मराठी अप्रतिम निबंध pdf Marathi essay pdf 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठी अप्रतिम निबंध pdf Marathi essay pdf 

निबंध क्रमांक -1

माझी आई

माझ्या आईचं नाव सुरेखः. आईला आम्ही ‘आई’च म्हणतो. वेड्या मुलांप्रमाणे ‘मम्मी’ म्हणत नाही. आईला व बाबांनापण ते आवडत नाही. माझी आई साधी- सुधी दिसते, साधंसुधं वागते.

माझी आई नेहमी गोड बोलते. कधी रागावत नाही. आमचं काही चुकलं तर चूक समजावून सांगते आणि ‘पुन्हा असं कधीही ती चुकू नका हं!’ असं पाठीवरून, डोक्यावरून प्रेमळपणे हात फिरवून सांगते.

मी आणि ताई आईला सारखेच आवडतो. दोघांचेही सारखेच लाड करते, तसेच आम्हाला एकमेकांवर प्रेम करायला सांगते. त्यामुळं आम्ही एकमेकांशी खोटं-खोटं, लुटुपुटीचंसुद्धा भांडत नाही. एकमेकांची कामंसुद्धा न कुरकुरता करतो. आईनंच शिकवलंय तसं आम्हाला. आम्ही आईलाही कामात मदत करतो.

माझी आई खूप शिकलेली नाही; पण आमचा अभ्यास ती व्यवस्थित करून घेते. त्यामुळं मी अभ्यासात मागे तर नसतोच; पण वर्गात सगळ्यात हुशार मानला जातो. आईच्या प्रयत्नांनीच माझं अक्षरपण सुंदर बनलंय आणि लेखनही शुद्ध असतं. चुकूनच एखाद्या वेळी वहीत व परीक्षेत चुकतं. त्यामुळं मी सगळ्या

शिक्षकांचाही आवडता बनलोय.

शाळेत होणाऱ्या स्पर्धांत व विशेष कार्यक्रमांसाठी घरी आईचं मार्गदर्शन असतंच. त्यामुळं त्यांतही मला भरघोस यश मिळतं. शाळेतील विशेष कार्यक्रमांना आई स्वतः हजर राहते व गुणांचं अन् यशाचं तोंड भरून कौतुक करते. घरी आल्यावर गोडगोड खायलापण करून देते. कार्यक्रमात झालेल्या चुकापण सांगते. म्हणून पुढच्या वेळी आम्ही त्या चुका पुन्हा करीत नाही.

संध्याकाळी आई जवळ बसवून आमची ‘शुभंकरोती’ म्हणवून घेते. पाठ केलेली स्तोत्रे म्हणवून घेते व नवीन स्तोत्रे शिकवते. त्यामुळं वर्गात माझंच पाठांतर सर्वात जास्त आहे. पुस्तकांतील कविता व श्लोक तर पाठ आहेतच. त्यामुळं माझं सगळेच जण कौतुक करतात. अर्थात माझ्या यशाचं, कौतुकाचं, हुशारीचं सगळं श्रेय आईलाच आहे.

म्हणून तर माझी आई मला देवाहूनही खूप आवडते.

निबंध क्रमांक -2

माझे घर 

एका कवीनं म्हटलंय,

ते माझे घर, ते माझे घर। जगावेगळे असेल सुंदर।’ खरंच, माझं घरही जगावेगळं अन् सुंदरच वाटतं. तसं माझं घर छोटंसं पण

‘ पुरेसं मोठं आहे. म्हटलं तर शहरातल्या गजबजलेल्या रस्त्यावर आहे आणि म्हटलं तर वेड्या गर्दीपासून दूर दूरही. तुम्ही म्हणाल, हे कसं काय बुवा दोन्हीही? सांगतो हं! घरापुढचा रस्ता लोकांनी गजबजलेला असतो. असंख्य लोकांची ये-जा चालू असते; पण मोठ्या रस्त्यावरील वाहनांची वेडी धावपळ, विविध भोंग्यांचे कर्कश्श किंचाळणे, ट्रक, बसेस, स्कूटर्स इत्यादी वाहनांची भन्नाट घरघर हे तिथं नाही.

अशा सुयोग्य भागात आमचं दुमजली छानसं घर आहे. बघितलं की तुम्हा सगळ्यांना हेवा वाटेल आणि हवं हवंसं वाटेल असं. त्याची बांधणी जुन्या त-हेची आहे. मोठ्या दरवाजातून आत आलात की ऐसपैस अंगण, अंगणात पाण्याचा हौद आणि शेजारीच न्हाणीघर.

दोन-तीन पायऱ्या चढलात की, प्रशस्त ओसरी. ओसरीवर झोपाळा, समोर एक कोच अन् चार खुर्ष्या, मध्ये बैठे छोटे मेज अशी सुरेख बैठक. त्याला लागूनच स्वयंपाकघर. त्यात पुरेसा उंचा ओटा, आवश्यक तेवढे मांड, त्यात आकर्षक रचनेची भांडी, डबे, बरण्या आणि स्वयंपाकाची साधने. स्वयंपाकघरातच एक छोटेसे पण ऐसपैस देवघर.

दुसरा मजला माडी. माडीवर झोपण्याची मोठी खोली, आमची अभ्यासाची खोली, समोर प्रशस्त सज्जा, त्यात रंगीबेरंगी फुलांच्या मोजक्याच कुंड्या, सगळीकडे वारा व उजेडासाठी पुरेशा आणिक सुरक्षित खिडक्या, खिडक्यांना जाळीदार रंगीत पडदे.

मडीच्या वर माळवद किंवा गच्ची, उन्हाळ्यात झोपण्यासाठी अन् आईच्या उन्हाळ्यातील पापड-कुरवड्यासारख्या वाळवणासाठी. सभोवार एकसारख्या नक्षीदार मोठ्या कुंड्या. त्यात सुगंधी फुलांची झाडे व तुळशीची रोपे. बाबा रोज सुगंधी फुलांनी देवांना सजवितात.

आमचे नुसते घरच सुरेख आहे असे नाही, तर घरातले आम्ही सगळे जण परस्परांशी प्रेमानं आणि जिव्हाळ्यानं वागतो आणि मला वाटतं, तेच खरं घराचं घरपण. आमच्या घरात प्रेम आहे, आनंद आहे आणि सर्व काळ सुखच आहे. आणि हो! सहृदय अतिथ्यपण आहे. या ना एकदा आमच्या ‘घरी’ सवड काढून.

निबंध क्रमांक -3

माझी शाळा 

माझी शाळा आपटे हायस्कूल, पंढरपूर-चंद्रभागेच्या तीरावर. रम्य व शांत वातावरणात तिथं मला शिकायला मिळतं. माझी शाळा भव्य वगैरे नाही; पण एक मजली, टुमदार, कौलारू आहे. चारी बाजूंनी बंदिस्त व म्हणून सुरक्षित आहे. रस्त्यावरील वाहतुकीचा कसलाच धोका नाही.

मधल्या भागात पटांगण आहे. छोट्या सुट्टीत आम्ही तिथं मोकळेपणानं खेळतो, वावरतो. पटांगण अत्यंत स्वच्छ असते. आम्ही ते नेहमी स्वच्छ ठेवतो. याच पटांगणावर छोट्या-मोठ्या शालेय सभा व प्रासंगिक कार्यक्रम होतात. वार्षिक क्रीडामहोत्सावात लंगडी, चेंडूफेक अशा खेळांच्या व चमचा लिंबू, तिपायी धाव, संगीत खुर्ची, कोल्हा व द्राक्षे असल्या मनोरंजनात्मक स्पर्धाही होतात.

तरीही आमच्या शाळेला लागूनच स्वतंत्र असे प्रशस्त क्रीडांगण आहे. तिथं मोठे खेळ, पळणे, उंच-लांब उड्या, गोळाफेक, डबलबार, सिंगलबार यांची सोय आहे. निरनिराळ्या कवायतीही तिथंच होतात. संचलनाचा सरावही घेतला जातो. पूर्वीपासूनच आमच्या शाळेला खेळाची व व्यायामाची उल्लेखनीय परंपरा आहे. मल्लखांब हे तर आमच्या शाळेचं पुरातन वैशिष्ट्य.

चित्रकला दालन, घोष विभाग व क्रीडा साहित्या याइतीत हा विभाग सर्वच बाबतीत सुसज्ज आहे. क्रीडा

साहित्यालयात लाठी, लेझीम, घुंगुरकाठ्या, डंबेल्स, जोड्या, निशाणे, टेक-ऑफ बोर्ड्स, मुलींसाठी उड्याच्या दोऱ्या, छोटे-मोठे लोखंडी गोळे, सगळ्या प्रकारचे चेंडू, रिंग्ज इत्यादी भरपूर साहित्य आहे. मोठ्या शाळांच्या मानाने आम्ही कुठंच कमी पडत नाहीत.

शाळेत ग्रंथालयही आहे. तिथं सगळ्या विषयांची भरपूर पुस्तकं आहेत. जशी गोष्टीची, तशी विविध माहितीची व वैज्ञानिक पुस्तके आहेत. शिक्षकांसाठीही भरपूर ग्रंथसंग्रह आहे. विविध भाषांचे कोश व सगळ्या प्रकारच्या माहितींचे कित्येक नकाशे व तक्ते आहेत. आम्ही त्यांचा भरपूर व व्यवस्थित उपयोग करून घेतो.

वर्गाच्या खोल्या पुरेशा प्रशस्त व हवेशीर आहेत. विविध विषयांचे अभ्यास तक्ते, सुवचने लावून वर्ग सजवलले आहेत.

माझ्या शाळेत पूर्वीपासूनच तज्ज्ञ, मन लावून अभ्यासपूर्ण शिकवणाऱ्या व प्रेमळ शिक्षकांची परंपराच आहे. त्यामुळे आमच्या शाळेला सर्वत्र भरघोस यश मिळते. माझी शाळा मला खूप आवडते. एका जुन्या विद्यार्थ्यानं म्हटलंच आहे ‘गुण शोधून वाढविणारी, दुर्गुण दूर करणारी।

अशी आमची शाळा आहे, या शाळेतून पुढे चला।।’

निबंध क्रमांक -4

माझे छंद 

घरी-दारी, शाळेत नेहमीच सारखा कसला अभ्यास करायचा? अभ्यासाशिवाय वेगळं काही तरी हवंच. काही नवीन पाहावं, काही नवीन ऐकावं, काही गोळा करावं, जमवावं, काही नवीन तयार करून पाहावं, याला म्हणतात ‘छंद’. छंद म्हणजे नाद. कुणी ‘नादिष्ट’ म्हटलं तरी चालेल. सारखा अभ्यासही नको आणि सारखं कशात गुंतणंही नको. थोडा अभ्यास, थोडा छंद असं सुरेख मिश्रण हवं.

छंदातून करमणूक होते, तसं नकळत ज्ञानही मिळतं. आता माझा हा छंदच पाहा ना. घरात बाजाची पेटी होती. अजूनही आहेच. भाता ओढला अन् पट्टया दाबल्या की निरनिराळे आवाज येतात. लहानपणी कळत नव्हतं, तेव्हा नुसते आवाज ऐकण्याचीच गंमत वाटायची. कुणीतरी छान पेटी वाजवताना पाहिलं अन् त्यातून गाणंही वाजवता येतं हे कळलं आणि पेटी वाजवायला शिकण्याचा नाद लागला. दोन एक वर्षात मला छान पेटी वाजवणं जमू लागलं. आता शाळेतल्या स्नेहसंमेलनात बरीच गाणी वाजवायची साथ करायला सर मलाच सांगतात. मी

पण पेटी वाजवत गाणी म्हणतो. माझा दुसरा छंद सुवचने वहीत लिहून काढायचा. संस्कृत श्लोक, मराठी

कवितातील सुभाषितवजा ओळी, इंग्रजी म्हणी अन् वाक्प्रचार, संतांच्या अभंगाच्या ओळी जे सापडेल ते लिहून ठेवतो. लोकांच्या बोलण्यात येणारी अशी सुंदर बाच्या लगेच लिहून ठेवतो. विवेकानंद, सावरकर, साने गुरूजी, डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरूजी यांचे सुंदर सुंदर विचारही मी लिहून ठेवतो. य. गो. जोशी, महादेवशास्त्री जोशी, pi . दि. माडगूळकर अशा थोर व प्रतिभासंपन्न लेखकांच्या पुस्तकातील वाक्य, उतारे उतरून घेतो. यातून मला वाचनाचाही छंद लागला. ग्रंथालयात न मिळणारी पुस्तकं विकत आणण्याचाही छंद लागला. यासाठी बाबा आनंदानं पैसे देतात.

निसर्गचित्रे जमा करण्याचाही मला छंद आहे. विविध जुनी मासिके रस्त्यावर स्वस्तात विकत मिळतात. माझी ही आवडही लक्षात घेऊन बाबा मिळतील ती, तशी मासिके आणून देतात. सुमारे सात-आठशे चित्रांचा माझा संग्रह आहे. घरी येणारे पाहुणे अन् बाबांचे मित्रही चित्रे, मासिके, वृत्तपत्रे आणून देतात.

झाडांची पाने आणून त्याच्यासाठीही एक चिकट वही करून ठेवलीय. सुमारे दोनशे प्रकारची पाने माझ्या वहीत आहेत. गाण्याचे कार्यक्रम ऐकण्याचाही छंद मला आहेच आणि बरं का! नुकताच मला कविता करण्याचाही छंद लागलाय. पुण्यातली सगळी वस्तुसंग्रहालये मी पाहून टाकलीत. नवीन भरणारी प्रदर्शनेही पाहायचे मी सोडत नाही.

आमच्या शाळेतील चित्रकला शिक्षक श्री. केसकर सर खूपच रसिकतेनं शिकवतात. त्यांच्यामुळं चित्रकलेचा छंदही जडणार असं दिसतंय.

निबंध क्रमांक -5

माझे मित्र 

‘ज्याला मित्र नसतात त्याला खरं सुख कुठून मिळणार?’ अशा अर्थाचं एक संस्कृत सुभाषित आहे, तसं असेल तर या जगात सध्या तरी मी अत्यंत सुखी आहे. कारण मला मित्र पुष्कळ आहेत. सगळे माझ्या वर्गातलेच आहेत असं नाही. काही शाळेतल्या इतर वर्गातले आहेत, काही दुसऱ्या शाळेतील; पण माझ्या इयत्तेतील. काही गल्लीतले आहेत, तर काही शाखेतले. त्यामुळं माझ्यापेक्षा काही जण मोटेही आहेत. सगळेच जण मित्र आहेत; पण त्यातही काही थोडेसे जिवलग, माझ्या सुख दुःखात सहभागी होणारे, माझ्यासाठी कसलेही कट सोसणारे जज माझ्याशिवाय चैन न पडणारे व मलाही त्यांच्यापासून न करमणारे. काही जण निवडक मित्र आमच्या आईवडिलांनाही माहिती आहेत. त्यामुळे कुणाच्याही घरी तर एकमेकांच्या घरी जाऊन अगदी एका ताटात जेवणारे असे आहेत. असे

नवीन पदार्थ केला की एका हाकेत सगळे जमा होतात. आम्ही परस्परांचे कुटुंबा बनलो आहोत.

बंड्या, पुरुष्या, शश्या आणि राजा ही चौकडी अशीच आहे. सकाळी नदेक जाऊन येणं अन् संध्याकाळी सगळे जमून शाखेत जायचं आणि घरी परताक हे आमचे ठरलेले कार्यक्रम. योगायोगानं सगळे निरनिराळ्या शाळांतले पण एकर इयत्तेतले. त्यामुळं आंमचा एक फायदा होतो. एक विषय परस्परांचे शिक्षक कर समजावून सांगतात, ते सगळ्यांनाच घरबसल्या कळतं. आम्ही रात्री एकत्र अध्यार करतो ना!

तरीपण काही बाबतीत आम्ही एकमेकांवर कुरघोडी करण्याची छुप्या किंवा उघड स्पर्धेनं धडपड करतोच. सगळ्यात आपलंच अक्षर वळणदार करण्याची, प्रत्येक विषयात चौघांत जास्त गुण मिळविण्याची, वहीत किंवा उत्तरपत्रिकेत कमीत कमी चुका होऊ देण्याची आणि जोरबैठकांची संख्या वाढविण्याची. मात्र यामुळे आमच्या सर्वांनाच फायदा होतो. आमच्या वर्गात तर सोडाच; पण आमच्या शाळेतल्या सगळ्या तुकड्यांत आम्हीच चौघे पहिले असतो. शाळेत वेळेवर जाणं, गणवेश स्वच्छ व नीटनेटका असणं, सगळ्या तासांना उपस्थित राहणं, गृहपाठाच्या व सुलेखनाच्या वह्या वेळेवर देणं, शिक्षकांशी अत्यंत आदरानं वागणं या बाबतीत आमचा अत्यंत कटाक्ष आहे. कुणी कशात कमी पडत नाही pi हे आम्हीच

पाहतो. त्यामुळं वर्गनेतृत्वाची संधी आम्हाला आपोआपच मिळते. आहोत. आम्हीच एकमेकांचे पालकच आहोत. म्हणून तर परस्परांचे जिवलग मित्र आहोत

निबंध क्रमांक -6

माझा आवडता खेळ 

माझा आवडता खेळ

माझा आवडता खेळ खो-खो. जेव्हा मी पहिल्यांदा खेळलो तेव्हापासून मी त्याच्या प्रेमात पडलो. मला तो खूपच आवडला. त्या दिवशी रात्री स्वप्नात सुद्धा मी खो-खो खेळलो.

त्या वेळी त्याची तशी पूर्णपणे ओळख झाली नव्हती. त्यातले नियम माहिती नव्हते. त्यातला कौशल्येसुद्धा नीट समजली नव्हती; पण तरीही सरांनी जेव्हा खेळाच्या तासाला पहिल्यांदा तो नियम वगैरे फारसे न सांगता, नुसते दोन खांबांच्यामध्ये उलटसुलट बसवून पळायला व शिवायला सांगितले, तेव्हाच खूप मज्जा वाटली. पुढच्या तासाला शिवणाच्या न बसलेल्यांच्या मधून जायचं नाही, मागे वळून पळायचं नाही, गडी सापडत नाही असं दिसताच पाठीशी उभा राहून ‘खो’ म्हणून मोठ्यांदा ओरडून त्याच्या जागी बसायचं आणि आपल्याला खो मिळताच कौशल्यानं उठून एकदा घेतलेली दिशा न बदलता गडी बाद करायचा, या गोष्टी शिकवल्यावर तर आणखीनंच मजा आली. बाकीच्या खेळापेक्षा खो खोच सारखा खेळावा असं वाटू लागलं.

असं एका महिनाभरात हळूहळू एकेक कौशल्ये शिकवीत सरांनी आमची चांगलीच तयारी करून घेतली. या वेळेपर्यंत सगळे नियमही अंगात मुरले आणि मग एक दिवस मैदान आखून सरांनी सरळ छोटासा सामनाच घेतला. मी तर त्या दिवशी भलताच खूष होतो. पळण्याचा वेग व झेप हेही आत्मसात झालं. ‘खो’ मिळताच एका झपाट्यात गडी बाद करू लागलो. पळणाऱ्याच्या कौशल्यावर मात करू लागलो. प्रत्येक कौशल्यात आक्रमक पवित्रा घेऊ लागलो. एका ‘खो’ त दोन-तीन गडी बाद करण्याचा सपाटाच ठेवला. ‘खो’ देण्याचं अन् घेण्याचं कौशल्यही चांगलंच आत्मसात केलं.

उलट पळण्याच्या डावात शिवणाऱ्या गड्याला द्याव्या लागणाऱ्या हुलकावण्यानं अन् तुफान वेगानं त्याला जेरीस आणू लागलो. हे पाहून सरांनी मला एकट्याला काही खास कौशल्य शिकवून त्यांचा भरपूर सराव करून घेतला.

या खेळात जशी शारीरिक क्षमता लागते, तशी बौद्धिक कौशल्य क्षमताही असावी लागते. ‘खो’ देणं अन् घेणं या दोन्ही गोष्टींत चपळता अन् अचूक निर्णय क्षमताही असावी लागते. अखंड सावधानता हा तर या खेळाचा आत्माच म्हणावा लागेल. दुसऱ्याची कौशल्यं वैशिष्ट्य पाहून त्यांचाही सराव करणं फायदेशीर ठरतं. वाघासारखी झेप घेता येणं आणि हरणासारखं अत्यंत वेगानं पळणं दोन्हीही कसब खेळाडूजवळ असावी लागतात. आणि म्हणून तर मला तो खेळ अत्यंत आवडतो.

निबंध क्रमांक -7

माझी आवडते पुस्तके 

माझी आवडती पुस्तके

माझे जे विविध छंद आहेत, त्यात पुस्तक वाचन हा त्यातील महत्त्वाच्या छंदांपैकी एक आहे. मोठ्या सुट्टीत मी डबा घेऊन ग्रंथालयात जातो अन् एखादं गोष्टीचं किंवा माहितीचं पुस्तक मागून घेऊन डबा खात खात पुस्तकं वाचतो किंवा पुस्तक वाचत वाचत डंबा खातो म्हणजे एका वेळेत दोन कामं होतात. डब्यात ओलं किंवा खरकटं काही नसतं, त्यामुळं हात धुवायचा प्रश्न उरत नाही. सुट्टी संपल्याचा गजर झाला की, उठून पुस्तके परत करून पाणी पिऊन वर्गात जाईपर्यंत तासाचा टोल पडतो.

त्यावेळेत मी पुस्तकं निवडतो ती गोष्टींची; पण बाबांनी एकदा सांगितलंय की, गोष्टींची पुस्तकं वाच; पण परी, राक्षस, राजकुमार, राजकन्या यांची कल्पनाशक्तीच्या बाहेरच्या धाडसाची जादूची, चेटकिणीची असली पुस्तकं वाचू नकोस. ज्या गोष्टी कधी आपल्या आयुष्याशी जुळत नाहीत त्या वाचण्यात काय अर्थ? उगीच आपल्या बहुमोल आयुष्यातील वेळेचा अपव्यय. म्हणून तू सानेगुरूजींची पुस्तकं वाच, य. गो. जोशी, महादेवशास्त्री जोशी यांच्या गोष्टींची वाच. शास्त्रज्ञांची चरित्रं, थोरामोठ्यांची चरित्रं, क्रांतिकारकांच्या धाडसांची पुस्तकं वाच. निसर्गाची माहिती करून देणारी पुस्तकं, प्रवासवर्णन असली पुस्तकं वाचीत जा. म्हणून मी तसलीच छोटी छोटी पुस्तकं वाचतो.

मला सानेगुरूजींची सगळी पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात. विशेषतः ‘श्यामची आई’ पुस्तक पुन्हा वाचलंय. क्रांतिकारकांची चरित्रं वाचणंही मला अतिशय आवडतं. य. गो. जोशी यांचा ‘सुपारी’ सुद्धा वाचायला आवडतं.

गोष्टींच्या पुस्तकाशिवाय मला चांगली चांगली निबंधाची पुस्तकंही मी वाचतो. गोपीनाथ तडवळकरांचं लेखनही मी आवडीनं वाचतो. संस्कृत ग्रंथांची ओळख करून देणारी छोटी पुस्तकं वाचायला मला आवडतात. रामायण, महाभारत, भागवत या ग्रंथांवरची गोष्टींची सगळी पुस्तकं माझी वाचून झालीयेत. संस्कृत सुभाषितांची अर्थासह असलेली पुस्तकंही मी आवडीनं वाचतो. अमरेंद्र गाडगीळ यांची ‘संस्कृत साहित्य सरिता’ मी वाचून काढलीय. ज्ञानेश्वर, तुकाराम अशा महाराष्ट्रीय व इतर संतांची चरित्रं मला वाचायला आवडतं. अशी आहे माझी पुस्तक वाचनाची आवड.

निबंध क्रमांक -8

मी पाहिलेला पाऊस 

पाऊस आला पाऊस

हल्ली काहीच वेळेवर येत नाही. रेल्वेच्या गाड्या, एस.टी., कार्यक्रमाला पाहुणे म्हणून, अध्यक्ष म्हणून बोलाविलेले मंत्री हे कधीच वेळेवर येत नसतात. त्याप्रमाणे आजकाल पाऊससुद्धा वेळेवर येईनासा झालाय, वेळापत्रकात ७ जून हा दिवस त्याला नेमून दिलाय. त्यादिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यानं जमेल तेव्हा केव्हाही त्यानं यावं. अगदी नुसता एकदाच गुलाबपाण्यासारखा शिडकावा केला तरी चालेल. त्याचंही आम्ही कौतुक करतो. एका कवीनं म्हटलंच आहे. ‘नेमिच येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा।।’

मे महिन्याच्या उन्हाळ्यानं जीव, शरीर कसं पोळून निघत असतं. बर्फ घालून उसाचा रस, आइस्क्रीम, लस्सी, पन्हं, लिमका आणि मस्तानी ही अन् अशीच शीतपेयं पिऊन वैताग आलेला असतो. घरात पंखे रात्रंदिवस भिरीभिरी फिरत असतात. बाहेर हुश्श हुश्श करून हैराण होत असतं. केव्हा एकदा सडसड पाऊस येईल असं सारखं वाटत असतं. नुसता गडगडाट ऐकला तरी बरं वाटायला लागतं.

अशा अवस्थेत जून महिना अर्धा संपून गेला तरी जर पावसाचं लक्षण दिसलं नाही तर काय होत असेल सांगा. पहिल्या वर्षावाच्या सरीसाठी शेतकरी व्याकूळ होईल यात नवल नाही. आम्हीसुद्धा रडकुंडीला आलेले असतो. ‘येरे येरे पावसा’ म्हणत खोट्या पैशांची लालूच दाखवतो. तरीही मोठाच काय, छोटा सुद्धा पाऊस नाही आला तर…?

आणि ध्यानीमनी नसताना अचानक वकिलांच्या कोटासारखे काळे कुट्ट ढग आकाशात येऊन सरीवर सरी येऊ लागल्या तर…? मुलंच काय, मोठी मोठी माणसं सुद्धा आनंदानं नाचायला लागतात. मुलांना मामा आल्यावर टाळ्या पिटत, जसं ‘मामा आला, मामा आला’ असं ओरडत सांगावंस वाटतं, तसंच मुलं, मुली, पुरूष, बायका अगदी म्हातारेसुद्धा आनंदानं एकमेकांना सांगतात, ‘पाऊस आला पाऊस.’ आत समोर सगळ्यांना पडताना दिसणारा पाऊस आलेला काय सांगावा लागतो; पण आनंद हा दिल्यानं वाढतो म्हणून सांगतात.

पावसाच्या वेगानं पडणाऱ्या सरीत भिजताना काय मज्जा येते म्हणता! तशात लहानमोठ्या गारा पडाव्यात, मग तर धम्मालच, भिजताना आरडाओरडा, गारा गोळा करतानाही आरडाओरडा. सगळा आनंदच आनंद, आई, वडील, आजोबा घरातून ओरडत असतात ‘पावसात भिजू नकोस, थंडी होईल. घरात ये बघू!’ पणा त्याच्या ओरडण्यात तेवढा दम नसतो, कारण एक तर त्यांच्या लहानपणी त्यांनी

तेच केलं असतं. आताही तसंच करावसं वाटतं; पण मोठेपणामुळे तसं करता येत नसतं.

मला तर सगळ्या, ऋतूत पावसाळा आवडतो बुवा!

निबंध क्रमांक -9

मी पाहिलेले रम्य ठिकाण

गेल्या महिन्यात वर्गाबरोबर सहलीला जायचा योग आला. ‘भीमाशंकर’ पाहायचं ठरलं. जाण्याआधी त्या भागाची कणभरही माहिती नव्हती. त्यामुळं त्या ठिकाणाबद्दल विशेष उत्सुकताही नव्हती. तिथं जे काही असेल ते पाहून येण्याची मनाची तयारी होती.

पण अलीकडचं घोडेगाव सोडलं अन् गाडी भीमाशंकराच्या डोंगराकडं वळली. थोडं फार अंतर जातोय न जातोय तोच त्या भागातल्या सौंदर्याचे पाळण्यातले पाय दिसू लागले. गाडी चढावरून निघाली अन् दोन्ही बाजूंची वनश्री आपली तोंडओळख करून देऊ लागली. चढ जसजसा वाढू लागला, तसतसा अरण्याचा घनदाटपणाही वाढू लागला. मोठमोठ्या उंच वृक्षाखाली छोटी झुडपंही मजेत डुलत उभी होती. फुलांची झाडं, मोठ्या झाडाला घट्ट बिलगलेल्या वेली, टप्पोऱ्या फुलांचे डेरेदार वृक्षहारीनं इथं येणाऱ्यांच्या स्वागताला सदैव सिद्ध असलेले दिसत होते. कविश्री माडगूळकरांनी म्हटल्याप्रमाणे-

किती फुलांचे रंग गणावे।

कुणा सुगंधा काय म्हणावे।

मूक रम्यता सहज दुणावे।

येताच कूजने कर्णपुटी।।

अशीच कुणाचीही अवस्था होईल- माझी तरी नक्की तशी झाली. आणि ही अवस्था उत्तरोत्तर वाढतच होती. इथं डोंगर होता, चढ होता; पण

कात्रजच्या घाटासारख्या उत्तरणी किंवा दऱ्या नव्हत्या. नुसती झाडी म्हणजे झाडी. त्यामुळं घनदाटपणाचा अनोखा आनंद तिथं होता. जाताना असं ऐकलं की या अरण्यात वाघोबाही दिसतात. त्यांना बघायची उत्सुकता होती; पण सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा, एकही जण भेटले नाहीत.

अरण्य संपलं अन् डोंगरमाथ्यावर आलो आणि काही कळायच्या आत भीमाशंकर मंदिराच्या परिसरात गाडी येऊन उभी राहिली अन् आमचा प्रवास संपला. भीमाशंकराचं मंदिर जरा खोलात आहे. जवळच भीमा नदीचा उगमही आहे. आम्ही त्या प्रवाहातील कुंडात स्नाने केली, ज्योतिर्लिंग शिवाचे बेल वाहून पूजन

निबंध क्रमांक -10

मला पडलेले एक स्वप्न

एका संकष्टी चतुर्थी दिवशी, त्यात मंगळवार असल्यानं जेवणं रात्री चंद्रोदयानंतर होती अन् दिवभर उपवास असल्यानं आईनं सकाळी साबुदाण्याची मस्त खिचडी नारळाचा कीस, कोथिंबीर, लिंबू पिळून दिलेली होती. सोबत शेंगदाण्याची दह्यात कालवलेली चटणी, साबुदाण्याच्या पापड्या, शेंगदाण्याचा लाडू, राजगिऱ्याच्या वड्या, रवीखालचं घट्ट ताक, गोड पिकलेली केळी असा फराळाच बेत केला होता.

फराळ मस्त झाला. शाळेला जायला तास दीडतास अवकाश होता. वेताच्या आरामखुर्चीत पडून इतिहासाचं पुस्तक वाचत पडलो होतो. म्हटलं वेळ झाली की उठून दप्तर घेऊन शाळेत निघावं. ते भरून ठेवलंच होतं. वाचत बसून पंधराएक मिनिटं झाली नसतील तोच…!

बाबा खुशीत घरी आले अन् मला म्हणाले, “बाळा, ऊठ लगेच चल. आपल्याला आपलं नवीन घर पहायला जायचंय, पाहून येऊ.”

मी लगेचच उठलो, बूट घातले अन् निघालो. बाबांच्या स्कूटरवरूनच जायचं होतं. शाळेच्या जवळच आलो. शेजारच्या रस्त्यावरून गल्लीत शिरलो अन् एका सुंदर घराजवळ थांबलो. शाळेपासून पाच मिनिटांच्या अंतरावर घर होतं. गजर सहज ऐकू यावा इतपत जवळ.

घरात पुढं फरसबंदीचं अंगण होतं अन् पुढं दुमजली घर, खाली समोर बैठकीची खोली, समोरासमोर दोन कोच. जवळ दोन खुच्र्यामध्ये टेबलक्लॉथ घातलेलं छोटंसं टेबल, दोन्ही बाजूला भिंतीत खुंट्या, दोन दोन सुरेख कोनाडे,

सिमेंटचा भिंतींना गिलावा, ऑइल पेंट. आत प्रशस्त हवेशीर व भरपूर उजेडा स्वयंपाकघर, ओटामांड, उंच भिंतीतली कपाटं. त्यातले एक जाळीचं. बाहेरचा खोलीत वर जायचा जिना.

माडी ऐसपैस लांबरुंद, तिथंही भिंतीत मोठी कपाटं, वर कोनाडे, खुंट्या, दोन्ही बाजूला दोन दोन खिडक्या, समोर अंगणाकडं गच्ची, जाळीचा कठडा, मागच्या बाजूलाही एक गच्चीः मागच्या मोकळ्या जागेत संडास व न्हाणीघर, जवळच पाण्याचा हौद, त्यामागं छोटासा परस. कुंड्या ठेवायला जागा, मधल्या

भागात झोपाळा. वा! काय सुरेख जागा होती! विशेष म्हणजे शेजारच्या घरातच माझा जागी दोस्त विसू राहत होता. तो दप्तर भरत होता. ओरडूनच मी हाक मारली ‘विश्या, आम्ही इथं राहायलं येणार’

तेवढ्यात आईनं हलवून उठवलं “बाळाजी, उठा साडेअकरा वाजले. शाळेत नाही का जायचं! कुठं आलाय विसू?” छान, म्हणजे नवं घर मी स्वप्नात पाहत होतो तर…! मस्त पोटभर फराळ झाल्यानं पडल्या पडल्या डुलकी लागली होती. तिचा सगळा प्रताप. मी मुकाट्यानं उठलो अन् दप्तर घेऊन शाळेत निघालो.

निबंध क्रमांक -11

दसरा

वर्षातले जे महत्त्वाचे साडेतीन मुहूर्त आहेत त्यापैकी दसरा हा पूर्ण मुहूर्त आहे. दसऱ्याला विजयादशमी असे दुसरं नाव आहे. या दशमीच्या आधी आश्विन महिन्यात देवीची नवरात्र असते. नवरात्रीची सांगता या दहाव्या दिवशी होते. याला ‘सीमोल्लंघन’ असेही नाव आहे. हे नाव का बरं पडलं असावं?

महाभारत काळात पांडव वनवासात जाताना त्यांनी आपापली शस्त्रे हस्तिनापूच्या

सीमेवरच्या एका शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवली होती. संधीचे सर्व प्रयत्न हरल्यावर

वनवास संपताच त्यांनी ते शस्त्रे बाहेर काढली. रक्षण केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून

शमी वृक्षाचं पूजनं केलं, त्या वृक्षाचे तुरे मुकुटात खोचले अन् कौरवांना

जिंकण्याचा मुहूर्त केला. त्या प्रसंगाचे प्रतीक म्हणून हे सीमोल्लंघन.

रामायण काळापूर्वी रामाचा एक पूर्वज रघू होता. तो सतत यज्ञ करून सगळी संपत्ती दान करायचा, मग या दिवशी सवारीवर जाऊन राजे लोकांवर विजय मिळवून पुन्हा संपन्न व्हायचा. एकदा रघूनं यज्ञ करून सगळी संपत्ती दान करायला आणि वरतंतू महर्षीचा शिष्य कौत्स गुरूदक्षिणा देण्यासाठी चौदा कोटी सुवर्णमुद्रांचे दान मागायला आला. राजाला निष्कांचन अवस्थेत पाहून परत निघाला. खून

त्याला रात्री मुक्कामाला ठेवून घेतलं आणि पहाटे कुबेरावर स्वारी करण्याची योजना आखली. कुबेराच्या यक्षदूतांनी ती बातमी कुबेराला सांगितली. रघूचा पराक्रम माहिती असल्यानं कुबेरानं अयोध्येच्या सीमेवरील शमी वृक्षावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. कौत्साला त्या घेण्यास सांगितले. निर्लोभी कौत्सानं चौदा कोटीच मुद्रा मोजून घेतल्या. राजानेही त्या उरलेल्या मुद्रा स्वतः न घेता प्रजेला लुटून नेण्यास मागितल्या. त्या प्रसंगाची आठवण म्हणून सीमेवर जाऊन शमींची पूजा करून आपट्याची पानं सोनं म्हणून परस्परांना देतात. याच दिवशी रामानं रावणावर अखेरच्या युद्धात विजय मिळवून रावणाला मारलं होतं म्हणून या दिवसाला “विजयादशमी’ असं नाव आहे.

परस्परांतील हेवेदावे संपवून सद्भाव निर्माण व्हावा म्हणून हा आनंदोत्सव साजरा करतात. या दिवशी पूर्वी विद्या शिकण्याचा प्रारंभ करीत असत. म्हणून हा सरस्वती पूजनाचाही आहे.

१९२५ साली याच दिवशी कै. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी आजच्या विशाल व राष्ट्रव्यापी अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली म्हणून या दिवशी सबंध राष्ट्रभर गावोगावी संचलनाचा भव्य कार्यक्रम असतो.

असा आहे हा दिवस म्हणूनच एका कवीनं म्हटलंय- ‘दसरा सण मोठा। नाही आनंदा तोटा।’

निबंध क्रमांक -12

माझा आवडता सण दिवाळी 

सहामाही परीक्षेचा शेवटचा पेपर दिला रे दिला की वेध लागतात ते दिवाळीच्या सुट्टीचे. दिवाळीचा सण म्हणजे काय अगदी धमाल. शाळाच काय शाळेची आठवणसुद्धा गाठोड्यात बांधून गाठोडं माळ्यावर पार पलीकडं फेकून दिलेलं असतं. अभ्यासाला अंधाऱ्या कोठडीत कुलूपबंद करून टाकलेलं असतं. डोळ्यांसमोर दिसतात ते फटाके, रंगीत फुलबाजा, भुईनळे, overline 49h , बाण हे बाहेर आणि घरात नाकात शिरतात ते चकल्या, करंज्या, लाडू, शंकरपाळी, खमंग चिवडा, त्यातून महा-खमंग शेव, अनारसे यांचे विविध वास.

मामा किंवा ताई पाहुणे येणार असतात. बाबा नवे कपडे शिवतातच; पण पाहुणेही घेऊन येतात. शिवाय त्यांच्या घरचं फराळाचं किंवा नवीन एखादी मिठाईही असतेच. हे सगळं सुट्टी लागली की आठवायला लागतं. बाबा नवीन सुंदर आकाशदिवा आणतात. त्यातून बाहेर पडणारा रंगीबेरंगी प्रकाश बघताना मन हरवून जातं. तशात चिंटू, बंड्या, मिनी, रघू यांनी तो बघून

‘काय मस्त आहे नाही आकाशदिवा’! असं म्हटलं की छाती भरून येते. जणू पंख येऊन आकाशात भिरभिरल्यागत वाटतं.

नरकचतुर्दशी दिवशी लवकर उठायलाही खूप मज्जा वाटते. आई पाट- रांगोळी करून औक्षण करते. मग मस्त सुगंधी तेल सगळ्या अंगाला चोळून लावते. मग गरम पाण्यानं स्वतः अंघोळ घालते. सुगंधी उटणे अन् तसाच साबण लावून चोळताना कसला अपूर्व आनंद होतो म्हणून सांगू! त्याच वेळी घरातली बाकीची मुलं फुलबाजा लावतात. तारेचं चक्र लावतात.

सगळ्यांच्या आंघोळी झाल्या की, एक मस्त कार्यक्रम असतो. ओळखा बघू? नाही ओळखता येत? अहो फराळाचा. पुन्हा पाट, रांगोळी होते. सगळ्या पदार्थांचे अन् मिठाईचे नमुने पानात असतात. गप्पा मारता मारता फराळ करण्यात खूपच गंमत येते. दुपारी जेवणात हमखास बासुंदी असणारच.

पाडवा म्हणजे तर काय दिवाळीच्या शिरपेचाचा दिवस. त्या दिवशी वरचं सगळं असतंच; पण जेवणाचा बेत श्रीखंडपुरीचा ठरलेला. बटाट्याची भाजी, खुशखुशीत भजी, कुरवड्या, पापड, लोणचं, कोथिंबीर- खोबऱ्याची चटणी, साधा भात, मसाले भात वर नारळाचा कीस, कोथिंबीर आणि लोण्याच्या साजूक तुपाची चमचाभराची धार. जेवण मस्त असणार नाही तर काय? आणि जेवणानंतर मस्त विडा. काय थाट सांगावा महाराज!

भाऊबीजेला सगळं कौतुक बहीण करते. अगदी स्वयंपाकसुद्धा तीच करते. संध्याकाळी ओवाळणीचा सुरम्य कार्यक्रम असतो. दुपारी जेवणात केलेल्या पाकातल्या पुऱ्यांची चव अजून जिभेवर रेंगाळत असते. ओवाळणीबरोबरच दिवाळी संपते आणि रसाळ आठवण उरते.

असं वाटतं की, दरमहा निदान दोन महिन्यांनी दिवाळी येत असावी.

निबंध क्रमांक -13

रंगपंचमी 

वर्षातील शेवटचा आनंदोत्सवाचा दिवस म्हणजे रंगपंचमी. या दिवशी परस्परांच्या अंगावर रंगांची मुक्त उधळण करून एकमेकांवर न चिडता, रागावता आबाल-वृद्ध साजरा करतात.

या सणाची प्राचीन परंपरा श्रीकृष्णाच्या काळापासूनची असल्याचं सांगतात. ‘होरी’ ते त्यावेळचं नाव. पाण्यात निरनिराळे रंग कालवायचे अन् चांदीच्या, पितळेच्या पिचकारीतून मित्र-मैत्रिणींच्या अंगावर उडवायचे. वस्त्रे रंगीबेरंगी अन् ओलाचिंब व्हायची; पण निरागसता, निष्पाप वृत्ती हा या सणाचा महत्त्वाचा भाग एक दिवस बंडूनानांना निवांत गाढून त्यांना हे सगळं ऐकवलं. त्यांचा विशेष बराचसा मावळला. त्यांनाही ते सगळं पटलं. एका दुसऱ्या दिवशी संघाच रुबाबदार संचलन त्यांना दाखवलं. आबाल प्रौढ गणवेशात रूबाबात चालल असलेले ते पाहून ते खूप हरवले आणि गहिवरून म्हणाले, “काय वाट्टेल ते होवो. घरच्या खर्चाला आळा घालीन; पण बाळूला चांगला गणवेश शिवून देईन अन् तो नीट ठेवण्याचा मी जातीनं प्रयत्न करीन.”

निबंध क्रमांक -14

दूरदर्शन

टी.व्ही. तथा दूरदर्शन ही आधुनिक विज्ञानाची जगाला मिळालेली भेट. जगातच काय एखाद्या चंद्रासारख्या उपग्रहावरचं सुद्धा तिथं कॅमेरा लावला की धेर प्रक्षेपण करून दिसू शकतं. विशेष म्हणजे कुठलेही जोड माध्यम नसताना ही केवळ लहरी पकडून चित्र वा दृश्य छोट्या पडद्यावर जसंच्या तसं दाखवता येतं. जगात घडणाऱ्या अतिमहत्त्वाच्या घटना त्या घडत असताना त्याच क्षणी दिसू शकतात. उदा. अमेरिकेत होणारे उपग्रहाचे प्रक्षेपण.

दूरदर्शनचे तसे विविध उपयोग किंवा उद्देश आहेत. माहिती, शिक्षण आणि मनोरंजन. रोजची घटना, सभा-संमेलने, उद्घाटने, परिसंवाद यांची माहिती देणं हा एक घटक झाला.

चित्रपट, चित्रपटांचे त्यातील गीतांचे अंश. नवनवीन नाट्यमालिका, रामायण- महाभारत या स्वतंत्र रचना, विविध तालवाद्यांचे कार्यक्रम, नृत्याचे कार्यक्रम, नवी जुनी नाटके, शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम व लोकसंगीताचे कार्यक्रम दाखवणे हा मनोरंजनाचा घटक झाला.

हे तिन्ही घटक जबाबदार भूमिकेतून विवेकी वृत्तीनं लोकसंस्कृतीचा लोप न होईल अशा भावनेतून जोपासले तर टी. व्ही. एक आधुनिक जगाच्या उत्कर्षाल मिळालेलं एक चैतन्यमय वरदान आहे.

पण याच्या विरूद्ध भावनेनं हे साधन वापरलं तर ते अत्यंत आत्मघातकीक नव्हे तर राष्ट्रघातकी ठरू शकते. सध्या तशीच परिस्थिती आहे. अशिष्ट कार्यक्रम कामुक आणि हिंसात्मक दृश्ये प्रकर्षानं दाखवली जात आहेत. हिंदी चित्रपटातील मोठ्यांनीही पाहून नयेत अशी दृश्यं संपादित करून ती जाणीवपूर्वक दाखवले ‘जात आहेत. कोवळ्या वयातली संस्कारक्षम वयातील मुलं ती घरोघर पहा आहेत. त्या वृत्तीवर अनिष्ट संस्कार होताहेत. लोकशाहीत समाजपुरुषांचं को ऐकत नाही. त्यांची उपेक्षा होतेय हे त्यांना कळतंय; पण वळत मात्र नाही

निबंध क्रमांक -15

सहल 

सहली

पूर्वीच्या शिक्षणात नुसता पुस्तकी अभ्यास असायचा. रात्रंदिवस तिन्ही त्रिकाळ अभ्यास म्हणजे अभ्यास दुसरं काही नसायचं, खेळांचे ताससुद्धा नसायचे. मग स्पर्धा अन् क्रीडा महोत्सव कुठले असायला?

आजकाल नव्या अभ्यासक्रमात अनुभवातून शिक्षण हे तत्त्व सर्वमान्य झालं. त्यामुळं कितीतरी गोष्टी नवीन आल्या. सहलींचा अंतर्भाव त्यामुळंच अभ्यास कामात आला. पूर्वी भूगोलाचा अभ्यास पुस्तकावरून, नकाशावरून, फार तर पृथ्वीपाता गोलावरून व्हायचा. सहली कुठल्या, साधं पिकनिक किंवा हायकिंगलाही नेत नसत. तुमचं तुम्ही काय भटकायचंय ते भटका. शाळा काही करीत नसत. आजकाल शाळेच्या लहानमोठेपणावरून सहज फिरून येण्याचा तास (हायकिंग),

पिकनिक-जवळपासची छोटी सहल, रविवारी सकाळी जवळच्याच एखाद्या सुरम्य, निसर्गरम्य ठिकाणी डबे घेऊन जायचं. खेळून भटकून खाऊन-पिऊन, गाणी-गप्पा- गोष्टी करून संध्याकाळी परत यायचं आणि लहानमोठ्या सहली शाळेच्या आकारमानानुसार परजिल्ह्यात, परप्रांतात, जवळच्याच नेपाळ, श्रीलंकेसारख्या परदेशातही सहली जातात. त्यात धार्मिक पण निसर्गरम्य ठिकाणं, तलाव, सरोवर, धरण असलेल्या गावी, ऐतिहासिक स्थळी, लेणी यांचा अंतर्भाव असू शकतो.

सहलीत प्रवास तर होतोच; पण त्यातही निसर्गाची विविध रूपं जाता जाता पाहायला मिळतात. उदा. कात्रज घाट, वरंधा घाट, दिवे घाट इ. पण शिवाय जिथं जायचं तिथलीही प्रेक्षणीय स्थळं पाहायला मिळतात. प्रचंड पुलावरून, लांबच लांब बोगद्यातून जातानाची मजा काही औरच असते.

ऐतिहासिक, पौराणिक महत्त्वाची स्थळं पाहताना तिथला मार्गदर्शक कुशल व बोलका असेल तर तिथं घडलेला इतिहास आजही प्रत्यक्ष घडत असल्यासारखा तुमच्या नजरेसमोर उभा करू शकतो.

भाटघरचं धरण, पैठणचा नाथसागर पाहताना तर त्याच्या भव्यतेविषयी कुणी काही सांगण्याची आवश्यकता नसते. दृश्य स्वतःच बोलके बनते आणि आपण अवाक् मूक बनतो.

सहलीत नुसता सरळसोट प्रवास नसतो, तर गप्पा, गाणी, घोषणा इत्यादींनी प्रवासात चैतन्य भरलं जात असतं. शिक्षक-शिक्षिकाही त्यात सहभागी होतात आणि आणखीनच मजा येते. सहलीतून परत आलं की अंगात, जीवनात चैतन्य भरभरून वाहत असतं. म्हणून सहली या

शिक्षणाचं एक महत्वाचं अंग बनून राहिल्यात.

 

 

 

Leave a Comment