्तरावर जिल्हा निवड समिती प्रस्तावांची छाननी करुन प्रवर्ग निहाय पात्र

प्रस्ताव शिक्षण संचालक स्तरावर गठीत करण्यात आलेल्या राज्य निवड समितीकडे पाठविते. सदर शिफारशींवर शिक्षकांच्या गुणवत्तेनुसार अंतिम निवड करुन राज्य निवड समितीकडून शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येतात. पुरस्कार सर्वसाधारणपणे १५ ऑगस्ट रोजी जाहीर करुन त्याचे प्रत्यक्ष वितरण ५ सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या दिनांकाला सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते करण्यात येते. ३. संदर्भाधीन क्र.१ येथील शासन परिपत्रक दिनांक २१ जुलै, २०१६ अन्वये राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराबाबतचे निकष सुधारीत करण्यात आले आहेत. या निकषांमध्ये सुधारणा करून सदर योजना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविणेची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत संदर्भाधीन पत्र क्र.२ दिनांक २४ फेब्रुवारी, २०२२ अन्वये शिक्षण संचालक (माध्यमिक

व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून प्रस्ताव प्राप्त झाला आहे.

शासन निर्णय :-

शासन परिपत्रक पीटीसी २०१६/प्र.क्र.९८/टीएनटी-४, दिनांक २१ जुलै, २०१६ या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे.

राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराबाबतचे निकष सुधारीत करून सदर योजना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अटी व निकष पुढीलप्रमाणे राहतील.

“क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार”

प्रस्तावासाठी आवश्यक अटी :-

१) शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक.

२) मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे गटशिक्षणाधिकारी/

प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक.

३) शिक्षक/मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान १० वर्षे आवश्यक.

४) शिक्षकाचे/मुख्याध्यापकाचे मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल.

५) विभागीय चौकशी सुरु नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.

६) शिक्षकांनी केलेल्या लगतच्या ५ वर्षाच्या सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन राज्यस्तर व जिल्हास्तर समितीकडून गुणांकनाव्दारे करण्यात येईल.

७) प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत.

८) शिक्षकाच्या सेवेतील कार्यपध्दतीबाबत व निर्व्यसनी असलेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील

आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा पुढचा टप्पा प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत इ. १० वी / इ. १२ वी व व्यावसायिक पदविका (डी.एड./डी. एल. एड.) पेक्षा अधिकतम अर्हता

उच्च प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत पदवी व व्यावसायिक पदविका (डी.एड./डी.एल.एड.) पेक्षा अधिकतम अर्हता

माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीत पदवीधर व व्यावसायिक पदवी (बी.एड./बी.पी.एड./ए.एम) व त्या समकक्ष पेक्षा अधिकतम अर्हता

उच्च माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीत पदव्युत्तर पदवी व व्यावसायिक पदवी (बी.एड./बी.पी.एड. किंवा त्या

समकक्ष वा पेक्षा अधिकतम अर्हता

शैक्षणिक संशोधनपर निबंध/प्रबंध यास प्राप्त पुरस्कार व सादरीकरण (मागील ५ वर्षातील सादर केलेल्या प्रती निबंध / प्रबंधास १ गुण याप्रमाणे गुणदान राहील)

वृत्तपत्र अथवा प्रथितयश नियतकालिकात प्रकाशित पाच लेख (वैचारिक किंवा विश्लेषणात्मक)

शिक्षक शिकवत असलेल्या वर्गातील त्या त्या

अध्यापन विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यास विविध

क्षेत्रातील प्राप्त पुरस्कार-

कला/क्रीडा/संगीत/नृत्य/भाषा/गणित/विज्ञान/

सामाजिक शास्त्र/स्काऊट गाईड/वक्तृत्व/ इ.

शिक्षकाने केलेल्या सामाजिक/शैक्षणिक / साहित्यिक/सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यासाठी / आपत्ती व्यवस्थापन/ राष्ट्रीय कार्य इ.साठी शासन अथवा शासन पुरस्कृत संस्थेकडून प्राप्त पुरस्कार शिक्षकाने शाळेच्या उन्नतीसाठी समाजाकडून मागील ५ वर्षात मिळवलेले योगदान (डिजीटल स्कूल, शैक्षणिक उठाव इ.)

ग्रंथलेखन (प्रथितयश प्रकाशकाने प्रकाशित केलेले ५ ग्रंथ) (ISBN सह)

प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले असल्यास (मागील ५ वर्षात)

शालेय विद्यार्थ्यांच्या प्रज्ञेचा शोध घेणाऱ्या परीक्षेतील वर्गातील एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण (वर्गातील एकूण पटाच्या किमान ५० टक्के विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ असणे आवश्यक) (मागील ५ वर्षात) (राज्य/राष्ट्रीय शिष्यवृत्ती/नवोदय/प्रज्ञाशोध इ.)

राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राला / गुणवत्तेला स्वत:च्या नवप्रकल्पाव्दारे दिशा देणारे कार्य

शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत दाखल संख्या

(मागील सलग ५ शैक्षणिक वर्षातील संकलित)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र

राज्य, पुणे आयोजित विविध ऑनलाईन

उपक्रमातील सहभाग ( स्वाध्याय, अभ्यासमाला,

शिकू आनंदे, इ.)

शासनाच्या ऑनलाईन पोर्टल/अॅप/वेबसाईट वर आपले विषयाच्या अनुषंगाने स्वतः शैक्षणिक साहित्य निर्मिती करुन अपलोड करण्यातील सहभाग (उदा. दीक्षा अॅप/विद्यादान इ.)

विद्यार्थ्यांची चाचणी (अध्ययन निष्पत्ती)

शैक्षणिक स्पर्धातील विद्यार्थ्यांचा सहभाग (विज्ञान प्रदर्शन, कला, क्रीडा स्पर्धा, साहित्य स्पर्धा, इन्स्पायर अवार्ड, कृती संशोधन, नवोपक्रम स्पर्धा)

मागील पाच वर्षात वर्गात/शाळेत झालेली पटसंख्येतील वाढ

मागील ५ वर्षाचे गोपनीय अहवाल मूल्यमापन

शासन निर्णय pdf येथे पहा

👉👉pdf download 

 

Leave a Comment