मराठा आरक्षण मागास/खुला प्रवर्ग सर्वेक्षण प्रशिक्षण साहित्य वाटप बाबत शासन निर्णय maratha aarakshan
सदर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नियोजन आंपल्या स्तरावरुन करण्यात यावे त्यासाठी आवश्यक निधी आयोगामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल.
शासन निर्णय साहित्य वाटप येथे पहा 👉PDF download
गोखले इन्स्टीट्युटकडील Master Trainer दि. २० जानेवारी २०२४ रोजी जिल्ह्याच्या / महानगरपालिकेच्या मुख्यालयात प्रशिक्षण देण्यासाठी उपस्थित राहतील. हे Master Trainer तालुकास्तरीय प्रशिक्षणास, मदत करतील तसेच सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यत संबंधीत जिल्ह्याच्या / महानगरपालिकेच्या मुख्यालयात उपस्थित राहतील. सदर कालावधीतील त्यांच्या निवास व भोजन व्यवस्था गोखले इन्स्टीट्युट मार्फ़त करण्यात येणार आहे. त्यांना प्रशिक्षणासंबंधी इतर सर्व बाबीबाबत आपल्याकडून सहकार्य करण्यात यावे. या Master Trainer चे नाव व संपर्क क्रमांक स्वतंत्रपणे कळविण्यात येतील.
सर्वेक्षण ॲप येथे पहा
👉app download
सदर कामकाजासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आंयोगामार्फत ओळखपत्र व सर्वेक्षणांच्या वेळी घरावर चिंन्हाकंन करण्याकरिता प्रगणकांना Permenent Marker Pen देण्यात येणार असून दि. १९/०१/२०२४ रोजी जिल्ह्याच्या व महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या ठिकाणी Assistant Nodal Officer यांना हे साहित्य पुरविण्यात येईल. Assistant Nodal Officer जिल्हा व महानगरपालिका यांनी हे साहित्य तालुका व वॉर्ड स्तरावर तेथील प्रशिक्षणापूर्वी पोहोचवावे व प्रशिक्षणाच्या वेळी सदर साहित्य प्रगणकांना उपलब्ध करुन द्यावे.
मराठा आरक्षण मागास प्रवर्ग सिद्ध करण्यासाठी विचारले जाणारे प्रश्नावली येथे पहा
👉 PDF download
तालुका Nodal Officer यांना तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे वेळापत्रक व प्रगणकांच्या बॅचेस याबाबतची माहिती गोखले इंन्स्टियुट मार्फत दि. १८/०१/२०२४ रोजी Email वर पाठविण्यात येईल. त्या वेळापत्रकानुसार प्रगणक व पर्यवेक्षक यांना प्रत्येक दिवशी दोन सत्रामध्ये प्रत्येकी ७५ प्रगणक व त्यांचे सुपरवायझर बोलावून प्रशिक्षण देण्यात यावे. प्रशिक्षणाच्या वेळी तालुका Nodal Officer यांनी प्रगणकाचे नाव किंवा त्यांच्या मोबाईल क्रमांकामध्ये बदल असल्यास त्याबदलाबाबतचा Report तयार करुन गोखले एन्स्ट्यूिट मार्फत आपल्या जिल्ह्यासाठी / महानगरपालिकेसाठी नियुक्त Master Trainer यांना Whats app वर तातडीने पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी. प्रगणकाच्या नावात व मोबाईल क्रमांकामध्ये तत्काळ दुरुस्ती करण्यात येईल.
प्रशिक्षण कालावधी येथे पहा
👉PDF download
महानगरपालिकेमध्ये कमी प्रगणक असलेल्या वॉर्ड किंवा पेठा एकत्र करुन ३०० प्रगणकाच्या ग्रुपकरिता १ प्रशिक्षकाची नियुक्ती करावी. या वॉर्डस्तरीय प्रशिक्षकांना महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील प्रशिक्षणासाठी बोलविण्यात यावे.
सर्वेक्षण कालावधी येथे पहा
👉PDF download
प्रशिक्षणाच्या वेळी आयोगाने पुरविलेल्या ओळखपत्रामध्ये अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम, गाव, तालुका, जिल्हा ही माहिती भरून फोटो चिटकवावा, त्यावर तहसील / महानगरपालिका कार्यालयाचा शिक्का उमटवून अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावे.
पर्यवेक्षक व प्रगनक मानधन
👉PDF download
तसेच प्रत्येक प्रगणकास चिन्हांकन करण्याकरिता १ Marker पेन उपलब्ध करुन द्यावा. ओळखपत्र व Marker Pen दिल्याची नोंद ठेवण्यात यावी.
सदर सर्वेक्षणाचे काम दि. २३/०१/२०२४ ते दि.३१/०१/२०२४ या कालावधीत पूर्ण करावे.
या कामकाजासाठी विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील Nodal Officer Assistant Nodal Officer यांना विभाग जिल्हा व तालुका स्तरावर १ लिपिकाची सेवा उपलब्ध करुन घेता येईल. या लिपिकांना एका महिन्याच्या मूळ वेतनाच्या ५०% रक्कम मानधन म्हणून देण्यात येईल. तालुका स्तरावरील प्रशिक्षकांना रू. १०,००० इतके मानधन देण्यात येईल. यापुर्वी कळविल्याप्रमाणे मराठा व खुल्या प्रवर्गातील १०० कुटुंबांच्या सर्वेक्षणासाठी रु.१०,०००/- इतके मानधन देण्यात येईल तर मागासवर्गीय कुटुंबांच्या सर्वेक्षणासाठी प्रति कुंटुंब रु.१०/- इतके मानधन देण्यात येईल.
Yashashripolgir.yp@gmail.com