जवाहर नवोदय विदयालय निवड चाचणी प्रवेश परीक्षा 20 जानेवारी रोजी होणार JNVST exam 2024
जवाहर नवोदय विदयालय निवड चाचणी प्रवेश परीक्षा इ. ६ वी २०२४-२०२५ करिता दिनांक शनिवार २० जानेवारी २०२४ रोजी कोल्हापूर जिल्हयातील १२ तालुक्याच्या ३५ प्रमुख परीक्षा केंद्रावर सकाळी ११-३० ते १-३० या वेळेत घेण्यात येणार आहे.
जवाहर नवोदय विदयालय निवड चाचणी प्रवेश परीक्षा 20 जानेवारी रोजी होणार
1. ज्या विदयार्थ्यांनी ऑनलाईन द्वारे यशस्वीरित्या (Sucessfully) अर्ज भरले आहेत त्यांनी https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Or www.navodaya.gov.in या संकेतस्थळावरुन विदयार्थ्यांच्या यशस्वीरित्या (Sucessfully) पूर्ण झालेल्या ऑनलाईन अर्जातील नोंदणी (Registration No.) व जन्मतारीख पासवर्ड टाकून प्रवेश पत्र वरील संकेतस्थळावरुन इंटरनेट कॅफ कॅफे किंवा इंटरनेट सेवा जिथे उपलब्ध असेल अशा केंद्रावरुन दिनांक १६ जानेवारी २०२४ पूर्वी प्राप्त करुन घेणेची आहे.
16 जानेवारी पूर्वी हॉलतिकीट download करून घ्या
2. प्रवेशपत्रावर जे परीक्षा केंद्र नमुद केलेले आहे त्याच परीक्षा केंद्रावर परीक्षेस बसणे सक्तीचे आहे. तसेच विदयार्थ्याला परीक्षेचे माध्यम (भाषा) कोणत्याही परिस्थितीत बदलून मिळणार नाही.
3. प्रवेशपत्र नसेल तर त्या विदयार्थ्याला परीक्षेस बसता येणार नाही.
4. परीक्षेदिवशी विदयार्थ्यांनी मास्क वापरणे आवश्यक असून कोविड 19 नियमांचे सर्व पालन करणे आवश्यक आहे.
4. परीक्षेदिवशी विदयार्थ्यांनी प्रवेशपत्रावर असलेल्या परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर उपस्थित असणे आवश्यक आहे.
तरी नवोदय प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या (Sucessfully) भरलेल्या पालकांनी व मुख्याध्यापकांनी याची नोंद घ्यावी.
Jss