जिल्ह्यातील बोगस TET अपात्र शिक्षकांच्य नेमणुकीबाबत तात्काळ कारवाई करण्याबाबत teacher eligibility test exam 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्ह्यातील बोगस TET अपात्र शिक्षकांच्य नेमणुकीबाबत तात्काळ कारवाई करण्याबाबत teacher eligibility test exam 

संदर्भ

:- मा. आ. प्रशांत बन्सीलाल बंब, महाराष्ट्र विधानसभा सदस्य, यांचेकडील जा.क्र. कार्या/विका/छ.सं./२२०८७ दिनांक ३१.०३.२०२५

सोलापूर जिल्हा प्राथमिक आणि खाजगी माध्यमिक विभागात बोगस ७८०० शिक्षकांची नियुक्ती झाल्याची माहिती उपलब्ध आहे. खाजगी माध्यमिक शाळांमधील अनेक TET अपात्र शिक्षक आर्थिक व्यवहार करून शासनाच्या निधीचा गैरवापर करत आहेत. हे शिक्षक शासनाचा फायदा घेत असून, यामुळे शिक्षण क्षेत्राची प्रतिमा धोक्यात आली आहे. आपण यावर त्वरीत लक्ष घालावे आणि प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश देऊन, सोलापूर जिल्ह्यातील अशा बोगस शिक्षकांची नेमणूक रद्द करण्यात यावी. याशिवाय, दोषींवर योग्य ती कारवाई करून मुलाच्या आयुष्याशी चालू असलेला खेळ व शासनाच्या निधीचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आखाव्यात, अशी विनंती संदर्भिय पत्रान्वये करण्यात आलेली आहे.

तेव्हा आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमधील TET धारक शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करुन बोगस TET प्रमाणपत्राच्या अनुषंगाने अहवाल या कार्यालयास २ दिवसात सादर करावा.

Join Now