केंद्र शासनाचे आर्थिक वर्ष २०२३-२०२४ (कर निर्धारण वर्ष २०२४-२०२५) करीता आयकर कपातीचे परिपत्रक निर्दशनास आणणेबाबत income tax deduction
शासन परिपत्रक :-केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने परिपत्रक क्रमांक १/२०२४ एफ क्र.३७०१४२/ ३८/२०२३, दिनांक २३ जानेवारी, २०२४ अन्वये वित्तीय वर्ष २०२३-२०२४ करीता (कर निर्धारण वर्ष २०२४-२०२५) आयकर कपातीबाबत सविस्तर सूचना निर्गमित केल्या आहेत. सदर परिपत्रक त्यासोबतच्या सहपत्रासह केंद्र www.incometaxindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कर कपात शासन निर्णय येथे पहा 👉pdf download
शासनाच्या सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग/विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांनी केंद्र शासनाच्या वर नमूद केलेल्या परिपत्रकानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०२०७१५२५५३८६०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.