आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचा-यास संबंधित जिल्हा परिषदेत आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत extra increment
जिल्हा परिषदेकडील वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचा-यांना आगाऊ वेतनवाढी देण्याबाबतचे सर्व समावेशक आदेश अ.क्र.१ येथील शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यांत आले आहेत. तथापि, त्यात आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचा-यास आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी किंवा कसे याबाबतचा उल्लेख नाही.
आगाऊ वेतनवाढ शासन निर्णय 👉👉pdf download
२. दरम्यान अशा आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचा-याची सेवा ज्येष्ठता दुस-या जिल्हा परिषदेत शून्य होते असे सर्व जिल्हा परिषदांना अ.क्र.२ येथील दिनांक ३१ जुलै, १९९७ च्या शासन पत्रानुसार कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे अशा कर्मचा-यास आगाऊ वेतनवाढ द्यावी किंवा कसे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती.
आगाऊ वेतनवाढ जुन 1989 चा शासन निर्णय
👉👉pdf download
३. प्राप्त परिस्थितीत, आंतर जिल्हा बदलीने बदलून आलेल्या अशा कर्मचा-यांचा त्याच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे आगाऊ वेतनवाढीसाठी विचार करावयाचा झाल्यास, या विभागाच्या दिनांक 39/90 / 98 68 च्या शासन आदेशानुसार जुन्या व नवीन जिल्हा परिषदेतील संबंधीत कर्मचा-याची एकाच पदावरील किमान सलग तीन वर्षे सेवा झालेली असावी. तसेच संबंधित कर्मचा-यांच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अभिलेख्यांची प्रतवारी दिनांक ३१-१०-१९८९ च्या शासन आदेशानुसार असावी.
अगाऊ वेतनवाढ नाशिक विभागांचे पत्र 👉👉pdf download
४. हे आदेश पूर्वलक्षी प्रभावाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम २४८ नुसार प्रदान केलेल्या शक्तीनुसार लागू करण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,