निपुण भारत अभियान अंतर्गत केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावर “निपुणोत्सव” उपक्रमाचे आयोजन करणेबाबत Nipun Bharat activity 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 निपुण भारत अभियान अंतर्गत केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावर “निपुणोत्सव” उपक्रमाचे आयोजन करणेबाबत Nipun Bharat activity 

संदर्भ:-१. AWP and B २०२२-२३ मधील मान्य उपक्रम

२. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०.

३) भारत सरकारच्या National Initiative For Proficiency In Reading with Understanding and Numeracy (NIPUN BHARAT) अंतर्गत मार्गदर्शन

सूचना. ४) निपुण भारत अभियान अंमलबजावणीबाबत शासन निर्णय-संकीर्ण-२०२१/ प्र.क्र.१७९/एसडी- ६. दिनांक २७ ऑक्टोबर, २०२१.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार, पायाभूत स्तरातील (वयोगट ययवर्षे ३ ते ९) विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विषयक क्षमता विकसन होण्याची गरज प्रकर्षाने व्यक्त करण्यात आली आहे. याकरिता केंद्र व राज्य स्तरावरून निपुण भारत अभियायानाची अंमलबजावणी सुरु आहे. निपुण भारत अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित होण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावरून विविध उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे. याकरिता संदर्भ

क्र.४ नुसार मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

निपुणोत्सव नियोजन करिता सर्वसाधारण मार्गदर्शक सूचनाः

केंद्र स्तर /तालुका स्तर / जिल्हा स्तरावरील निपुणोत्सव मध्ये निपुण भारत अभियान यशस्वी करण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांची दखल घेऊन उत्तम कामगिरी करणारे शिक्षक / मुख्याध्यापक तसेच क्षेत्रीय अधिकारी यांचा निपुण मित्र म्हणून सन्मान व प्रशस्तीपत्र देण्यात यावे.

• “निपुणोत्सव” मध्ये उपरोक्त शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. सदर नियोजन करत असताना विद्यार्थी, शाळा, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच पालक यांचा सक्रीय व उत्स्फूर्त सहभाग घेण्यात यावा.

उपरोक्त सर्व स्तरावरील निपुण महोत्सवाचे सनियंत्रण संदर्भ क्र.४ नुसार निपुण भारत अभियान अंतर्गत स्थापन करण्यात आलेली सुकाणू समिती व जिल्हा प्रकल्प नियंत्रण कक्ष (DPMU) यांनी करावे.

सदर उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीकरिता अत्यंत महत्वाचा उपक्रम असलेने याबाबतचा सविस्तर अहवाल निवडक छायाचित्रे व व्हिडीओ यांचेसह प्रस्तुत कार्यालयास उपक्रम पूर्ण झालेनंतर १० दिवसांच्या आत सादर करावा जेणेकरून याबाबत विहित कालावधीमध्ये केंद्रास सादर

करता येईल.

सदर उपक्रमासाठी केंद्रस्तर, तालुकास्तर व जिल्हास्तरावर आवश्यक निधी देण्यात येणार असून याबाबत च्या स्वतंत्र सूचना देण्यात येतील.

उपरोक्त सर्व उपक्रमामध्ये आपण, सर्व क्षेत्रीय अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, गणित प्रेमी यांनी प्रदर्शनास भेटी द्याव्यात. उपरोक्त प्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा /कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटाचा व्हिडीओ व फोटो, समाज संपर्क माध्यमांवर (उदा. इंस्टाग्राम, फेसबुक व इतर) #Nationaleducationpolicy२०२० #NIPUNOTSAV,

शासन निर्णय pdf येथे पहा

👉pdf download 

 

2 thoughts on “निपुण भारत अभियान अंतर्गत केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावर “निपुणोत्सव” उपक्रमाचे आयोजन करणेबाबत Nipun Bharat activity ”

  1. सर मी कौशल्य विभागा कौशल्य विकास विभाग अंतर्गत पूर्णवेळ शिक्षक म्हणून कार्यरत होतो .त्यात मला बारा वर्षानंतर ची वरिष्ठ वेतन श्रेणी मिळणे अपेक्षित होते, परंतु मला बारा वर्षांची वेतनश्रेणी मिळालेली नाही. तरी आता काय करावे काय दहा वीस तीस अंतर्गत मला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळेल काय?

  2. Now I am retired as a headmaster government technical high school

Leave a Comment