आयकर अपहार प्रकरण; सामाजिक कार्यकर्ते लोखंडे यांचा आरोप : शिक्षणाधिकारीही दोषी ! income tax department
परतूर, (वा.) अनेक वर्षांपासून शालार्थ समन्वयक पदावर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची नियमबाह्य प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. यामुळे हक्काचे शिक्षक शाळेत न येता कार्यालयातच ठाण मांडून बसत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. यांसदर्भात सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे यांनी शिक्षकांना मूळ पदस्थापनेवर पाठवा म्हणून अनेकदा आंदोलने केली. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शाळा वेळा वरिष्ठांचे लक्ष वेधले. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी दखल घेत जिल्हा शालार्थ समन्वयक संतोष पिंपळे, तालुका समन्वयक चंद्रकांत पौळ, किशोर चव्हाण, उद्धव बिल्हारे, संतोष पवार, नरेंद्र पाटील, तुकाराम नाकाडे, संजय महाजन, विजयसिंग बिसेन, सदाशिव तोटे या दहा शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करून मूळ पद स्थापनेवर रुजू करण्याचे आदेश सीईओना दिले होते.
नियमाबाह्य प्रतिनियुक्त्या करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना निलंबीत करून शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांचे १ ते ४ दोषारोपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीईओ वर्षा मीना यांनी या दहा शिक्षकांना तत्काळ शाळेवर रुजू होण्याचे आदेश दिले होते. हे दहा शिक्षक या शालार्थ समन्वयक पदावरून कार्यमुक्त केल्याचे शिक्षण विभागाने पत्राद्वारे वरिष्ठाना कळविले. मात्र, हेच शिक्षक शालार्थ समन्वयक पदावर कायम माहिती अधिकारातून उघड झाले आहे. जिल्हा शालार्थ समन्वयक संतोष पिपळे, तालुका समन्वयक चंद्रकांत पौळ, संतोष पवार अद्यापही त्याच पदावर काम करीत असल्याचे उघड झाले आहे. शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी विभागीय आयुक्त आणी सीईओ यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. या शिक्षकांना उपस्थित प्रमाणपत्र देऊन वरिष्टांची दिशाभूल केली आहे. जर या शिक्षकांना ऑगस्टमध्ये वरिष्टांच्या आदेशा प्रमाणे शाळेवर पाठविले असते तर परतूर असल्याचेच्या गटसाधन मध्ये १ कोटी ३५ लाखांचा अपहार झाला नसता व याला जबाबदार शिक्षणाधिकारीच असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे यांनी केला आहे. तसेच शालार्थ समन्वयक पद कुठल्याच जिआरमध्ये नसून स्वतःच्या सोयीनुसार मलिदा खाण्यासाठी या पदाची फक्त जालना जिल्ह्यात निर्मिती करण्यात आल्याने आचर्य व्यक्त होत आहे. राज्यात कुठेही या पदावर शिक्षक नेमलेले नाही. परतूर ला या सर्वांच्या संगनमताने हा अपहार झाल्यामुळे ५४२ शिक्षकांना आयकर विभागाच्या नोटिसा येणार आहेत. अद्यापही संबंधितांवर गुन्हा दाखल झाला नसल्याने वरिष्ठ अशा चोरांची पाठराखण करीत
सीईओंनी सर्व दोषींवर कारवाई करावी..
परतूरला आयकर अपहरात गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे, शालार्थ समन्वयक चंद्रकांत पौळ या दोघांवर निलंबनाची कारवाई झालीय. मात्र, प्रभारी गटसमन्वयक कल्याण बागल यांनी ही याच खात्यामधून ८ एप्रिल २०२४ रोजी ध. क्र. ६३६२८४ नुसार १४,६४०/- रु. उचललेले आहेत. मात्र अजून बागल यांच्यावर कारवाई केलेली दिसतं नाही. याचा अर्थ कुठे तरी पाणी मुरतेय. म्हणून सीईओ यांनी सर्वावर सामान कारवाई करावी अशी मागणी होत आहे.