आधार बेस्ड बायोमेट्रीक उपस्थिती (AEBAS) बाबत adhar based biometric attendance
परिपत्रक –संदभर्भीय परिपत्रकान्वये जिल्हा परिषदेतंर्गत सर्व कार्यालय प्रमुखांना अधिकारी/कर्मचारी यांची दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रीक उपस्थिती (AEBAS) प्रणालीवरच नोंदविणेबाबत निर्देश देण्यात आले असून दिनांक 01 ऑक्टोंबर 2024 पासून बायोमेट्रीक उपस्थिती अनिवार्य केली आहे. कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांची दररोज शासनाने निश्चित केलेल्या कार्यालयीन वेळेत कार्यालयात आल्यावर तसेच कार्यालयीन वेळ संपल्यानंतर कार्यालय सोडताना उपस्थिती बायोमेट्रीक प्रणाली द्वारे नोंदविणे तसेच कार्यालय प्रमुखांनी अधिनिस्त अधिकारी कर्मचारी दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रीक उपस्थिती (AEBAS) प्रणालीवरच 100 टक्के नोंदवितौल याची दक्षता घेणे बाबत निर्देश दिलेले आहेत.
तवापि सदर निर्देशाचे पालन होत नसल्याची निदर्शनास आले आहे. बहुतांश कार्यालयातील कर्मचारी हे कार्यालयात सकाळी उपस्थित झाल्यावर बायोमेट्रीक उपस्थिती (AEBAS) प्रणालीवर नोंदवितात. तथापि कार्यालय सोडताना बायोमेट्रीक उपस्थिती (AEBAS) नोंदवित नाहीत. यावरुन सदरील कर्मचारी कार्यालयीन वेळेपूर्वीच कार्यालय सोडत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बाब कार्यालयीन कामकाजाचे दृष्टीने योग्य नाही. संबंधित कर्मचारी आदेशाचे पालन न करुन कार्यालयीन शिस्तीचा भंग करत असल्याचे स्पष्ट होते.
त्या अनुषंगाने या परिपत्रकाद्वारे सक्त निर्देश देण्यात येतात की, कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी संदर्भीय परिपत्रकातील निर्देशानुसार दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रीक उपस्थिती (AEBAS) प्रणालीवर नोंदवावी. तसेच कार्यालयीन वेळ संपल्यानंतरच बायोमेट्रीक उपस्थिती (AEBAS) नोंदवावी, या बाबत दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी. जे कर्मचारी कार्यालयात आल्यानंतर व कार्यालयीन वेळ संपल्यानंतर बायोमेट्रीक उपस्थिती (AEBAS) नोंदविणार नाहीत त्यांचे सदर दिवशीची अनाधिकृत अनुपस्थिती समजण्यात यावी व त्यांचे सदरील दिवसाचे वेतन कपात करण्याची कार्यवाही संबंधीत कार्यालय प्रमुख यांनी करावी.
सदरील परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी