शिक्षक ऑनलाईन बदली नवीन अपडेट ग्रामविकास विभागाचे परिपत्रक दिनांक 24 मार्च 2025 shikshak badli update
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळणेबाबत अर्ज. संदर्भ आपला दि.०८.०३.२०२५ रोजीचा ऑनलाईन प्रणालीवरील प्राप्त अर्ज.
महोदय, आपला संदर्भाधिन दि.०८.०३.२०२५ रोजीचा ऑनलाईन प्रणालीवर सादर करण्यात आलेला माहिती अधिकार अधिनियम, २००५ अन्वये माहिती मिळणेबाबतचा अर्ज या कार्यासनात दि. ११.०३.२०२५ रोजी प्राप्त झाला आहे. आपल्या सदर अर्जान्वये प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात (१८ जून २०२४) ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी संवर्ग १ व संवर्ग २ या दोन बदली संवर्गाचा यापूर्वी कधीही लाभ घेतला नाही, अशा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विद्यमान शाळेमध्ये जी सेवा निश्चित धरावयाची आहे, यासंदर्भात उपलब्ध शासन निर्णयाची प्रत मिळण्याबाबत विनंती केली आहे.
२. याबाबत आपणांस कळविण्यात येते की, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे धोरण ग्राम विकास विभागाच्या दि.१८.०६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. तसेच जिल्हांतर्गत बदली करीता विशेष संवर्ग १ व विशेष २ अंतर्गत बदलीकरीता अर्ज करण्यासाठी विद्यमान शाळेतील सेवेबाबत या विभागाच्या दि.२३.११.२०२२ रोजीच्या पत्रान्वये सर्व जिल्हा परिषदांना सूचना देण्यात आल्या आहेत. (सदर पत्राची प्रत सोबत जोडली आहे.)
३. सदर माहितीने आपले समाधान न झाल्यास पत्र मिळाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत अपिलीय अधिकारी, श्रीमती नीला रानडे, उप सचिव (आस्था-१४), ग्रामविकास विभाग, पहिला मजला, ए विंग, बांधकाम भवन, मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ यांचेकडे अपील दाखल करता येईल.