शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा जिल्हास्तर बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहण्याबाबत educational video making competition 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा जिल्हास्तर बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहण्याबाबत educational video making competition 

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ – जिल्हास्तर बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहण्याबाबत educational video making competition

संदर्भ: मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. जा.क्र./रा. शै. सं. प्र. व्हीएमएस/बक्षीस/१०९०३. दिनांक १६/०२/२०२४.

वरील संदर्भीय विषयानुसार राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे २०२३ मध्ये आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य अशा प्रत्येक स्तरावर प्रत्येकी ६ गटांसाठी एकूण २८ विषयांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती.

संदर्भीय पत्रानुसार स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. सदर स्पर्धेमध्ये विविध स्तर व विषयांमध्ये जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या ६७ विजेत्यांना रोख बक्षीस, ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम दि. ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.०० या कालावधीत हॉटेल रॅडियंट, ६ वा मजला, AC Banquet Hall, सेन्ट्रल बस स्थानकाजवळ, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम स्थळी दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी सोबत जोडलेल्या विजेत्यांच्या यादीतील शिक्षकांना कार्यक्रमासाठी वेळेवर उपस्थित राहण्यासाठी आपले स्तरावरून कार्यमुक्त करण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करावा. सोबतः विजेत्यांची यादी.

Join Now